माननीय विजुभाऊ ह्यांस नम्र विनंती, की त्यांनी आम्हा अज्ञ पामरांस रा.स्व.सं. आणि सिमी हे दोन्ही सारखेच कसे ते समजावुन सांगावे जेणेकरुन आमच्या अज्ञानतिमीरात ज्ञानदीप प्रज्वलीत होईल.
धन्यवाद.
खरे आहे. राहुलजी यांचे म्हणणे बरोबर असावे म्हणजे असे की रास्वसंघ किंवा सिम्मी किंवा तत्सम कोणतीही संघटना एकाच पद्धतीने काम करते. जिज्ञासुंनी सोसायटीज अॅक्ट, ट्रस्ट अॅक्ट, किंवा कंपनी कायद्याखाली असलेल्या निधी कंपन्या (सेक्शन २५) चा अभ्यास करावा.
फरक असलाच तर त्यांच्या मेमोरेंड्म नुसार असलेल्या विचारधारेत.. त्याचा विचार राहुलबाबा करु शकत असेल असे मला वाटत नाही. असो.
म्हणजे संघ अगती तंतोतंत सिमी सारखा नसेल, पण सिमी सारखं होण्याकडे चाटचाल सुरू आहे असं राहुलजींना म्हणायचं असाव.
आपणही काही कमी आहोत की काय? शेवटी जशास तसे उत्तर द्यायला नको का?
.आपल्याला समता प्रस्थापीत करायची आहे नाही मित्रांनो ?
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र,
सहमत
युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी
सहमत
यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही.
माहित नाही.
http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm
हे विचार मननीय आहेत.
सहमत
उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे
सहमत
सळसळत्या उत्साहाचे,
सहमत
गोरेपान उमदे,
सहमत
तरणेबांड राजपुत्र
सहमत
ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे
सहमत
असे अभिमन्यू
असहमत अर्जुन म्हणा.
देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच.
सहमत
सिमी ही बेकायदा संघटना आहे.
माहित नाही.
तिच्यावर कायद्याने बंदी आहे.
माहित नाही.
युवराज राहुलजी
सहमत
रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील?
माहित नाही.
आपणास काय वाटते?
^&^%*&% *^%*र्*&%* %%^) (&_(&_( &^$^%$^&
सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती.
सहमत
इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे?
माहित नाही.
त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल.
माहित नाही.
आपणास काय वाटते?
पुन्हा ^&^%*&% *^%*र्*&%* %%^) (&_(&_( &^$^%$^&
ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला.
युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते.
हॅ हॅ हॅ हॅ हॅ
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.
सहमत
कोण राहूल गांधी??
धन्यवाद..
(स्वयंसेवक) तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
नागरीकशास्त्रात कधी तरी शिकल्याचे आठवते की भारतात जी काही सात का अशीच काही स्वातंत्र्ये आहेत त्यात एक भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून. :-)
आता सुब्रम्हण्यम स्वामी त्याच स्वातंत्र्याचा अगदी त्यांच्या राजकीय पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर वापर करत सोनीया बाईंना इटालीयन म्हणतात तसेच त्यांच्या देशविघातक कृत्याची चर्चा करतात, तसेच राहूल-प्रियांकाच्या इटालीयन आहेत. राहूल गांधींकडे व्हेनेझुएलन पासपोर्ट पण आहे असे म्हणतात.
थोडक्यात राहूलजींकडे कितीही देशांचे पासपोर्ट असले तरी त्यांना भारतात भाषणस्वातंत्र्य आहे ;)
आता सुमार केतकरांनाचा सांगा एखादा अग्रलेख लिहायला राहुल बाबाच्या विधानांवर
राहुलबाबाचे थोर विचार प्रकटन झाल्यावर लगेचच केतकरांचा लेख प्रसवून झाला देखिल असेल आत्तापर्यंत ............प्रकाशित करण्यासाठी दिवसभर थांबावे लागल्याने अत्यंत व्यथित असावेत बहुदा.....
फरक असलाच तर त्यांच्या मेमोरेंड्म नुसार असलेल्या विचारधारेत.. त्याचा विचार राहुलबाबा करु शकत असेल असे मला वाटत नाही.
सहमत
ह्या घराण्यात कोणालाही 'नैसर्गीक मरण नाही' असा शाप आहे ना !
सहमत...............
<सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त
स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. >
च्यामारि आमि समझत व्हतो तो? निकाल कोर्टान दिला हाय!
तवा आमि गप.......बसलो
आमाला काय ? माहित हे दोघ माय पुत
आमच्या देवाच्या जागा बि आमाला.
हे (............) देनार हाय..
तर आमि दुसर्या एकाला भि निवडुन दिल ..
नसत ना..हो. :party:
>>च्यामारि आमि समझत व्हतो तो? निकाल कोर्टान दिला हाय!
आवं कोरट, संसद, पंतप्रधान ही समदी कठपुतळी हायत. त्या समद्यांचा बोलविता धनी, आपलं बोलविती धनीण एकच आहे ती म्हंजी आप्ल्या देशाची राजमाता.
एकदा का राजेशाही आपलीशी केली की मंग समदे निर्णय थितंच घेतले जात्यात. बाकीच्या सौंस्था फकस्त त्यांचा निरुप आपल्याला ऐकिवत्यात. म्हंजी ऐकनार्यालाबी बरं वाटतंय. समदं एकीच्याच तोंडून ऐकत र्हायल तर लई बोर होतंय.
जै राजमाता! जै जै युवराज!
युवराजांचे हेही बोल वाचा.
http://72.78.249.125/esakal/20101006/5121758385095168637.htm
सध्याचे पंतप्रधान माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहेत असे राहुलजी म्हणाले. इतक्या लहान वयात इतकी समज दुर्मिळच आहे. जिथे जाऊ तिथे लोक पाया पडत आहेत, राजकुमार, प्रिन्स, शाह्जादा वगैरे नावाने बोलावत आहेत. तरीही इतका विनम्रपणा कसा येतो या विभूतींमधे? अर्थात शेवटी ही पुस्ती जोडली आहे की भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही. म्हणजे बघा कशी समज आहे. विनम्रपणाबरोबरच हा मुत्सद्दीपणाही! इतका मुरब्बी राजकारणी! कित्येकांना सगळी हयात राजकारणात काढल्यावरही इतकी प्रगल्भता येत नाही ती राहुलजींनी इतक्या अल्पवयातच हासिल केली.
मला तर इतके भरून आले आहे की वाटते त्या म्हातार्या पंतप्रधानाची गचांडी धरून उचलबांगडी करावी आणि तात्काळ त्या गादीवर युवराजांचा राज्याभिषेक करावा! असो. थोडा धीर धरावा. म्हटलेच आहे सब्र का फल मीठा होता है
सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नही, आकाश भी नहीं था,
छिपा था क्या, कहां, किसने ढका था, उसपल तो, अगम अटल जल भी कहां था
(डिस्कव्हरी ऑफ इंडिया टायटल थीम)
वरील चालीवर हे म्हणा:
सृष्टी से पहले पक्ष नहीं था, कॉंग्रेस भी नहीं, भाजप भी नहीं, संघ भी नहीं था
छिपा था क्या, कहां किसने ढका था, उसपल तो अटल तो क्या, राहूल भी कहां था..
हे राहुल ह्यांचेच मत नाही, तर समाजशास्त्रज्ञ आणि भारताच्या अभ्यासक मार्था नसबॉम ह्यांचेदेखील मत आहे. त्यांच्यामते, सॅम्युअल हंटिंगटनची क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन थियरी "मुस्लिम आणि पाश्चिमात्य" ह्यांच्याबद्दल नाही, तर शुद्धतेचा (प्युरिटी) आग्रह धरणारे, आणि प्राग्माटिक (प्रतिशब्द) लोक ह्यांच्याबद्दल आहे.
संघ/विहिंप/बजरंगदल आणि सिमी/लष्कर/अलकैदा दोन्ही शुद्धतेचा आग्रह धरणारे आहे.
(मसंचेच उदाहरण द्यायचे झाले, तर उपक्रम/मनोगत आणि मिसळपाव ह्यांच्यात क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. कडवे उपक्रमी/मनोगती, आणि चलता है म्हणणारे मिसळप्रेमी ह्यांच्या विचारसरणीत शुद्ध आर्य संस्कृतीवाला हिटलर आणि मेल्टिंग पॉट वाले अॅलाईज ह्यांचे प्रतिबिंब दिसते.)
(सदर लेख/काथ्याकूट १०० वरून २०० कडे जावा ही तो श्रींची इच्छा.)
पण सिमी चा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय आहे तसा संघाचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय कुठे आहे? संघाच्या काही अतिरेकी कारवाया देखील नाही आहेत.
हा मोठ्ठा फरक नाही का?
तत्त्वज्ञान एकच असले तरी त्यातून उद्भवणारी कृती वेगळी.
संबंध असल्याचा संशय, हा संशय घेणार्यावर अवलंबून आहे.
अनेकांना, माझा माझ्या कुटुंबाशी संबंध असल्याचा संशय आहे. पण ते तसे व्यक्त करत नाहीत.
तत्त्वज्ञान एकच असले तरी त्यातून उद्भवणारी कृती वेगळी.
संबंध असल्याचा संशय, हा संशय घेणार्यावर अवलंबून आहे.
अनेकांना, माझा माझ्या कुटुंबाशी संबंध असल्याचा संशय आहे. पण ते तसे व्यक्त करत नाहीत.
ते म्हणाले आपल्या भारताला किनई सग्ग्ग्ग्गळ्यात जास्त धोका कुठला आहे? तर तो म्हणजे भगव्या दहशतवादाचा. तो भगवा दहशतवाद म्हणजे सिमी, तोयबा लोकांचा नाही काही. तो तर हिरवा दहशतवाद. मग भगवा कुठला बरे? त्यात रा स्व संघ येते बरं का. त्यांचा झेंडा किनई भगवा असतो आणि ते जे काही करतात त्यालाच दहशतवाद म्हणतात.
२६/११ चा हल्ला, संसदेवरील हल्ला, शेकडो बॉम्बस्फोट हे काही दहशतवाद नव्हे. तो नुस्ताच खट्याळपणा.
सिमी चा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय आहे तसा संघाचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय कुठे आहे? संघाच्या काही अतिरेकी कारवाया देखील नाही आहेत.
संघाचा संबन्ध कशाशीच नसतो. तो भाजपशी नसतो , बजरंगदलाशी नसतो , विहिंप शी नसतो , अभाविप शी नसतो.
एक फरक आहे. संघ परीवारातील काही संघटना राज्यकर्ते आहेत.
हे वर्गीकरण योग्य वाटतं. आमचं जे पूर्वापारपासून चालू आहे ते खरं मानणारे सनातनवादी, विरुद्ध नवीन सत्य काय निपजतं आहे ते स्वीकारू म्हणणाऱ्या सुधारकांचा वाद कायमच चालू आहे.
मिभोंना सूचना - तुम्ही एक वर्गीकरण करून कोण कुठच्या बाजूला येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मोठी डिटेलवार यादी का नाही करत? म्हणजे अनेक विभूती (उदाहरणार्थ शिवाजी वगैरे) कुठच्या टीममध्ये आहेत ते कळेल व लोकांना आपली टीम निवडणं सोपं पडेल.
सदर लेख/काथ्याकूट १०० वरून २०० कडे जावा ही तो श्रींची इच्छा
अवांतर: आजकाल मिभो धाग्यांच्या लांबींकडे बारीक लक्ष ठेवून असतात असं दिसतंय :) 'आमचे येथे लांबी वाढवून मिळेल' हे वाक्य सहीत कसं वाटतं? (मिभोंनी भलतेच अर्थ काढू नयेत. काढल्यास हलक्यानेच घ्यावेत. आम्हाला विरजणाची भीती वाटते)
नेहरू -गांधी घराण्याचे उपकार विसरण्याचा कृतघ्नपणा
भारतासारख्या देशात सर्वसामान्य माणसावर नेहरू आणि गांधी घराण्याचा असलेला पगडा अगदी योग्य आहे.
परमेश्वरावर विश्वास ठेवणारे प्रत्यक्ष दिसत असलेल्या परमेश्वर स्वरूप माणसावर विश्वास का ठेवत नाहीत हे तो एक परमेश्वरच जाणे.
इतिहासाची पाने डोळसपणे वाचली तर या घराण्याने भारतावर केलेल्या उपकाराची यादीच डोळ्यापुढे येते. फक्त वाचण्याची इच्छा पाहीजे.
मोतीलाल नेहरू पासून आताच्या राहूल पर्यंत हे घराणेच देशासाठी आपले सर्वस्व बहाल करणारे आहेत. काही नतद्र्ष्ट लोक त्यांच्यावर टीका करतात. सुशिक्षित लोकामध्ये या घराण्याला नावे ठेवण्याची फॅशन तशी जुनीच आहे
यथा यथा ही धर्मस्य ... हा श्लोक आठवावा. तो सध्या प्रत्यक्षात येत आहे. .
राजपुत्राच्या पगल्भतेचे एकच उदाहरण बोलके आहे.
मध्यंतरी त्यांची मुंबैची भेट आठवा. सन्माननीय गृहराज्यमंत्र्यांनी त्यांच्या पादुका जीवापलीकडे जपल्या. तो एक प्रतिकात्मक स्वरूपाचा एकनिष्ठ असलेले दाखविण्याचा प्रकार होता, पण तथाकथित सुशिक्षितांनी त्याच्यावर टीका केली. खरं म्हणजे त्याना (राहूलना) पण तो प्रकार आवडला नव्हता. पण लोकांमधून निवडून आलेल्या एका नेत्याच्या मताला मान देउन त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. अवघ्या वयाच्या चाळीशी मध्ये किती मनाचा मोठेपणा? पण आमच्या विचारवंताना फक्त काळी बाजूच पहायची संवय त्याचे काय करणार?
असा हा प्रगल्भ आणि धोरणी राजकारणी, गरीबांच्या घरी जाणारा, त्यांना मुक्त हस्ताने सरकारी पैसे देणारा, सामान्यांप्रमाणे मुंबई च्या लोकल मधून जीवाची बाजी लावून फिरणारा,रा.स्व.सं. ची विचारसरणी मान्य नसूनही त्यावर उदार पणे बंदी न घालणारा असा थोर नेता काही थोड्याच दिवसात आपला पंतप्रधान होणार या परते भाग्य ते कोणते.
त्या च्याहाती देशाचे सुकाणू देउन आपण सुखाने चार दिवस राहू शकू. त्यांचे पोटभर राज्य करून झाले की, तो पर्यंत त्यानाही पुत्र किंवा पुत्री होईलच ना? मग निर्धास्त रहा.
त्याना राजपुत्र म्हणून हिणवण्यार्या तथाकथित विचारवंताच्या बडबडीकडे दुर्लक्ष करणे हाच यावर शहाणपणाचा उपाय आहे. त्या विचारवंताचा निषेध करणे सुद्धा त्यांना महत्व देण्यासारखे नाही का?
रा. स्व. संघाच्या बर्याच निती/कृती वादग्रस्त आहेत. त्यांचे तत्वज्ञान पटणारे, अजीबात न पटणारे, थोडेफार पटणारे, असे सर्व कॅटॅगरीचे लोक आढळतील. पण त्यांना सीमीच्या मापाने मोजणे म्हणजे खरच बालीशपणा/अपरीपक्वता/लांगुनचालन.. काहिही म्हणा..
दोघांमध्ये मूळ फरक हा कि एक (रा. स्व. सं) भारताला आपलं घर मानते आणि आपल्या घराची संस्कृती एका विशिष्ट पद्धतीची (अनेकांना पटो वा ना पटो) असावी या साठी प्रयत्न करते. सीमी भारताला शत्रुभूमी मानते (म्हणुनच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी आणली) आणि परकीय संगनमताने या भूमीवर आक्रमण करण्याचे मनोरथ रचते.
इतर फरक म्हणाल तर संघाचे सामाजीक कार्य वादातीत आहेत. भारतीय मजरूर संघ (बी एम एस) संघटना मी फार जवळून बघितली आहे आणि तिचं महत्व आर्थीक/उद्योग क्षेत्रातले लोकं नक्कीच जाणत असतील. (दत्तोपंत ठेंगडी इ. व्यक्तींना तर पद्मश्री देण्याचा केंद्राचा विचार होता म्हणतात... खरे खोटे देव जाणे) संघाचे उत्तर्-पुर्व राज्यातील व इतर आदिवासी क्षेत्रातील कार्य तर इतकं मोठं आहे कि ते प्रदेश आज जे काहि थोडंफार भारताशी नातं ठेउन आहेत ते संघामुळेच ( अशी अतिशयोक्ती संघवाले फार करतात... पण त्यात तथ्य आहेच). आणि सर्वात मुख्य... संघ हि भा.ज.प. ची मातृसंस्था आहे. विरोध असला तरी एका तुल्यबळ (??) राष्ट्रीय पक्षाच्या मातृस्थानाची सीमी शी तुलना करणे म्हणाजे त्यांना आईचि शिवी देण्या सारखं आहे... अत्यंत चुकीचे आणि असंस्कृत.
राहुल गांधीं कडुन फार अपेक्षा आहेत. एकतर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस ऑपरेट करु शकत नाहि, आणि कॉग्रेस शिवाय भारताच्या राजकीय संस्थेचा विचार देखील कोणि करु शकत नाहि. राहुलजी हि जवाबदारी ओळखत असतील. राहुलजींच्या रुपाने कॉग्रेस नेत्रुत्वाची नवी पिढी तयार होते आहे (ज्याचा भा.ज.पा. मध्ये प्रचंड अभाव आहे). त्यांच्याकरता स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय ट्रेनींग प्रोग्राम राबवीला जात आहे. राहुलजींचि मातोश्री डोळ्यात तेल घालुन आपल्या मुलाला या देशाची कमान सांभाळायला तयार करते आहे. राहुल गांधी एक दिवस (ते ही लवकरच) या देशाचे प्रधानमंत्री होतील यात शंका नाहि. इतक्या सगळ्या जबाबदारीच्या, जोखमीच्या आणि कर्तुत्वाचा कस बघणार्या पोझीशनचा दावेदार व्यक्ती तेव्हढाच खोल, सावध आणि दुरदृष्टीचा असावा अशी एक भारतीय म्हणुन इच्छा - अपेक्षा आहे. सध्या तरी राहुलबाबांना अजुन तयारीची गरज आहे असं वाटतं.
(भारतीय) अर्धवटराव
अर्धवटरावांशी सहमत.
सर्वात मुख्य... संघ हि भा.ज.प. ची मातृसंस्था आहे संघ भाजपची जबाबदारी घेत नाही.
(रा. स्व. सं) भारताला आपलं घर मानते आणि आपल्या घराची संस्कृती एका विशिष्ट पद्धतीची (अनेकांना पटो वा ना पटो) असावी या साठी प्रयत्न करते. १००% सहमत.
भाजप मध्ये प्रमोद महाजनांच्या नन्तर प्रचंड पोकळी आहे. ते वाजपेयींप्रमाणेच सरमान्य होते. मोदींक्डे तो करीष्मा अजून तरी दिसला नाही.
सिमी बरोबर संघाची तूलना आणखी एका गोष्टीमुळे होऊ शकणार नाही कारण सिमी कडे असलेला कडवा, अशिक्षीत वर्ग.
हिंदू पैकी असा वर्ग कधीच संघाच्या सोबत नव्हता.
पोट भरण्याची चिन्ता असणारा हिंदू आधी पोटोबा मग विठोबा या स्पष्ट भूमिकेत वावरत आलेला आहे.
नोकरी धन्दा सोडून समाज कार्य करायला जाणारे किती टक्के हिन्दू तरून दिसतात. या उलट अनेक मुस्लीम तरूण त्यांचे उद्योग धन्दे बंद करून ४० दिवस "जमात" मधे शामील होताना दिसतात. मदरशांत रहाणार्या या तरुणाना ते कितीही शिक्षीत असले तरी ही घरात रहाणार्या उद्योग धन्धा सम्भाळणार्या हिंदू तरुणांच्या तुलनेत भडकवणे सोपे असते.
हा असा वर्ग रास्वसंघाच्या कडे फारच मर्यादीत स्वरुपात आहे.
सिमी जितक्या प्रमाणात तरूणाना आकर्षीत करून घेते तितक्या प्रमाणात संघ तरुणाना आकर्षीत करून घेण्यास यशस्वी होत नाही
पोट भरण्याची चिन्ता असणारा हिंदू आधी पोटोबा मग विठोबा या स्पष्ट भूमिकेत वावरत आलेला आहे.
म्हणजे हिंदू असल्याने ते असे वागतात असे म्हणायचे का?!
याचे उलट म्हणजे मुसलमान आधी पोटोबा मग अल्लाह असे करत नाहीत असे म्हणायचे का? हे असे फरक धर्मामुळे पडतात का? असो.
त्यापेक्षा संघाने अशा हिंदूंना मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, असे म्हणणे लॉजिकल होईल असे वाटते.
हा असा वर्ग रास्वसंघाच्या कडे फारच मर्यादीत स्वरुपात आहे.
सिमी जितक्या प्रमाणात तरूणाना आकर्षीत करून घेते तितक्या प्रमाणात संघ तरुणाना आकर्षीत करून घेण्यास यशस्वी होत नाही
हे बाकी खरे.
मागे एकदा सेवादलाबद्दल तिथे तरुणांची लग्ने जुळत असे ऐकले होते. 'सिमी' काय करते माहिती नाही. पण संघाने तरुणींनाही नेहमीच्या शाखांमध्ये प्रवेश दिला तर बहुतेक तरुणांची भरती होईल असे वाटते. ;)
आता मिळतो आहे मार - दोन्हीकडून, तेव्हा पळते.
त्यामुळेच ते संघिष्ठांचे "हेवादल" आहे, असा एक विचार चाटून गेला.
(ह घेऊ नका. एक एक्स-संघिष्ठ, ओटीसी केलेल्या माणसाचे (?) स्वानुभव आहेत हे.)
(ओटीसीत दर सकाळी रुमाल कडक झालेले असतात.)
सध्या सेवादल सरकारात आहे. त्यामुळे हेवा हा चालूच आहे.
(भाजपचे सरकार आले, तेव्हा बरेच स्वयंसेवक मलिद्याच्या आशेने तिकडे गेले. उरलेल्या संघिष्ठांनी हेवाच केला. संघाचे सर्वाधिक नुकसान भाजप सत्तेत आल्याने झाले, असे संघिष्ठांकडूनच ऐकले आहे.)
वत्सले मातृभूमे, पोटात घे ह्या अज्ञ बालकाला.
काटकुळे पाय दाखवणार्या खाकी चड्ड्यांचा हेवा करणारी एक संघटना पुनरोदित होते आहे, ह्याची मला काहीच कल्पना नव्हती.
प्रतिक्रिया
काय फरक आहे ते सांगा ना?
विनंती.
सहमत.
हॅ हॅ हॅ.. धमालराव कोणाकडे
खरे आहे. राहुलजी यांचे म्हणणे
शेवटी समानता हवीच
भारताच्या एकमेव राजघराण्यातील
सगळे सारखेच
हा हा
राहुलजी हे लवकरच
प्र.का.टा.आ.
कोण राहूल
=)) =)) तात्या म्हणजे ना
तात्या म्हणजे ना अगं
भाषण स्वातंत्र्य
विकिन
अॅक्सिस
आता सुमार केतकरांनाचा सांगा
या घराण्यात...
वाचा हो .......वाचा............
>>च्यामारि आमि समझत व्हतो तो?
पंतप्रधान माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहेत
हे हे हे
सृष्टी से पहले सत नहीं था,
मार्था नसबॉम
एय्य?
अवांतर प्रश्न
अधिक माहितीसाठी
एकंदरीत फारच क्लेश आहे सध्या
मला वाटते...
क्लेश
पण सिमी चा अतिरेक्यांशी संबंध
तत्वज्ञान
तत्वज्ञान
आपले थोर गृहमंत्री काय म्हणाले आठवते का?
सिमी चा अतिरेक्यांशी संबंध
शुद्धतेचा आग्रह व सर्वसमावेशक
विभूती
यथा यथा ही धर्मस्य ...............
यदा यदा ही धर्मस्य:
पुत्र पुत्री???
बी एम एस आणि वनवासी योजना !!
अर्धवटरावांशी सहमत. सर्वात
:)
मागे एकदा सेवादलाबद्दल तिथे तरुणांची ...
हे हे हे
जरा वर्तमानात या
सध्या
अच्छा!
छान