स्वार्थाचा कल्लोळ
प्रेमाचा दुष्काळ
स्नेहाचा अकाल
चोहिकडे
हिंसा आणि क्रोध
धर्म भेदाभेद
बुद्धाला निर्बुद्ध
केले आम्ही
रोज नवे पक्ष
त्यांचे नवे झेंडे
प्रत्येकाचे दांडे
मजबूत
क्रांतीबिंती काही
होणारच नाही
ऐसे काहीबाही
वाटे मज
कुत्र्याचे शेपूट
कायम वाकडे
करणारे वेडे
सरळ ते
होईल होईल
मुठी वळतील
मेलेला उठेल
चितेतूनी
चितेच्या या ज्वाला
होतील मशाल
तख्त हादरेल
माजोरडे
रयतेचे राज्य
रयतेच्या हाती
स्वप्नामध्ये क्रांती
केली हो मी....!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1785
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रांती क्रांती
मोठा अभंग वृत्तात घेतलेली
रयतेचे राज्य रयतेच्या
चांगली
विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती
आवडली...
आवडेश