जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.
एके दिवशी मी एक मुलगा फळाच्या रसाच्या बाटल्यान्चे क्रेट्स ट्रॉलीवर घेऊन जात होता ते पाहिले. बाटल्या वाहून नेण्यासाठी ट्रॉली खरचच सुन्दर होती. म्हणजे तो पाणी नाहितर पेय वाहूनच नेत होता. दोन -तीन दिवसानन्तर सुपर मार्केट मधून सामान घेऊन घरी येताना मी बस स्टॉप वर उभी होते. तेव्हढ्यात तेथे एक ६०-६५ वर्शाचे एक जोडपे आले. ट्रॉलीवर पाण्याच्या बाटल्यान्चा क्रेट होता. बाई ती ट्रॉली ओढत होती , पुरशाच्या हातात सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या.
माझ्या डोक्यात विचार आला. अरेरे!!!!!!
एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!!
मिसळपाव
प्रतिक्रिया
एव्हढ्या प्रगत देशातही
एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!!
अरेरे ...डोळे पाणावले.
युयुत्सुजी एनी कॉमेन्ट्स? ;)
हं! चुक त्यांची नाही आहे,
हं!
चुक त्यांची नाही आहे, त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत अस वाटत, आणि विकत घेतल्या शिवाय पाणी पचत पण नसाव!
त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत
In reply to हं! चुक त्यांची नाही आहे, by स्पंदना
अस काही नाही. नळाला येणार पाणी (उसातल्या सारख) दरवेळी शुद्धच असेल याची शाश्वती नाही.
आमच्या इकडे कधी कधी तर चक्क तांबड भडक पाणी येत नळाला. प्यायच सोडा आंघोळी आणि कपडे धुवायचे पण वांदे. अश्या वेळी पाणी विकतचच आणाव लागत, मग ते बाटल्यांतल असो वा ड्रम मधल.
अरेरे
In reply to त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत by गणपा
अरेरे.
आम्ही उगाचच आमच्या महापालिकेला शिव्या घालतो. :(
"णळोणळी गढूळ पाणी" असे संत टारेश्वर महाराज म्हणून गेलेच आहेत.
गणपाशी सहमत.
In reply to त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत by गणपा
आमच्याकडे मागल्यावर्षी दोन दिवस गढूळ पाणी आलं होतं.
पण आधी रहायचो त्या टाऊनचं पाणी सगळ्यांना मानवत असे पण माझ्या मुलाला नाही.
मग आम्ही ३ वर्षे पाणक्ये झालो. या टाऊनचं पाणी मात्र छान आहे पण फिल्टरशिवाय वापरायला नको वाटतं.
अरे वा तुम्ही जर्मनीला असता
अरे वा तुम्ही जर्मनीला असता का? छान छान :)
+१
In reply to अरे वा तुम्ही जर्मनीला असता by परिकथेतील राजकुमार
+१
हा प्रतिसाद तुझ्या कडुन
In reply to अरे वा तुम्ही जर्मनीला असता by परिकथेतील राजकुमार
हा प्रतिसाद तुझ्या कडुन अपेक्षितच होता.
माझ्या अपेक्षेला जागलास ;)
घरोघरी (का देशोदेशी??) मातीच्या चुली...
शेवटी बाईमाणसाची अवस्था इथून तिथून सारखीच... भारतात पाणी भरायला नळ, ओहोळ, नदीनाले किंवा विहिरी शोधाव्या लागतात आणि ने-आण करायला डोक्या-खांद्यावरून कळशी आणि हंडे वागवावे लागतात आणि जर्मनीमध्ये पेयांच्या दुकानातून बाटल्यांचे क्रेट गाडीच्या मोठ्या डिक्कीमधून वाहून न्यावे लागतात.
फार जाग्रणे करु नकोस रे
फार जाग्रणे करु नकोस रे तब्येतीवर परीणाम होतो.
हेहेहे!
खरे आहे. आम्हीही बाटल्यांतून पाणी वाहून आणतो. आमची विहीर/नदी/तळे - सॅम्स क्लब. ;)
अरे वा तुम्ही अमेरिकेत असता
In reply to हेहेहे! by प्रियाली
अरे वा तुम्ही अमेरिकेत असता का? छान छान :) *हलकेच घ्या, पराकडून शिकतोय* ;)
अवांतरः लेख वाचून पाणीवाल्या बाई आठवल्या आणि डोळे पाणावले!!
आणि हो (गाडीच्या) डिकी ला 'बूट' (बूड नव्हे) म्हणावे असा उल्लेख इथेच एका जुन्या लेखात आला होता तेही आठवलं :-))))
हो हो!
In reply to अरे वा तुम्ही अमेरिकेत असता by उपास
आम्ही अमेरिकेतच असतो आणि गाडीच्या डिकीला आम्ही डिकी म्हणत नाही. ;) ट्रंक म्हणतो.
छान छान.. ट्रंकेत पाणी
In reply to हो हो! by प्रियाली
छान छान.. ट्रंकेत पाणी ठेवायला कुणाचीच हरकत नसावी :-)))))
हाहाहा
In reply to हो हो! by प्रियाली
हाहाहाहा... आवश्यक खुलासा ना हा? ;)
अत्यावश्यक
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
सार्वजनिक ठिकाणी (विशेषतः हापिसात) हा शब्द वापरून गोत्यात आलेले काही महाभाग पाहिले आहेत. ;)
ठ्ठो!!!
In reply to अत्यावश्यक by प्रियाली
हा, हा.... त्या प्रसंगाचे वर्णन कराच!!
नक्को....
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
केला असता पण संपादक अप्रकाशित करतील. ;)
तुम्ही काळजी करु नका हो.
In reply to नक्को.... by प्रियाली
तुम्ही काळजी करु नका हो. जेवढा वेळ धागा राहील तेवढा वेळ करमणुक. मग नंतर धागा अप्रकाशित का केला म्हणुन संपादक मंडळाला जाब विचारायचा. अजुन थोडी करमणुक. मज्जाच मज्जा.
गद्दारी/फितूरी
In reply to तुम्ही काळजी करु नका हो. by मृत्युन्जय
याला दुसर्या शब्दांत गद्दारी/फितूरी असे म्हणतात. :(
असहमत
In reply to गद्दारी/फितूरी by प्रियाली
ह्याला मतांतर ( मराठीतः डिफरंस इन ओपिनियन) म्हणतात.
असेल
In reply to असहमत by शेखर
असेल पण आम्ही संपादकांशी हुज्जत घालत नाही. आमचे त्यांचे मतांतरही नसते त्यामुळे "नको"वर शिक्कामोर्तब.
मग नंतर धागा अप्रकाशित का
In reply to तुम्ही काळजी करु नका हो. by मृत्युन्जय
मग नंतर धागा अप्रकाशित का केला म्हणुन संपादक मंडळाला जाब विचारायचा. अजुन थोडी करमणुक
छे! काय उपयोग त्याचा? संपूर्ण आठवडा झाला तरी संपादक मंडळ नवीन सदस्यांच्या खरडीला उत्तर देत नाहीत हा माझा अनुभव आहे.
हा आता तुम्ही त्यांच्या कंपूतले असाल तर गोष्ट वेगळी- ताबडतोब कार्यवाही.
अगदी
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
अगदी... :)
पुन्हा एकदा
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
पिडांची अॅलिशीया वाचणे. :-)
नक्कीच!
In reply to अत्यावश्यक by प्रियाली
गोत्यात आलेले काही महाभाग
होय नको ते शब्द सर्रास वापरले जातात. धड हसताही येत नाही आपल्याला.;)
हो ना. रबर दे असे कोणी
In reply to नक्कीच! by रेवती
हो ना. रबर दे असे कोणी म्हणले की माझी अशीच अवस्था होते? मीच उलटा प्रश्न विचारतो की "एरेझर हवे आहे का तुला?" समोरच्या माणसाला तरीही कळत नाही ही गोष्ट वेगळी.
याला म्हणतात राजापेक्षा
In reply to हो ना. रबर दे असे कोणी by मृत्युन्जय
याला म्हणतात राजापेक्षा राजनिष्ठ. एकवेळ अमेरिकन माणसाला हे शब्द कळतील पण इथून गेलेल्या भारतीयांचा गजनी होतो.
खॅक
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
खॅक :D
कडवे बाटगे
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
बाटगे जास्त कडवे असतात, असे म्हणायचे आहे का मेहंदळेकाका तुम्हाला ?
तुमचा काय अंदाज आहे?
In reply to कडवे बाटगे by मिसळभोक्ता
तुमचा काय अंदाज आहे?
वपु ?
In reply to तुमचा काय अंदाज आहे? by विश्वनाथ मेहेंदळे
काय, हल्लीच वपु ऐकलेत वाटत?
तुमचा काय अंदाज आहे?
In reply to वपु ? by मिसळभोक्ता
तुमचा काय अंदाज आहे? ;-)
आजकाल पोरासोरांनाही इरेझर
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
आजकाल पोरासोरांनाही इरेझर म्हणायची सवय असते आणि थोड्या मोठ्या पोरांना दोन शब्दांमधला फरकही बरोबर माहित असतो.
बाकी एखाद्याला बोलण्यातली चूक सांगितली तर एवढा काय ब्वॉ चुकलं त्यात?
today night ऐकलं की मात्र मला अंगावर झुरळ पडल्यासारखं वाटलं आणि मी पण सुधारणा सांगतेच सांगते.
रबर ट्री
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
रबरांच्या झाडाला कुणी इरेझर ट्री म्हटलेले ऐकलेले नाही बॉ !
लेटेक्स म्हटले तरी कोणीतरी खिक करून हसणारच !
शेवटी काय, तर ज्याची त्याची जाण समज वगैरे.
खोडलब्बर
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>आजकाल पोरासोरांनाही इरेझर म्हणायची सवय असते
असेल असेल. आम्ही तर खोडलब्बर म्हणायचो. आणि शार्पनरला 'कटर'.
चूक झाली तर सांगावी की नाही
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
चूक झाली तर सांगावी की नाही हा पुढचा मुद्दा. मुळात हे चूक आहे हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवलेत असा प्रश्न मला पडला आहे.
I is not entirely sure what
In reply to चूक झाली तर सांगावी की नाही by विश्वनाथ मेहेंदळे
I is not entirely sure what am called mistake when it comes to language ...पण चारचौघांत आणि कधीमधी शब्दकोषातही काही व्याख्या असतात, त्यांच्या विपरीत बोललं की त्याला मी चूक मानते.
मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि उरलेल्या आयुष्यात पण बाहेर सेटल होण्याची इच्छा नाही. पण ज्यांची भाषा वापरता. त्यांची स्लँग पण वापरा. नाहीतर बाहेर गेल्यावर तोंडघशी पडल्यासारखे होते.
>>मी जन्मभर भारतातच राहिलोय
In reply to मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि by मृत्युन्जय
>>मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि उरलेल्या आयुष्यात पण बाहेर सेटल होण्याची इच्छा नाही
पाण्याबाहेर राहूनच पोहणे शिकलात म्हणायचे. (हे केवळ स्लँग बद्दल हं, गैरसमज नकोत)
>>पण ज्यांची भाषा वापरता. त्यांची स्लँग पण वापरा.
https://en.wikipedia.org/wiki/Rubber_(disambiguation)
वरील दुव्यावर खालील दोन वाक्ये सापडली.
In British and Canadian English, an eraser used to remove pencil markings from paper
In American English, a slang term for condoms
आता माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आपण इंग्रजांची भाषा बोलतो ना रे डूड? (जमले वाटते मला पण!!) मग आता स्लँग कुणाची वापरू रे पॅल? (परत जमले. I am getting hang of this)
>> नाहीतर बाहेर गेल्यावर तोंडघशी पडल्यासारखे होते.
बाहेर म्हणजे अमेरिका का रे मेट ? (I am on fire !!!)
भारतीयांचे आपले असे वेगळे व्हर्जन आहे इंग्रजीचे. ते फारच गावठी वाटते का हो तुम्हाला?
वेळ मिळाला तर हे पण वाचा. https://en.wikipedia.org/wiki/Indian_English (Idioms and popular words/phrases)
ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
पाण्याबाहेर राहूनच पोहणे
In reply to >>मी जन्मभर भारतातच राहिलोय by विश्वनाथ मेहेंदळे
पाण्याबाहेर राहूनच पोहणे शिकलात म्हणायचे. (हे केवळ स्लँग बद्दल हं, गैरसमज नकोत)
तर तर. आयला आम्ही कधी हो अमेरिकेला जाणार असेही. त्यामुळे इथे राहुनच शिकतो. अमेरिकन्स पितात म्हणुन आम्हीही कोक प्यायला लागलो की नाही? तसेच. आता एवढ्या गोष्टी आत्मसात केल्या तर अजुन थोड्या.
In British and Canadian English, an eraser used to remove pencil markings from paper
In American English, a slang term for condoms
मी आत्तापर्यंत एकाही इंग्रजाच्या तोंडी रबर हा शब्द ऐकला नाही. सगळे जण इरेजर असेच म्हणतात. कदाचित अमेरिका वगळता इतर देशात "रबर" या शब्दाचा अमेरिकी अर्थ प्रचलित नसेल. पण रबर हा शब्ददेखील प्रचलित नाही हे नक्की. कदाचित मी चुकीचा असेन कारण मी काही इंग्लंड मध्ये कायमस्वरूपी वास्तव्य कधी केलेले नाही. तिथे दीर्घकाळासाठी राहुन आलेले लोक अजुन व्यवस्थित सांगु षकतील.
आता माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आपण इंग्रजांची भाषा बोलतो ना रे डूड? (जमले वाटते मला पण!!) मग आता स्लँग कुणाची वापरू रे पॅल? (परत जमले. I am getting hang of this)
नाही हो काका. आपण स्पेलिंग इंग्रजांकडुन घेतले आहेत. पण पत्रे लिहिताना आपण अमेरिकन इंडेंट वापरतो. बोली भाषा किंवा उच्चार आपले पुर्ण वेगळेच आहेत. इन्ग्रजांचे उच्च्चार मला जास्त वेगळे वाटतात,. त्यामानाने अमेरिकन्स जास्त समजेल असे बोलतात. अर्थात अमेरिकन्स सुद्धा जेव्हा खुप वेगात बोलतात तेव्हा मला पुर्णपणे झेपत नाही.
बाहेर म्हणजे अमेरिका का रे मेट ? (I am on fire !!!)
बाहेर म्हणजे जिथे जाउ तिथे. इरेजर हा सर्वमान्य शब्द आहे. अजुनतरी रबर या शब्दासारखे अर्थ त्याला चिकटलेले नाहीत. आजवर ज्या ज्या देशात गेलो आहे (इंग्रजी बोलणारे देश अर्थात) तिथे हा सर्वमान्य शब्द आहे.
भारतीयांचे आपले असे वेगळे व्हर्जन आहे इंग्रजीचे. ते फारच गावठी वाटते का हो तुम्हाला?
नाही सगळे नाही. चालुनही जाते कित्येकवेळेस ते. भारतात वापरायला तर काहीच हरकत नाही. पण परदेशात चालेलच असे नाही. आणि रबर हा शब्द तर डोक्यात फिट्ट बसला आहे. तुमचा प्रतिसाद वाचुन मला मी चुकीचा आहे असे वाटले त्यामुळे अजुन २-३ जणांना विचारले तर त्यांचे अनुभव माझ्यासारखेच होते. आम्ही सगळे भारतात राहणारेच.
वेळ मिळाला तर हे पण वाचा.
धन्यवाद. वाचले. पण काही गोष्टी नाही समजल्या. Brinjal, ladyfinger, capsicum हे भारतीय शब्द आहेत? curd आणी yoghurt वेगवेगळे नाहीत का?
ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
मि पा वर गोष्टी अश्या मनावर घ्यायला लागलो तर झाले माझे कल्याण. हळुच घेतले. का. न. आणि असेही मोठ्या माणसांच्या सल्ल्यावर किंवा कानपिचक्यांवर मी चिडत नाही :)
<<<Brinjal,
In reply to पाण्याबाहेर राहूनच पोहणे by मृत्युन्जय
Brinjal, ladyfinger,
त्याला अनुक्रमे एग प्लँट आणि ओक्रा असे म्हणतात ना? म्हणजे अमेरीकेत म्हणतात...वरील कदाचित इंग्लंडाचे इंग्लिश असेल..
इंग्लंडात वांग्याला aubergine
In reply to <<<Brinjal, by शिल्पा ब
इंग्लंडात वांग्याला aubergine आणि भेंडीला ocra (शी! घाणेरडे) म्हणतात.
आणि भोपळ्या मिरचीला pepper आणि दह्याला yoghurt (उच्चारी यॉगट) म्हणतात.
अरेरे.... काय हे त्यापेक्षा
अरेरे.... काय हे त्यापेक्षा सिंगापुर बरे...
शिखर सिंगापुर ?
In reply to अरेरे.... काय हे त्यापेक्षा by अवलिया
शिखर सिंगापुर ?
सनी सिंगापुर असेल...
In reply to शिखर सिंगापुर ? by परिकथेतील राजकुमार
सनी सिंगापुर असेल...
जय
In reply to सनी सिंगापुर असेल... by असुर
जय सिंगापुरसुद्धा असेल.... ;)
एव्हढ्या प्रगत देशातही
एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!! ?
पुरश्यांनासुध्दा सामानांनी भरलेल्या पिशव्या वहाव्या लागल्याच कि. त्यांच्या कष्टांना नाही कोणी अरेरे म्हणंत.
छे .. छे .. प्रगत देशातही मागासलेले पुरुश आहेत हे वाचून बघून डोळे पा . . ले.
आपण जर्मनीत असता याची दखल
आपण जर्मनीत असता याची दखल घेतली आहे.