Skip to main content

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
हिरवीनः धनी ऐका माझं बी जरा हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा ||धृ|| हिरो: पाउस पानी काही नाही पेरणीचीबी तयारी नाही हातावर हात ठेवून निसती उभी कशाला कामाचा करते पुकारा? ||१|| हिरवीनः आत्ता ग बया! हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा हिरो: तण सारं माजलय लई त्याला काढाया करावी घाई नट्टापट्टा करूनी उभी उगाच करते तू नखरा ||२|| हिरवीनः आत्ता ग बया! हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा हिरो: घाई कर धर वर उचल काठी मोठी तोंड घालतया जनावर मार त्याच्या पाठी हातातलं काम बाजूला सारून जरा लवकर इकडे ये तू भरभरा ||३|| हिरवीनः आत्ता ग बया! हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा हिरो: बी बियाण्याची पेरणी आली खोडव्या उसाची तयारी झाली हातात धर पांभर बी पेराया ठिबक हे चालू करतो जरा ||४|| हिरवीनः आत्ता ग बया! हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा हिरो: हाती नांगर आडवा धरला कामामधी येळ सारा सरला आता जावू आपन घरला जरा इचार करू म्होरला ||५|| इश्श.... ढिंच्याग ढिंच्याग ढिंच्याग ढिंग... - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०९/२०१०
काव्यरस

वाचने 1707
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया