संघ आणि सिमी सारखेच : भावी पंतप्रधान राहुलजी यांच्रे परखड बोल
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र, युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही.
http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm
हे विचार मननीय आहेत. उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे, सळसळत्या उत्साहाचे, गोरेपान उमदे, तरणेबांड राजपुत्र ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे असे अभिमन्यू देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच.
सिमी ही बेकायदा संघटना आहे. तिच्यावर कायद्याने बंदी आहे. युवराज राहुलजी रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील? आपणास काय वाटते? सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे?
त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल.
आपणास काय वाटते?
ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला. युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते.
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.
प्रतिक्रिया
मोघम
अवांतरः संघाची एक आठवण
वाचत आहे, हळूहळू चर्चा गंभीर
सिमी आणि संघ ह्यांच्या साम्यापेक्षा
संजय झाला आता संजयच्या
:)
संघाची पातळी !!
निषेध!
ह्म्म्म
बातमी
असेच म्हणतो, पण
घाऊक द्वेष
मूठभर
मूठ
केवळ..
केवळ
मग?
+१
पुन्हा तेच
नितिन थत्ते
कुजबूज
आँ??
टाईम प्लीज.
राहुल गांधीचे विचार
मुस्लिम आणि उच्चवर्णीय असे
बालिश विधान की
Pagination