मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्टफ्ड मशरूम्स

स्वाती२ · · पाककृती
साहित्य १२ मोठे बटन मशरुम्स २ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा २ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर ६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या १/२ टी स्पून मिरे बारीक करुन १/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड २ टे. स्पून परमेजान चीज १/२ कप मोत्झारेला चीज १ टी स्पून तेल कृती ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता. बारीक चिरलेली कोलंबी घालून १-२ मिनिटे परता. मिरे पावडर, इटालियन सिझनिंग,परमेजान चीज घालून नीट ढवळा आणि आचेवरुन बाजुला काढा. मिश्रण थोडे गार झाले की एका बेकिंगडिश ला तेलाचा हात लावून घ्या. मशरुम मधे तयार केलेले मिश्रण भरुन डिश मधे ठेवा. डिश तापलेल्या ओवनमधे ठेवून १५-२० मिनिटे बेक करा. बाहेर काढून मशरूम्सवर मोत्झारेला चीज भुरभुरवा आणि परत डिश ३-४ मिनिटांसाठी ओवनमधे ठेवा. चिज वितळले की बाहेर काढून गरमच वाढा. वरील प्रमाण ३ जणांना अपेटाइझर म्हणून पुरेसे आहे.

वाचने 4173 वाचनखूण प्रतिक्रिया 16

योगप्रभू Mon, 10/04/2010 - 17:49
ही सुंदर डिश माझ्यासारख्या मश्रुम आणि कोळंबी दोन्हीचाही चाहता असणार्‍यासाठी आनंदाचा ठेवा. वॉव :) हावरट म्हणा नायतर काहीही. पहिली मी प्लेट समोर धरलीय. बाकीच्यांनी माझ्यामागे रांग लावावी. फोटो आणि सजावट मस्तच. जियो.

In reply to by विनायक प्रभू

स्वाती२ Mon, 10/04/2010 - 18:15
शौकिन असाल तर क्रॅब मीट. सामिश नको असेल तर मश्रुमचे देठ जास्त घ्यायचे आणि जोडीला बारीक चिरुन पालक घालायचा. क्रिम चिजही घालतात. पण आमच्या कडे लेकाला कोलंबीवालेच लागतात.

सुनील Mon, 10/04/2010 - 18:08
सुंदर! मास्तर, कोळंबीऐवजी कलेजीचे (कुणाच्या ते विचारू नका!) बारीक केलेले तुकडे घालून बघा.

विंजिनेर Mon, 10/04/2010 - 18:16
मस्तच दिसतायेत मशरूम्स! अवांतरः अ‍ॅपेटाईझरच्या निवडीवरून तिकडे फॉलची थंडी+पावसाची रिपरिप सुरू झालेली दिसतेय :)

गणपा Mon, 10/04/2010 - 18:29
यम् यम् १ शंका: या पाककृतीत मिठ वापरलेले दिसत नाही. अळणी होणार नाही का? की इटालिय सिझनिंग ब्लेंड आणि परमेजान चीज मध्ये मिठ असत? मश्रुम्स ना मॅरिनेट करायची गरज नाही का?

विसोबा खेचर Mon, 10/04/2010 - 19:07
अरे वा..! -- लाखाची गोष्ट, अवघाची संसार, पेडगावचे शहाणे, आम्हा जातो आमुच्या गावा, वरदक्षिणा, सुवासिनी, यासारखे सुंदर चित्रपट कुठे गेले आता?

कौशी Mon, 10/04/2010 - 20:19
खुप मस्त.... करून बघते तर आज.. साहित्य तर आहेच घरात

कौशी Mon, 10/04/2010 - 20:19
खुप मस्त.... करून बघते तर आज.. साहित्य तर आहेच घरात

भूक लागली. मश्रूम्स तर फारच आवडतात मला! आणि कोलंबीच्या जागी पालक आणि मश्रूमची देठं हाही उपाय चांगला आहे. मश्रूमच्या देठांचं काय हा प्रश्न पडला होताच मला!