| From
साहित्य :- दोन डझन लादीपाव, चार कप बारीक चिरलेला कांदा, दिड कप बारीक चिरलेला टोमॅटो
चार पाच बटाटे उकडून किसलेले, दहा-पंधरा वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुरे, एक कप वाफवलेले मटार,
पाव कप सिमला मिरचीचे छोटे तुकडे ,आठ-दहा लसूण पाकळ्या, एक टिस्पून लाल तिखट
चार टे.स्पून तेल, एक टिस्पून जिरे, चार टेस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ
सर्व्ह करताना बटर, लिंबाच्या फ़ोडी, चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेला कांदा
कृती :- चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात. लसूण सोलून त्यात लाल तिखट घालुन
मिक्सरवर बारीक करावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट
घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम आचेवर तो शिजू द्यावा. नंतर
त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी. चार पाच मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे.
टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा.
थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. स्मॅशरने चांगले
स्मॅश करावे. नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे.
वाढताना बटर घालावे. कांदा आणि कोथिंबीर पेरावी. लिंबु द्यावे....
तसेच पावाचे सुरीने दोन भाग करुन बटर लावुन खरपुस भाजुन घेउन भाजी बरोबर खावे....
|
प्रतिक्रिया
मानेला फार त्रास होतो. बहुतेक
लसूण सोलून त्यात लाल तिखट
ह्यामुळे असेल कदाचित
In reply to लसूण सोलून त्यात लाल तिखट by परिकथेतील राजकुमार
स्मॅश की मॅश?
In reply to ह्यामुळे असेल कदाचित by नावातकायआहे
मॅश हा शब्द योग्य आहे आणि
In reply to स्मॅश की मॅश? by अनामिक
ह्म्म्म पातळ वाटतंय खरं !! पण
In reply to लसूण सोलून त्यात लाल तिखट by परिकथेतील राजकुमार
हेच .... रेसीपी जरा वेगळी वाट्ली...
छान !
पावभाजीची कृती फारच सोपी आहे
अर्रर्र!!
In reply to पावभाजीची कृती फारच सोपी आहे by वसुधा विनायक जोशी
अर्रर्रर्र! असेच म्हणतो.
In reply to अर्रर्र!! by प्राजु
पावभाजी ... वीक पॉईंट
पूर्वी आईकडे पावभाजी हा
In reply to पावभाजी ... वीक पॉईंट by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदिती.............अवांतर
पावभाजी आवडली
रुचिदार सहज सोपी पाकक्रुती
पावभाजीत जिरे कधीच टाकत
निवेदिता ताई, चावताना भाज्या
सुप्रभात......धन्यवाद...... म
र॑ग
छान
व्वा..! -- 'चार दिवस सासूचे'