Skip to main content

मराठी रॅप ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 28/09/2010 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा पोरगा लय भारी मराठी रॅप गातो. http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला. आता चर्चेचा मुद्दा: पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..) तुमच काय म्हणणे आहे ? प्रदीप ने लोकांना कळावे म्हणून आपली भाषा बदलावी ? त्याने त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे? "ईंडिया" च्या टॅलंट मधे फक्त हिंदीच असली पाहिजे का ?

वाचने 19237
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी त्यातले पहिले दोन व्हिडो बघितले. किरण खेरने काय म्हणले ते दिसलेच नाही.
का दिसले नाही ह्याचे एक अतिशय योग्य कारण तुम्हाला सांगणार होतो पण खाली अजुन एक +१ आलेला बघुन गप्प बसतोय.

बॉलिवूड चित्रपट नावाच्या निर्बुद्ध प्रकारावर पंजाब्यांनी मक्तेदारी सांगीतली तर मराठी म्हणून मला बरंच वाटलं.

ह्म्म्म! त्या किरण खेरचं सोडा पहिले प्रदिप काशीकर ह्या माणसाने मराठी असून "रॅप" हा प्रकार हाताळायलाच नको होता. आपण मराठी आहोत, मग असं इंग्रजी संगीताच अनुकरण करूच कसं शकतो? बरं त्यानं ते केलं तर बाकी मराठी लोक ते खपवून कसं घेतात? त्याला बोलायचं सोडून बिचार्‍या किरण खेरला नावं ठेवताहेत लोक!

In reply to by अनामिक

त्या त्याच्या रॅपपेक्षाही (कानाला) काय बोचलं तर त्याचं, "पोवाडा म्हणजे रॅप" हे विधान साला आपल्या समृद्ध परंपरेला पाश्चात्य गोष्टींची नावं जोडल्याशिवाय विकता येतच नाहीत का? च्यायला इथे पोवाडे गायले तर ऐकायला कीती गोळा होतात काय माहित.

दोन वर्षापूर्वी मी सीबीडी तल्या MGM हॉस्पीटलातल्या डीन का कोण असतो त्याला "मराठी" या विषयावर बोलले होते... त्याचं काय झालं, मी तिथल्याच एका स्त्री डॉक्टरला भेटले होते...मी मराठीत बोलत असताना सुद्धा ती सौथ इंडिअन काळूंद्री इंग्रजीत चालू होती... मग नंतर मी त्यांच्या मुख्य जो डीन का काय त्याला भेटून सांगितले कि तुम्ही इथे येत, पैसे कमावता अन तुम्हाला इथली भाषा बोलता येत नाही? का? वगैरे .. तर त्याचे म्हणणे असे होते कि आमची दर ३-५ वर्षांनी भारतात कुठेही बदली होते मग कसे काय सगळ्याच भाषा शिकणार? तरीपण मी स्वतः बर्यापैकी मराठी बोलतो ...अजून तिथे कोणीतरी कशाचेतरी पेढे द्यायला आला होता त्याला विचारून म्हणे - मी जमेल तसे जमेल तितके मराठी बोलतो कि नाही? तो "हो" म्हणाला....म्हणणारच..खालच्या rank चा होता..असो. तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा...त्यांना समजू द्या कि साधारण लोक सुद्धा जागृत झाले आहेत...केवळ राज ठाकरे नाही.. आपणच आपल्या भाषेचा अभिमान नाही बाळगला तर दुसरं कोण बाळगणार?

In reply to by शिल्पा ब

सीबीडी, MGM, हॉस्पीटल,डीन,सौथ इंडिअन, rank .... जमेल तसे जमेल तितके मराठी.... तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा.. 'कंस्ट्रक्टीव्ह' प्रतिसाद अतिशय आवडला!

In reply to by सहज

ती सौथ इंडिअन काळूंद्री मराठीची भलामण करताना आपण वंशभेदी / वर्णभेदी झाल्या आहात का ?

In reply to by मिसळभोक्ता

सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि गोर्याला गोरा म्हण्टलेलं चालतं तर काळ्याला काळा का नाही म्हणायचं?

In reply to by शिल्पा ब

गव्हाळ ? करड्या ? की आणखी काही ? तुमचा उल्लेख करताना "मराठी गव्हाळ चिचुंद्री" असा केला तर चालेल का ? पण, माझा मूळ मुद्दा बाजूला टाकताहात. (आणि हो, द्रविड हा वेगळा वंश आहे. आर्यांपेक्षा जुना.)

In reply to by मिसळभोक्ता

तुम्ही म्हणताय का " मराठी गव्हाळ चिचुंद्री" मला ? आणि तुम्हाला काय माहिती मी आर्य का द्रविड ते? माझेच ज्ञान वाढेल म्हणुन विचारले? आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही.

In reply to by शिल्पा ब

आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही. एक वेळ अर्वाचीन भारतात स्त्री-पुरुष भेद मानणार नाहीत, पण आर्य-द्रवीड भेद नक्कीच मानतील.

In reply to by शिल्पा ब

*मानतील* हा भविष्य काळ. भविष्य काळाचा पुरावा मागणार्‍या तुम्ही अजबच दिसताय. बाकी आपली करमणूक तथ्यांनी होते, हे वाचून आमची करमणूक झाली.

In reply to by मिसळभोक्ता

म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते? तथ्य म्हणण्याजोगे काही वाटत नाही.

In reply to by शिल्पा ब

म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते? आपल्या मतानुसार जे काळुंद्रे ते द्रविड. एक्स्टेंशनः जे पांढरुंद्रे ते आर्य, आणि गव्हाळ चिचुंद्र्या = मिक्श्चर. असो, पण सीरियसली: वस्त्रप्रावरणांमुळे, स्वयंपाक करणे-न करणे ह्यामुळे, स्त्री पुरुषांतला भेद कमी होतोय. बर्‍याच लोकांना ओळखू देखील येत नाहीत स्त्री कोण आणि पुरुष कोण ते. पण उडदामाजी काळे गोरे निवडणारे उदंड आहेत. उदा. "काळुंद्री" हा शब्द.

In reply to by सविता

*मी मनातल्या मनात मिभोंना काळा कावळा म्हणून घेतले...अन विरजण घालणारे असल्याने डोमकावळा..* त्यांना सांगू नका.

In reply to by शिल्पा ब

ह्या पितृपक्षात आपण मला कावळ्याचा दर्जा दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पितरांच्या काय अतृप्त इच्छा होत्या त्याही कळवाव्यात. पूर्ण करेन ;-)

In reply to by शिल्पा ब

अहो, आम्ही तुमच्या पितरांसारखे. त्यांच्या इच्छा पूर्ण करू. तुमच्या अपुर्‍या इच्छा पूर्ण करण्यास कुणी तुम्च्या पीढीचे लोक शोधा ;-)

In reply to by मिसळभोक्ता

"आई गं" म्हणावं का "बाप रे" असा प्रश्न पडला आहे. असो. तुमच्या पिढीचे लोक शोधा का कावळे शोधा? अवांतरः आमच्या घरात कोणत्याही पिढीतल्या कोणाच्याही कसल्याही इच्छा अपूर्ण नाहीत हे आधीच जाहीर करते. नाहीतर मिभोकाका माझंही रॅगिंग घ्यायचे.

द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष गेली २० वर्षे आलटुन पालटुन पालटुन तामिलनाडुत राज्य करत आहे. तो फक्त द्राविडी लोकांच्या पाठिंब्यावर राजकारण करतो. मला वाटते महाराष्ट्रात देखिल आर्यांपेक्षा द्राविडी लोकाची संख्या जास्त आहे.

जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी? त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा! हा विचार पटला. सोबतच जरा आमच्या विदर्भात डोकाऊन बघा. काय हिन्दी आणि काय मराठी ..