>> ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. >>
सुंदर :)
आजोबांनी कोणतीही बोजड भाषा न वापरता शिकवलेलं माणसातलं देवपण आणि मुख्य नातवाला ते सहजतेने उमगलेलं.
बहुत बडे अर्से के बाद बिका पीच पर उतरे है...उनकी चाल से लगता है की लंबी पारी खेलेंगे...और ये लगा सिक्सर!!!!
पोरांन म्हातारा-म्हातारीला जेवायला घातल्याचं वाचून डोळे पाणावले! सध्या इथं डोळे "येण्याची" साथ सुरू असल्यानं नेमके कशामुळं पाणावले ते सुमडीत राहाणार. :)
"सुमडीत...."
अप्रतिम शब्द आहे....त्याचा अर्थ कळालाच....पण तुम्ही उगम सांगू शकाल का?
फार वर्षांनी वाचनात आलाय. मला वाटते खानोलकर किंवा उद्धव शेळकेनी याचा त्यांच्या लेखनात कुठेतरी वापर केलेला आहे. पण आता या क्षणी आठवत नाही.
जी.एं. नी एका कथेत [मुखवटा]... "मंगल पाप" असे प्रयोजन केले होते, त्यावेळी अर्थ कळला नाही. पुढे प्रिं.म.द.हातकणंगलेकर यांच्या व्याख्यानात त्याचा 'मंगल बिचारी..." असा अर्थ होतो हे समजले. टिपिकल कर्नाटकी मराठी असणार ते 'पाप' संबोधन..सुमडी सारखे !
इन्द्रा
कथा आवडली. एक मोठी गोष्ट अगदी सहजपणे कसलाही उपदेश न करता सांगून जाते हे मला जास्त आवडलं.
जाता जाता:असेच एका भागात कथा संपवत राहिलात तर कुणाची हिंमत आहे तिची माती करण्याची???
फार सुरेख लिहिली आहे कथा.
कथेतील आई वडिलांना आपल्या मुलांना देव श्रद्धा वगैरे वातावरण प्रत्यक्ष आयुष्यात परदेशात दाखवता आले नसतील , पण म्हातार्या माणसाला भुकेल्या माणसाला मदत करावी हे संस्कार
परदेशात राहून करता आले. ही निश्चितच चांगली गोष्ट केली त्या पालकांनी.
त्यामुळे च आज त्या कथेतल्या मुलाला म्हातार्या माणसाच्या रुपात देव भेटला.
खूप दिवसांनी मनाला भिडणारा लेख वाचायला मिळाला.
जियो बिकाशेठ !
>> "काय पांडोबा? काय म्हणताय? काल रखुमाईने पाय चेपले की नाही? की अजून रूसवा चालूच आहे? आणि तुम्ही हो मारुतराय, जरा शांत बसत जा हो."
>> तिची ही धावपळ आणि टेन्शन बघून समीरला खरंच कळत नव्हतं की जिथे शांत वाटतं म्हणून जायचं तिथे जायला एवढी अशांती का?
>> "अॅट लास्ट वी मेट, डूड, अॅट लास्ट..."
क्या बात है !
विमान उतरायला सुरूवात होण्यापासून आजोबांनी शेवटी हलकेच डोळे टिपण्यापर्यंत सगळा लेख ए-१ !
शेवट अपेक्षित होता...
तिथून जायच्या आधी म्हातारीने समीरच्या केसांमधून हात फिरवला..... नकळत समीर वाकला आणि त्याने दोघांना नमस्कार केला
पण हे अतिच झाले हो...
'बायकांच्या आड्यन्सला रडवायला' (कर्टसी: रावसाहेब!) अशी बेतलेली गोष्ट वाटली. देवाशी गप्पा मारणारे आजोबा, अमेरिकेतल्या नव्या पिढीला न कळणारा भारत - सॉरी, इंडिया, जनरेशन गॅप, आस्तिक-नास्तिकतेचा वाद हे सगळे 'आहे मनोहर तरी गमते उदास' असे झाले आहे.
चार-पाच पेग लावल्यामुळे दोन सेकंदात परत झोपणारे बाबा अशी काही चमकदार उदाहरणे चिखलात कमळ फुलावे तशी (!) फुलली आहेत. पण ती कमळे आहेत यापेक्षा ती चिखलात फुलली आहेत हेच प्रकर्षाने लक्षात रहाते. 'माती' च्या लेखकाकडून अधिक अपेक्षा होत्या.
सडेतोड प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व, बिपीन. एकूण संपादक मंडळींकडून होणारे लेखन अपेक्षाभंग करणारे ठरावे, असे काहीसे सध्याचे ग्रहमान दिसते. पितृपंधरवड्याचा दोष म्हणावा काय?
नाय बा!
मला रडू वगैरे नाही आलं!
कथा चांगली आहे पण बिका यांच्या आधीच्या लेखनाशी तुलना करता ही लहान मुलांसाठी बेतलेली वाटते.
संपादक मंडळींनी यापेक्षा चांगले लेखन करायला हवे असे मलाही वाटते. मी अतोनात ज्यु. संपादक असल्याने मला तेवढं वगळा! ;)
>>लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय.......समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला.
गोष्ट वाचत आहे अजून पूर्ण झाली नाही पण एक टेक्निकल चूक आढळली.
लँडिंगच्या साधारण अर्धा तास आधी सिनेमे वगैरे जे स्क्रीन वर चालू असते ते बंद होते आणि नकाशा, पोहचायला किती वेळ , किती अंतर कापले वगैरे पाट्या स्क्रीन वर दिसू लागतात आणि नंतर १५ मिनिटे आधी साधारण टिवी बंद केला जातो.
>> प्रथेप्रमाणे हवाईसुंदर्या आणि सुंदरे फेर्या मारून सगळ्यांच्या आसनांचे पट्टे वगैरे तपासत होते. खुर्च्या सरळ करत होते. तेवढ्यात चाकं बाहेर आल्याचा धप्प आवाज झाला
लँडिंग होताना (चाके बाहेर येताना) नॉर्मल परिस्थितीत हवाई सुंदर्या / सुंदर पण सीट्बेल्ट लावून त्यांच्या स्थानावर बसलेल्या / बसलेले असतात. अशावेळेस उभे रहाता येत नाही.
लँडिंगच्या साधारण अर्धा तास आधी सिनेमे वगैरे जे स्क्रीन वर चालू असते ते बंद होते आणि नकाशा, पोहचायला किती वेळ , किती अंतर कापले वगैरे पाट्या स्क्रीन वर दिसू लागतात आणि नंतर १५ मिनिटे आधी साधारण टिवी बंद केला जातो.
अलिकडेच केलेल्या आंतरदेशीय विमानप्रवासात विमानातल्या सुरक्षा सूचना संपल्यापासून विमानातून माणसं बाहेर पडेपर्यंत मी वेगवेगळे पिक्चर बघितले होते.
लँडिंग होताना (चाके बाहेर येताना) नॉर्मल परिस्थितीत हवाई सुंदर्या / सुंदर पण सीट्बेल्ट लावून त्यांच्या स्थानावर बसलेल्या / बसलेले असतात. अशावेळेस उभे रहाता येत नाही.
सहमत.
बाकी गोष्टीतली वर्णनं एकदम बिका श्टाईल, ए-वन. पण देव-देवस्कीबद्दल आणि व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल माझी व्यक्तीगत मतं टोकाची असल्यामुळे गोष्ट आणि मुख्य म्हणजे समीरचं कॅरॅक्टर पटलं नाही.
(मी ही विमान प्रवास केला आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न -- श्रेयअव्हेर - परा)
वा! चांगली गोष्ट आहे. पण जरा जुनीच असल्यासारखी वाटली, म्हणजे तो 'ढाचा' जरा जुनाच वाटला असे...
पण बिका,
शांतता पाळायला सांगितलेली असतांना तुम्ही अशा धार्मीक गोष्टी कशा काय लिहिता?
भंग झाला मग? मंदीराची गोष्ट काढून शांततेचा भंग केलाच आहे तुम्ही. तेथे चर्च किंवा इतर कोणते प्रार्थनास्थळ सुचले नाही तुम्हाला? (प्रार्थनास्थळ असे म्हणून शांतता पाळली आहे!) आता सधसमा दाखवणार्या ३ मित्रांची एक गोष्ट टाका लवकर. नाहीतर एखादे एकारांत, "लेखनकांडांमध्ये तत्कालीन संपादकांचे हितसंबंध-- एका एकारान्ती मिसळस्थ सदस्याचे मत" अशी शतकी चर्चा टाकतील बरं! ;)
सधसमा माहीत नाही तुम्हाला? हे घ्या सर्वधर्मसमभाव!
कथा फारशी आवडली नाही.
समीरच्या चित्रणामधे थोडे प्रश्न पडले. परदेशात जन्माला आलेल्या समीरची विचारप्रक्रिया अस्खलित मराठीत टिपताना काहीतरी चुकते आहे असे वाटते खरे.
लेखकाचा हात धरून अगदी गोव्यात मंगेशीच्या देवळाच्या आवारातच मी उभा आहे की काय अशी सुंदर तितकीच भावुक अनुभती झाली. कारण का कोण जाणे बि.का.नी. केलेले एका कुटुंबाचे देवळातील वर्णन 'मंगेशी' आवाराला लागू होते असेच वाटत राहिले. तिथेही परदेशात राहणार्या आणि सुट्टीत आईवडील्/आजीआजोबासमवेत कोकणात आलेल्या एन.आर.आय.ची मनःस्थिती समीरसम झालेली जाणवते.
"देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे."....
~~ आजोबांची ही शिकवण फार आवडली. पुढे भविष्यात या 'समीर' ने फक्त या 'कर्मकांडां' चा अतिरेक होऊ दिला नाही म्हणजे शिकवण कामी आली असे म्हणता येईल.
थोडक्यात.... कौटुंबिक वातावरणाचा सुखद शिडकावा करणारे हे लेखन मनाला गारवा देणारे आहे.
इन्द्रा
प्रतिक्रिया
...
साधीसुधी गोष्ट आवडली
सुंदर.....
>> ज्या क्षणी तो करायची इच्छा
अगदी छान कथा! २० वर्षाच्या
बहुत बडे अर्से के बाद बिका
सुमडी
सुम= गप असा अर्थ होतो
अप्रतिम.
अॅट लास्ट वी मेट, डूड, अॅट लास्ट...
फार सुरेख लिहिली आहे कथा.
सुरेख !
बि.का शेठ..
बिकाशेठ ... क्या बात है !
मस्त रे
+१
अतिशय सुन्दर्........शेवटी
खुपच आवडलं...मलाही असे
छान
फारच सुंदर स्फुट
संदीप खरेची 'नास्तिक'
क्लासच !!! सुपर्ब!!!
सुंदर !!! खूप आवडली. माझे
गुणी बाळ...
सहमत
नाय बा! मला रडू वगैरे नाही
फुलपाखरी
वड्याचे तेल
छानच !
सुरेख कथा आहे...
छान
एकदम मस्त कथा आहे.
एकदम मस्त!
छान कथा , आवडली !
>>लेडिज अँड जंटलमन, वी हॅव
टेक्निकल नॉन-चूक
फिलॉसॉफर बिपिनदा.....
मानवता
वा
सॉरी बिका
प्रतिसाद
अगदी बरोबर
चांगलि कथा आहे आवडलि
मंगेशीचे आवार
अप्रतिम कथा!!!!
अप्रतिम लेखन.. काहीच
बिपिनशेठ, लिखते
छान
अप्रतिम
मस्त बिका. आपल्याला तर आवडली