Skip to main content

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/10/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय! चिकन करू म्हणता ताजं? कसली भाजी करू मी पतिराज ||२|| ८० रुपये किलो आहे तुरदाळ असलीच महाग झाली मुगदाळ महागाईने केला कसला हा माज कसली भाजी करू मी आज ||३|| साखरेची तसलीच गत झाली तेलातुपाविना रयाच गेली खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस कसली भाजी करू मी आज ||४|| काय करू मी आज सैपाकाला भाजी नाही आज डबा करायला रोजचीच कटकट झाली आहे मज कसली भाजी करू मी आज ||५|| गहू तांदूळाने केली फार दैना एका पगारात कसा काढावा महिना काहीतरी आणा घरी कामकाज कसली भाजी करू मी आज ||६|| जे आहे ते सुखाने खाऊ महागाईचा नका करू बाऊ चैनीचा परवडणार नाही माज कसली भाजी करू मी आज ||७|| अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०१/१०/२०१०
काव्यरस

वाचने 1775
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अंगाईगीत तसे हे महागाईगीत. फरक इतकाच कि अंगाईने झोप लागते आणि महागाईने ती उडते. खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस .. चुकून खिर वडे वाचले गेले. हे कश्यामुळे ? तर मिपावर पितृपंधरवड्यासंदर्भात बरेच लेख आले आहेत. पंधरवडा संपण्याच्या आत, एक दिवस पितरेच म्हणतील "खिर वडे नको, लेख आवर ". --- कृ. ह. घ्या

पुने रेल्वे स्थानकावर जाऊन एके ठिकाणी २.५ रुपयांत वडा-पाव मिळतो, तो खाणे. नाहीतर पोट भर पाणी पिणे. बहुसंख्य जनता हाच मार्ग अवलंबते,

महागाई गीत आवड्ले. गांधीवादी,२.५ रुप्यात वडापाव नक्की कोठे मिळतो?. घरपोच पार्सल व्यवस्था आहे का?

महागाईगीत आवडले. खरच बुवा महागाई फार आहे. म्हणून हाटेलं भरभरून वहात असतात.;) तिथेच जेवलं कि आटेदाल का भाव मालूम झाला नाही तरी चालतय.