Skip to main content

भुतं- खेतं... अस्तित्वात आहेत की नाहीत व असल्यास कुठे?

लेखक स्पा यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2345
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>अदिती ही देवांची आई मला वाटतं अदिती ही सूर्याची आई. अदितीचा पुत्र तो आदित्य. तसे डोक्याच्या तापमानावरून ते बरोबरच आहे म्हणा !!!

In reply to by नितिन थत्ते

अदितीचा पुत्र तो आदित्य.
थत्ते चाचा असे एक नाही बारा आदित्य होते ;)

भुतं नसती तर आयुष्य बेचव झालं असतं असं स्पष्ट मत आहे. ;)

जळीस्थळी. >>भुतं स्मशानाच्या वरच्या पॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये असतात ..... हे स्मशानाच्या वरचं पॉइंटेड स्ट्रक्चर सध्या शोधत आहे. आमच्या टीम लीडने टार्गेट दिलंय. येत्या अवसेच्या आत हे जो शोधून काढेल, त्यानेच अप्रेझलमध्ये चांगल्या ग्रेडची अपेक्षा ठेवा अशी तंबी दिलीये.

भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो. परवा पराच्या कॅफेवर जात होतो तेव्हा तो कुणाला तरी "बैस जरावेळ... येईलच ते भुत इतक्यात "असं म्हणाला. आत जाऊन पाहिलं तर बिपीन बसला होता तो मला म्हणाला "ये तुझीच वाट पहात होतो."

In reply to by अवलिया

>>भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो. +१, हेच म्हणतो. वर उल्लेखलेल्या घटनेनंतर काही वेळाने मी ही पराच्या नेटकॅफेवरुन जात होतो, तेवढ्यात आतुन आवाज आला "निघतो रे च्यायला, नायतर ते भुत इथे हजर होईल व उगाच डोके खाईल". मी आत जाऊन डोकाऊन पाहिले तर नान्या चपला घालत होता. वर मला पाहुन "हॅ हॅ हॅ, आत्ताच तुझी आठवण काढली, १०० वर्ष आयुष्य आहे" अशी मखलाशी करत होता ही बाब अलहिदा ;)

In reply to by छोटा डॉन

मी आत जाऊन डोकाऊन पाहिले तर नान्या चपला घालत होता.
सुलट्या पायांत की उलट्या पायांत?

In reply to by प्रियाली

सुलट्या पायांत की उलट्या पायांत?
आम्ही भुताभुतातल्या अंतर्गत आणि शिक्रेट गोष्टी अशा जाहिरपणे सांगत नसतो. तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा जन्म पुण्यात मिळतो म्हणे ;)

In reply to by छोटा डॉन

तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा जन्म पुण्यात मिळतो म्हणे
नाहीतर अमेरिकेतले लोकं डूख धरून रहातात! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची भुतं - हडळी पुण्याच्या राशीला का लागली आहेत काय महिती :(

In reply to by परिकथेतील राजकुमार

शांती करुन टाका आज सर्वपित्रीची.. वरिजीनल पाली भाषेतली अब्राह्मण तांत्रिकाची पोथी गावली आहे तिच्या सहाय्याने करु.. म्हणजे परत ब्राह्मणी कर्मकांड असा आरोप पण होणार नाही..

In reply to by अवलिया

आजच कॅफेसमोरची जागा साफसुफ करुन घेतो. (ती जागा साफसुफ करुन घ्यायची आहे असे नुसते कानावर आले तरी अनेक स्वयंसेवक हजर होतील)

In reply to by अवलिया

आज सकाळी " पवई " तलावाच्या काठावर जवळ जवळ १, २ हजार " भैये टक्कल करून सर्वपित्री अमवस्या साजरी करत होते....... जिकडे बघवे तिकडे नुसती टकले चमकत होती.......... एवढे टकले पहिल्यांदाच बघितले..... ;)

In reply to by स्पा

टकलावर चांगले मलईचे दही ठेवले असते तर चटकन आले असते... मुंबैचे गुर्जी कल्पक नाहीत असे आमचे प्रांजळ मत आहे.

In reply to by अवलिया

टकलावर चांगले मलईचे दही ठेवले असते तर चटकन आले असते... मुंबैचे गुर्जी कल्पक नाहीत असे आमचे प्रांजळ मत आहे.
तसं नाही. टाळूवरचं लोणी खाण्याच्या खालच्या पातळीवर मुंबईतले कावळे सुद्धा उतरत नाहीत, हे खरं कारण.

In reply to by अवलिया

इतक्या देशांतले कावळे बघितले... कुठेच ही प्रथा दिसली नाही. तुम्हाला ती कल्पना सुचली म्हणजे तुम्हीच ती पाहिली असेल. किंवा तुमची ओरिजिनल आयडियाही असू शकेल.

In reply to by छोटा डॉन

आम्ही भुताभुतातल्या अंतर्गत आणि शिक्रेट गोष्टी अशा जाहिरपणे सांगत नसतो. तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा जन्म पुण्यात मिळतो म्हणे
पुण्यात पूर्वजन्मीची अक्करमाशी भुतंच राहातात हे तुम्हीच म्हणालात म्हणून बरं... मांजरीची नखं पिलांना लागत नाहीत म्हणतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो आमचं पुण्याविषयी एक अक्षरही काढण्याचं धार्ष्ट्य नाही. पुणेकरच काय बोलतात याचा अभ्यास चालू होता. आता डान्रावांना तुम्ही हक्काने पुणेद्वेष्टे म्हणू शकता, तसं म्हटलंही तुम्ही. माझी काय बिशाद?

S.P.A. ( Sarva Pitri Amavasya ) च्या दिवशी सर्व भुते 'कौला'वर बसून असतात.

'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ सामंताचे पुस्तक चाळत होतो. त्यात 'सुक्ष्मदेह’ 'स्थुलदेह' अशी काहीतरी भानगड वाचली. आपण झोपलेले असतो, बेशुद्धावस्थेत असतो, अगदी मरणाच्या दारावर असतो, तेव्हा कधीकधी माणसाचा सुक्ष्मदेह हवेत तरंगत त्या स्थूल देहाकडे पाहत असतो. सुक्ष्मदेह त्या स्थुलदेहात परतल्यावर त्याला तरंगत असतांनाच्या पाहिलेल्या सर्व गोष्टी आठवतात, असे वाचले आहे. तेव्हा तो त्यातलाच तर प्रकार नसावा ना ? :) असो, मागे अनेकदा सांगितले आहे. पुन्हा सांगतो. आमचा भूताखेतांवर विश्वास नाही. पण जिथे भूते वगैरे आहेत. काहीतरी असल्याचा भास होतो, वगैरे असे कोणी म्हणत असेल तर त्याबाबत खात्री करण्याची आपण कोणतीही रिस्क घेणार नाही. :) -दिलीप बिरुटे [डरफोक]

In reply to by अवलिया

आपली मराठी भाषेविषयीची काळजी पाहता 'डरपोक हा शब्द हिंदी की मराठी ? आपण मराठी भाषेतील तज्ञ दिसता म्हणून शंका ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ नाही की तिच्या अस्तित्वाची काळजी करत नाही. दुसर्‍या कोणत्याही भाषेतला शब्द वापरायचा तर योग्य वापरावा असे कुणीतरी सांगत होते म्हणुन खरडप्रपंच.... तुम्हाला डरफोक असा शब्द वापरायचा असेल तर जरुर वापरा... शेवटी काय तुम्ही प्रा डॉ.. ;)

In reply to by अवलिया

अरे रे ! देशोदेशीच्या बार मध्ये ज्यांच्या ज्ञानाचे गोडवे गायले जातात ते सदस्य असे एकमेकांशी गर्तेतल्या पातळीवर वाद घालताना बघुन शरम वाटली.

आम्ही भूतांना केवळ दर पाच वर्षांनीच बघतो. आमच्या येथील एक भूत दर पाच वर्षांनी दिसते, कोणाला बघायचे असेल तर मी कळवितो, DIGITAL CAMERA घेऊन या, आणि भरपूर फोटो काढा.आणि टाका इथे टाका.

अशा सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर भुते आहेत का आणी कुठे आहेत, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील!