सहजसुंदर ओघवती ग़ज़ल. चांगली आहे. बर्याच महिन्यांनी जवळपास वर्ष-दीड वर्षांनी तुझी ग़ज़ल वाचली. समाधान वाटले.
बेलाशी आम्ही सहमत आहोत. तुझे इतर काव्य ज्यांनी वाचले आहे, त्यांचे मत बहुधा तसेच असणार. पण त्यात वैषम्य वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक ग़ज़ल पराकोटीच्या उंचीला नेणे ग़ालिबलाही जमलेले नाही. म्हणूनच
रेख़्तेके तुम ही उस्ताद नही हो 'ग़ालिब'
कहते है अगले ज़माने में कोई मीर भी था...
प्रतिक्रिया
पहिली आणि दुसरी
द्विपदी विशेष. पण तुझ्याच इतर रचनांच्या तुलनेत ही रचना तितकीशी उजवी वाटली नाही :(
(वाचक)बेसनलाडू
सुंदर...!
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
सुंदर...!
तात्या.
छान
छान कविता ओकार.
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
मस्तच !
छान आहे पण
छान आहे
पण मजा नाही आला :(
छान
काव्य रचना सु॑दर जमली आहे.
छान, सुरेख काव्य!
जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
ह्या दोन द्विपदी विशेष भावल्या.
(अशोककुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' च्या चालीत फिट्ट बसतंय! :))
चतुरंग
ही ही ही
In reply to छान, सुरेख काव्य! by चतुरंग
म्हणून पाहिले (मनातल्या मनात) :))
वा
वा ॐकार,
सहजसुंदर ओघवती ग़ज़ल. चांगली आहे. बर्याच महिन्यांनी जवळपास वर्ष-दीड वर्षांनी तुझी ग़ज़ल वाचली. समाधान वाटले.
बेलाशी आम्ही सहमत आहोत. तुझे इतर काव्य ज्यांनी वाचले आहे, त्यांचे मत बहुधा तसेच असणार. पण त्यात वैषम्य वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक ग़ज़ल पराकोटीच्या उंचीला नेणे ग़ालिबलाही जमलेले नाही. म्हणूनच
रेख़्तेके तुम ही उस्ताद नही हो 'ग़ालिब'
कहते है अगले ज़माने में कोई मीर भी था...
असे त्यांनी लिहिले असावे. असो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com
सुंदर...
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...