Skip to main content

रुपये१००१

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 01/10/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार. इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो. माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही. मूर्तीपूजेस विरोध केला आहे. तुम्हाला उपलब्ध जागेत मूर्तीविहीन पद्धतीनं तुम्ही उपासनास्थळ उभारणार आहात असं ऐकण्यात येतय. त्याबद्दल आपणास शुभेच्छा. तिथल्या बांधकामासाठी मी वैयक्तिक रित्या १००१रुपयांची देणगी जाहिर करतोय. (नक्की कधी बांधकाम सुरु करणं शक्य आहे, आणि कधी करणार आहात हे मला ठावुक नाही.) (ती रोख असावी की ऐनजिनसी हे अजुन ठरत नाहिये.) तुमचा शुभारंभाचा कार्यक्रम ठरला की कृपया कळवा. मी जाहिरपणे आपणास हे निमंत्रण मागतोय. एक सद्भावना दर्शवण्यासाठी ही रक्कम आहे.देशातला बंधुभाव वॄद्धिंगत होइल,दृढ होइल ही आशा आहे. तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही. ह्या मताचा मी आदर करतो. पण एक कळकळीची विनंती आहे की मूर्ती भंजनाचा क्लॉज जर तुम्हाला शिकवण्यात येत असेल तर तुम्ही स्थल्-कालानुरुप त्यात व्यावहारिक बदल करावा.तुम्ही कुठल्याही मूर्तीचं मंदीराचं दर्शन घ्यावं किंवा गणपतीमध्ये बाप्पाची मूर्ती ओक्यावर घेउन नाचाव असा माझा आग्रह नाही. पण strategy अशी ठेवता आली तर बघा:- कुठल्याच गैरधर्मीय वाटणार्‍या गोष्टीचं दर्शन घ्यायचं नाही.आणि त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही. भंजनाचा विचारही सोडुन द्यायचा. बस्स. इतकच. --सद्भावनेसहित, आपलाच मनोबा. (माझं मतः- आपलं सहजीवन(co-existence) अपरिहार्य आहे. अधिकाधिक विधायक कामानं सर्वच जणं समृद्धी मिळवुयात. )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2598
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान!

एवढे विनोदी लेखन आज पर्यंत वाचले नव्ह्ते,,, :D :D :D :D

त्या १००१ रुपयांत एक बाँबसुध्दा बनणार नाही. मग काय उपयोग?

In reply to by इंटरनेटस्नेही

हाय हाय लक्षात हाय टेररभाई :D पण एव्हढ्याश्श्या धुण्याच्या साबणाचा काय अल फायदा?

तुमची देणगी घेतली तर कराची दुबईतले भाई लोक आम्हाला कच्चे खातील हो!

>> त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही >> भंजन आणि विटंबनादेखील. विटंबना हा एक घाणेरडा प्रकार असावा असं उगाचाच (आता हा ६थ सेन्स म्हणा अतिकल्पकता म्हणा) वाटतं. आणि राग राग होतो.

बंधूंनो, आमच्या एका उपासना स्थळाला मूर्तीविहीन बनवून तुम्हाला पाठिंबा द्यायचं मनात आहे.

लेख छान उपरोधिक आहे. पण ज्यांच्यापर्यंत पोचावा तिथे पोचणार नाही. या निमित्ताने माझे एक (कै.) जहाल मित्र गोष्ट सांगायचे. ती अशी. एका घरांत दोन भाऊ रहात होते. धाकट्याने वेगळं व्हायचं ठरवलं. मोठ्याने उदार मनाने त्याला घराचा काही भाग दिला व वर पैसेही दिले. पण धाकट्याचे समाधान झाले नाही. तो मोठ्याच्या बायकोवर पण हक्क सांगू लागला. शेजारी म्हणाले हाकलून लावा नालायकाला. पण मोठा अन्याय सहन करत राहिला. शेवटी एक दिवस मोठ्याच्या मुलीवर सुध्दा त्याची वाकडी नजर पडली तेंव्हा मोठा संतापला. पण करतो काय, अन्याय सहन करण्याची क्षमता इतकी वाढली होती की तो षंढ झाला होता.