मस्त चित्र.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
मिसळपाववरचे लोक खरेच एकसे बढकर एक छुपे रुस्तुम निघाले राव ! जियो भाई चतुरंगशेठ ! अजून येऊ द्या !
१००% सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
बापरे.. ती डोळ्याची रिकामी खोबण डेंजर दिसतीय.. पण काय सुंदर काढलंय हो! मला माझे अपयशी प्रयत्न आठवतायत.. हे इतकं छान काढायला कसं जमतं बॉ???
बाकी, ती दाढी एका बाजूनी मोठी आहे का?
रंगा, रेखाटन छानच आहे पण कोणाचं आहे? हा मनुष्य कोण आहे?
असा कुणी एकाक्ष प्रत्यक्षात आहे, की हा तुझ्या मनातला एकाक्ष आहे?
आणि त्याची दाढी उजव्या बाजूला ट्रीम केलेली आणि डाव्या बाजूला वाढलेली, असं का? :)
तात्या.
रंगराव,
मस्तच.
गुढतेकडे झुकणारं हे चित्र एकदम झकास!
बाकी हा कुठे पाहिला होता की मनातलाच?
भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त!
येऊद्या अजुनही!
अवांतरः हा एकाक्ष जर मनातला असेल, तर कोण्या काळी मनातली विषण्णता, आणि काहीश्या हतबलतेतून आलेल्या रागाच्या मनोस्थितीत असताना काढलेला आहे का हो?
भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त!
खुपच भारी रेखाचित्र आहे, लै भारी भारी चित्रकार आहेत आपल्या मिपावर, सुंदर.
कवितेचे अंग (पहिला अर्थ घ्या) असणार्या लोकांना चित्रकला अवगत असतेच बहुदा ! (एक पे एक फ्री)
आपला ओंकार पण गझला करता करता रेखाचित्रेही सुरेख काढतो बरं.
तात्या,बहुदा अजून एक विभाग करायला लागणार..
हम्म! स्वाती तुझं खरं आहे! :)
ठीक आहे, काढूया की चित्रकला विभाग! आम्हाला त्यात खुशीच आहे! :)
आपला,
(चित्रकलाप्रेमी) तात्या.
चित्रातल्या व्यक्तीबद्दल थोडे - हे चित्र जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका अट्टल गुन्हेगाराचे आहे. आधी मुद्दामच हे सांगितले नव्हते नाहीतर चित्रावरुन मत तयार होण्याऐवजी मतावरुन चित्र मनात तयार होण्याचा संभव :). व्यक्तिचित्रांच्या एका पुस्तकातल्या ह्या चित्राने बघताक्षणी मनाचा कबजा घेतला आणि मी लगेच चित्र काढायला बसल्याचे आठवते.
दाढी एका बाजूला कातरल्यासारखी दिसते असे काही रसिकांचे मत आहे. ते मूळ चित्रात होते की माझ्याकडून शेडिंग करताना अर्धवट राहून गेले हे आता आठवत नाही, २३ वर्षे झाली त्याला!
पुढील चित्र लवकरच टाकेन.
चतुरंग
मला हे चित्र कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते आहे.....
दोन वेगळ्या चेहर्यांचा मिळुन एक चेहेरा बनवला आहे असे मला तरी वाटले,,म्हणजे चेहेर्याचा डावा भाग एका व्यक्तीचा आणि उजवा भाग मात्र दुसर्या व्यक्तीचा.....
म्हणुनच बहुतेक डाव्या डोळ्यावर भुवई नाही तर उजव्या चेहेर्याची दाढी वाढली आहे......
मदनबाण.....
प्रतिक्रिया
क्या बात है !
सहमत!
मिसळपाववर
बापरे.. ती
एकाक्ष
कोण?
अप्रतिम
आवडले
सुंदर!!!!!!!!
अरे काय आज
रंगराव, मस्
असेच म्हणतो
वा..
:)
आर्ट गॅलरी
चित्रकला विभाग
रेखाटन
डेडली....
हेच...
डेडली.... असंच म्हणतो...
मी थोडी घाबरले होते
आपल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मला.....