स्टफ्ड मशरूम्स
साहित्य
१२ मोठे बटन मशरुम्स
२ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा
२ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर
६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या
१/२ टी स्पून मिरे बारीक करुन
१/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड
२ टे. स्पून परमेजान चीज
१/२ कप मोत्झारेला चीज
१ टी स्पून तेल
कृती
ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता. बारीक चिरलेली कोलंबी घालून १-२ मिनिटे परता. मिरे पावडर, इटालियन सिझनिंग,परमेजान चीज घालून नीट ढवळा आणि आचेवरुन बाजुला काढा.
मिश्रण थोडे गार झाले की एका बेकिंगडिश ला तेलाचा हात लावून घ्या. मशरुम मधे तयार केलेले मिश्रण भरुन
डिश मधे ठेवा.
डिश तापलेल्या ओवनमधे ठेवून १५-२० मिनिटे बेक करा. बाहेर काढून मशरूम्सवर मोत्झारेला चीज भुरभुरवा आणि परत डिश ३-४ मिनिटांसाठी ओवनमधे ठेवा. चिज वितळले की बाहेर काढून गरमच वाढा.
वरील प्रमाण ३ जणांना अपेटाइझर म्हणून पुरेसे आहे.
वाचने
4173
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
माझा पहिला नंबर...
लय
In reply to लय by विनायक प्रभू
शौकिन असाल तर क्रॅब
In reply to शौकिन असाल तर क्रॅब by स्वाती२
हां! हेच विचारायचे
छान
बेश्ट!
मस्तच दिसतायेत
यम् यम् १ शंका: या पाककृतीत
In reply to यम् यम् १ शंका: या पाककृतीत by गणपा
चिझ मधे मीठ असते. पण हवे असेल
अरे वा..! -- लाखाची गोष्ट,
वा वा...
वा वा...
तो.पा.सु.
भूक लागली.
धन्यवाद!
छान वाटतात...मश्रुमची