बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.
माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही. मूर्तीपूजेस विरोध केला आहे.
तुम्हाला उपलब्ध जागेत मूर्तीविहीन पद्धतीनं तुम्ही उपासनास्थळ उभारणार आहात असं ऐकण्यात येतय.
त्याबद्दल आपणास शुभेच्छा.
तिथल्या बांधकामासाठी मी वैयक्तिक रित्या १००१रुपयांची देणगी जाहिर करतोय.
(नक्की कधी बांधकाम सुरु करणं शक्य आहे, आणि कधी करणार आहात हे मला ठावुक नाही.)
(ती रोख असावी की ऐनजिनसी हे अजुन ठरत नाहिये.)
तुमचा शुभारंभाचा कार्यक्रम ठरला की कृपया कळवा.
मी जाहिरपणे आपणास हे निमंत्रण मागतोय.
एक सद्भावना दर्शवण्यासाठी ही रक्कम आहे.देशातला बंधुभाव वॄद्धिंगत होइल,दृढ होइल ही आशा आहे.
तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही. ह्या मताचा मी आदर करतो. पण एक कळकळीची विनंती आहे की मूर्ती भंजनाचा क्लॉज जर तुम्हाला शिकवण्यात येत असेल तर तुम्ही स्थल्-कालानुरुप त्यात व्यावहारिक बदल करावा.तुम्ही कुठल्याही मूर्तीचं मंदीराचं दर्शन घ्यावं किंवा गणपतीमध्ये बाप्पाची मूर्ती ओक्यावर घेउन नाचावच असा माझा आग्रह नाही. पण strategy अशी ठेवता आली तर बघा:-
कुठल्याच गैरधर्मीय वाटणार्या गोष्टीचं दर्शन घ्यायचं नाही.आणि त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही.
भंजनाचा विचारही सोडुन द्यायचा.
बस्स. इतकच.
--सद्भावनेसहित,
आपलाच मनोबा.
(माझं मतः- आपलं सहजीवन(co-existence) अपरिहार्य आहे. अधिकाधिक विधायक कामानं सर्वच जणं समृद्धी मिळवुयात. )
वाचने
2593
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
हा हा हा ....
कशाला?
कपडे धोने का साबुन एक
In reply to कशाला? by धमाल मुलगा
हाय हाय लक्षात हाय टेररभाई
In reply to कपडे धोने का साबुन एक by इंटरनेटस्नेही
डालरां डालरां.....
देणगी
>> त्याच्या भंजनाच्या
बंधूंनो
तुमचा प्रतिसाद खूप आवडला.
In reply to बंधूंनो by मिसळभोक्ता
गोष्ट
माले तं भाऊ काईच ऊमजनं