थत्ते साहेबांनी म्हटल्या प्रमाणे आजही स्थीती २६ वर्षांपूर्वी सारखीच आहे.
इंजीनीयरींगचे शिक्षण आजही भारतात व्यवसायाभीमूख नाही.
कॉलेजात थियरी पेक्षा प्रत्यक्ष व्यवसायईक शिक्षणाला महत्व यायला हवे.
अभ्यासक्रमात मुलभूत बदल न केल्यास, भारतातले इंजीनीयरींग शिक्षण आर्ट्स, कॉमर्स सारखे च राहील.
सहमत.
पण पुणे विद्यापिठात (ऐकिव माहिती नुसार) लेक्चररांना कितीसा पगार मिळतो? त्यामुळे अनुभव असलेले इंजिनीअर लोक कशाला शिकवायला येतील?
हाच प्रश्न सद्ध्या सगळीकडे आहे.
मी ९४ ला पासआऊट झालो.
तेंव्हा एकही इंडस्ट्रीयल व्हिजिट झाली नव्हती.
मला तर ईंजिनिअरींग झाल्यावर आपण नेमके काय काम करणार असा प्रश्न पडला होता.
त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
मी इंडस्ट्रीयल ईंजिनिअरींग केले होते. पण काम कम्युनिकेशन मधे मिळाले.
मग थोडाफार आयटी साठी प्रयत्न केला पण डाळ शिजली नाही.
मग कम्युनिकेशन मधेच रमलो.
(साधारण १९८० च्या आसपास असावे) सँडविच कोर्स असा काहीतरी प्रकार इंजिनिअरिंगमध्ये आणण्याचा अयशस्वी प्रकार झाला होता (असे ऐकून आहे चूभूदेघे) - त्यात तिसर्या आणि चौथ्या वर्षीची दुसरी सहामाही ही इंडस्ट्रीमधे ट्रेनिंग घेत करायची आणि मग परीक्षा द्यायची असा काहीतरी प्रकार होता. परंतु ते सगळे दोनेक वर्षातच बंद पडले असावे.
थत्त्यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत. प्रत्यक्ष इंडस्ट्रीचे तोंडही न बघता शिकवणे म्हणजे खरंतर जोकच आहे! निदान प्रत्येक विषयाचा एकेक विजिटिंग लेक्चरर तरी असलाच पाहिजे त्याशिवाय बाहेर पडल्यावर फारच अवघड होते.
सुदैवाने आमचे काही शिक्षक हे इंडस्ट्रीमधूनच आलेले होते किंवा बाहेर कन्सल्टन्सी करणारे होते त्यामुळे त्याचा फार फायदा झाला. मुख्य म्हणजे अमूक एका गोष्टीचा व्यवहारात उपयोग का आणि कसा होतो ह्याबद्दलच्या काही संकल्पना तरी नक्कीच पक्क्या झाल्या. आमच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्टसुद्धा आम्हाला चांगला निवडू दिला आणि त्याला शक्य ते सर्व पाठबळ पुरवले त्यातून आम्ही जे शिकलो ते कायमसाठी उपयोगी पडते आहे.
माझे काही अनुभव मासलेवाईक आहेत -क्राँप्टन ग्रीव्जससाठी मी काही ऑटोम्याटिक वोल्टेज रेग्युलेटरचे काम करुन देत होतो. शॉपफ्लोअरवर काम चालू होते. एक मोटर खोलून ठेवली होती. स्टेटरच्या वाईंडिंगला काही प्रॉब्लेम होता. तिथला टेक्नीशिअन इंजिनिअर बाईंना म्हणाला "मॅडम, स्टेटरला प्रॉब्लेम आहे". बाईंचा पहिला प्रश्न "स्टेटर कुठे आहे?"
मी आणि टेक्नीशिअन एकमेकाकडे बघत राहिलो आपल्याच साहेबाची आणखी लाज निघू नये म्हणून तो टेक्नीशिअन म्हणाला "मी बघतो मॅडम." आणि बाई तिथून पुढे गेल्या! मी आणि तो गालातल्या गालात अर्थपूर्ण हासलो..
एक शुगर फॅक्टरी - सीझन सुरु होतानाची वेळ. टर्बाईन सुरु करायचे होते. तिथेही ऑटोम्याटिक वोल्टेज रेग्यूलेटर बसवले होते. टर्बाईन सुरु झाले की पूर्ण स्पीडने फिरेपर्यंत अल्टरनेटरचे वोल्टेज हळूहळू वाढत जाते. एकदाका पूर्ण वेग आला की मग स्टेबल होते. रेगूलेटरच्या एका थायरिस्टरने दम टाकला आणि अचानक वोल्टेज ड्रॉप झाले. मी ओरडलो "अर्रर्र्..व्होल्टेज गेले रे खाली गेले!" तिथले इलेक्ट्रिकल इंजिनिअर वाकून टेबलाखाली बघू लागले!!!! (ह्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाहीये - माझी हहपुवा - आणि हसताही येईना शेवटी काम संपवून गेस्टहाऊसला आलो आणि आधी हसून घेतले!! =)) =)) )
अजून बरेच आहेत पण पुन्हा कधीतरी. एकूण बॉटमलाईन काय तर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग हे अत्यावश्यक!!
(ऑटोमॅटिक्)रंगा
असाच एक किस्सा,
लेथ मशिनावर ४-४ पाने लिहून काढ्नार्याला एकदा प्रत्यक्षत लेथ मशीन चालवावी लागली, हाथ थरथर कापीत त्याने विचारले की बटन कुठे आहे ? (बटन समोरच दिसत होते.)
सँडविच कोर्स असा काहीतरी प्रकार इंजिनिअरिंगमध्ये आणण्याचा अयशस्वी प्रकार झाला होता (असे ऐकून आहे चूभूदेघे) - त्यात तिसर्या आणि चौथ्या वर्षीची दुसरी सहामाही ही इंडस्ट्रीमधे ट्रेनिंग घेत करायची आणि मग परीक्षा द्यायची असा काहीतरी प्रकार होता. परंतु ते सगळे दोनेक वर्षातच बंद पडले असावे.
सँडविच कोर्सेस अजुनही सुरु आहेत (पुणे विद्यापिठात) आणि माझ्या मते सँडविच कोर्सेस हे नॉर्मल पेक्षा अजुनही चांगले. तुम्ही तेव्हढेच कोर्सेस करता पण सहा महिन्यांच्या ऐवजी १ वर्ष तुम्हाला व्यावसायिक अनुभव मिळतो.
मी तर म्हणेन, चारही वर्षे मुलांना इंटर्नशीप मिळण्याची सोय आपल्या इंडस्ट्रीत झाली तर उत्तम व्यावसायीक अभियंते बाहेर पडण्यास मदत होईल.
सँडविच कोर्स (डिग्री साठी) माझ्या माहीती नुसार केवळ पुणे विद्यापीठात आहे.
तसेच हा कोर्स देणारे एकाद दुसरेच कॉलेज पुणे विद्यापीठात आहे.
परंतु मुंबईत डीप्लोमा (सँडविच) दोन - तीन संस्थांत मिळतो.
१९८२ साली मी व्ही.जे.टी.आय. मधून केलेला डीप्लोमा सँडविच होता.
ह्यात ६वे व ७वे सत्र इंडस्ट्रीत केले. ह्या काळात बरेच काम करायला मिळाले.
विशेषतः अनेक प्रकारची यंत्रे प्रत्यक्ष चालवायला मिळाली.
ह्या अनूभवाचा खूप उपयोग आयुष्यभर झाला.
मी एका प्रख्यात इंजिनियरींग कॉलेजमधून डिग्री (कशीबशी) मिळवली आहे.
इतक्या वर्षानंतर जेव्हा मागे वळून त्या प्राध्यापकांच्या वागण्याकडे वा अभ्यासक्रमाकडे बघतो तेव्हा ह्या त्रुटी जाणवतात.
१. प्राध्यापक मंडळी हस्तीदंती मनोर्यात असत. अभ्यासक्रमात वर्षानुवर्षे बदल होत नसे. सरकारी नोकरी असल्यामुळे ती गमवायची, प्रमोशन नसण्याची भीती नसे. त्यामुळे जगात काय चालले आहे ते बघून आपला अभ्यासक्रम सुधारावा असे कुणाला फारसे वाटत नसे.
२. बहुतेक अभ्यासक्रम हा अत्यंत थियोरेटिकल अर्थात पुस्तकी, पंडिती छापाचा होता. कम्युनिकेशन थियरी, वेव्ह थियरी, सॉलिड स्टेट डिव्हायसेस, इलेक्ट्रिकल मशीन्स वगैरे विषय हे अत्यंत गणिती छापाचे होते. त्याचा व्यवहारात काहीही उपयोग झालेला नाही. क्वांटम मेकॅनिक्स, मटिरियल सायन्स, सोशिओलॉजी, मानसशास्त्र असले अगम्य विषय आम्हाला सक्तीने का शिकवले ह्याचा उलगडा आजतागायत झालेला नाही!
३. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग हा विषय मोटर्स, रेझिस्टर, कपॅसिटर, वायर, अँटेना असल्या मूर्त वस्तूंशी जास्त निगडित आहे असे वाटायचे. पण ह्या अभ्यासक्रमामुळे हा विषय मॅट्रिक्स, व्हेक्टर्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, रियल व कॉम्प्लेक्स इंटिग्रल्स, लाप्लास वा फूरियर ट्रान्स्फॉर्म, बेसेल्स फंक्शन, लिनियर प्रोग्रॅमिंग, ऑप्टिमायझेशन असल्या अमूर्त दैत्यांच्या जास्त जवळचा वाटला. खुद्द कामात मात्र ह्यातले कुठलेही ज्ञान जवळपास कधीही वापरावे लागले नाही.
४ बर्याचदा आपल्या विषयाची व्यवहाराशी सांगड घालणे हे प्राध्यापकांना कमीपणाचे वाटत असे. शुद्ध विज्ञान वा गणित विषयात हा गंड समजू शकतो पण इंजिनियरिंगमधे जरा अजब वाटतो.
५. राजकारण. विविध प्राध्यापकांमधे शीतयुद्ध चालायचे आणि त्याचा त्रास विद्यार्थांना व्हायचा. अमक्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याला तमक्या डिपार्टमेंटमधे कोर्स करू द्यायचा नाही. अमका विषय सक्तीचा म्हणून तमकाही सक्तीचा करायचा वगैरे सर्रास चालायचे. अहंकारी प्राध्यापकांचा त्रास अनेकदा झाला आहे.
पण प्राध्यापक मंडळी कष्टाळू होती. बहुतेक लोक पेपर काढताना विचारपूर्वक काढत. किंबहुना पेपर बनवणे ही आपली परीक्षा आहे असे अनेक शिक्षक मानत आणि आचरत.
थियरी शिकून पाया भक्कम केला पाहिजे हे मान्य आहे. पण कुठेतरी व्यवहाराशी सांगड घातली गेली पाहिजे असे वाटते.
१. सहमत
२. अंशतः सहमत. थिअरीची गरज असतेच. आम्हाला मानसशास्त्र वगैरे विषयच नव्हते. ते का नव्हते असे मला आता वाटते. इंजिनीअरचे काम दिवसातून ५०% हून अधिक वेळ हे इतरांबरोबरचे काम असते. ग्रूपमध्ये आणि तरी थोडेसे अलिप्त असे काम त्याला/तिला करावे लागते. यापैकी नक्की कशाचा विचार प्राध्यापकांनी केलेला असतो? ग्रूप प्रॉजेक्ट आमच्या वेळी फक्त शेवटच्या वर्षी होता, आणि त्यात आम्हाला कामासाठी तयार करण्याचा कसलाही विचार प्राध्यापकांनी केलेला नव्हता, हे आता जाणवते. साधी परमिशन कुठून काढायची हेही माहिती नव्हते. हॉस्पिटलाचे डिझाईन करा यावरून तेव्हाच्या मुंबईतल्या एका हॉस्पिटलवरून काहीतरी डिझाईन केल्याचे आठवते! लांब लांब पॅसेजेस आणि आजूबाजूने काही रूम्स, असेच काही बाही. स्पेस प्लॅनिंग वगैरे कल्पनांबद्दल एक वाक्यही शिक्षकांनी सांगितले, डेटा कुठे मिळेल, कोणाशी जाऊन भेटा असे सांगितले, असे आठवत नाही. त्याबद्दलच्या काही कल्पनाही मनात न रूजल्याने प्रोजेक्ट हा अतिशय कंटाळवाणा झाला.
३. हे तेवढे मान्य नाही. शिकलेल्या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो, तुमचे काम कशात आहे यावर काही गोष्टी अवलंबून आहेत.
४. कमीपणाचे वाटत असेल असे मला वाटत नाही. आपले अज्ञान उघडे पडेल अशी उगाचच भिती असते. प्रत्येक विषयातले सगळे शंभर टक्के ज्ञान तोंडपाठ हवे, ते नसल्यास, प्रश्न विचारल्यास आपल्याला मूर्ख धरतील अशा भितीने प्रोफेसर तोंडच उघडत नसावेत.
उदा. शॉपमध्ये काम प्रत्येकानेच केलेले असते असे नाही. मी मुंबईला कन्सल्टिंग कंपनीत काम करत असताना साईटवरचे इंजिनीअर वेल्डिंगचे डीटेल यांना काय कळतात, अशा प्रकारे बोलतवागत असत ते आठवले. खरे तर थिअरी म्हणून वेल्ड साईझ, वेल्ड लेंग्थ सगळे कसे काढायचे ते शिकवलेले असते. पण साईटवर कधीकधी थोड्या अॅडजस्टमेंट होतात, हे डीटेल माहिती नसले आणि विचारले तर मूर्खात काढण्याची गरज काय असते हे मला अजूनही कळलेले नाही.
तेव्हा हेच प्रोफेसरांचेही होत असेल. त्यापेक्षा दुसर्याचे काम कमी मोलाचे नाही, त्यालाही विचारात घेऊ, एवढे जरी मनात गृहितक धरले तरी सर्वांचीच कामे बरोबर होतील.
५. सहमत. प्राध्यापकही अहंकारी असतात, आणि बाहेर मिळणारे उत्तम इंजिनीअरही अनेकदा असतात असा अनुभव आहे.
अमूर्त दैत्य!
हाहा. मस्त!
इंडिअन इंगीनीर स्वताला खूपच शाहने समजतात का त्यांना एवढा इगो असतो तेच काळात नाही
त्या ऐवजी जेर्मोन अभियंते बह्घा म्हणजे कळेल कि आपण किती पाण्यात आहोत .
स्व अनुभव सांगतोय .
एक सिनियर जेर्मोन ईंजिनीअर आला होता आमच्या एका प्रोजेक्टला विजिट करायला... त्याला ईंजिनीअरींगची बाराखडी शिकवूण परत पाठवला.. जाताना मराठीत 'अभार्री हाये' म्हणून गेला...
प्रिसाईजली हाच विचार या काथ्याकुटाच्या मागे होता. ज्ञानाच्या आणि कुवतीच्या बाबतीत बहुधा फरक नसावाच.
पण मग असे काय आहे ही ज्याने फंडामेंटल किंवा ब्रेकथ्रू काम भारतीयांकडून फारसे होत नाही - अगदी ज्यात भारत पुढे आहे अशा आयटी इंडस्ट्रीतही ? शिक्षणपद्धतीतला फरक हे एक कारण असू शकते.
(१)
प्रॅक्टीकल ज्ञानाचा अभाव.
आजही अनेक सिनीअर इंजीनीयर हाताने काम करणे कमी पणाचे मानतात.
हाताने कधी काम न केल्याने आत्मविश्वास नाही.
(२)
ज्याच्यात नविन काही करायची इच्छा आहे त्याला भारतात स्कोप कमी.
आमचे भांडवलदार संशोधनावर कोट्यावधी रू. खर्चण्यापेक्षा, रेडीमेड - कोलॅबरेशनवर जास्त भीस्त ठेवतात.
आजतर कोलॅबरेशन पेक्षा जर्मन, जापानी कंपन्यांनी चीन मध्ये बनवलेला तयार माल भारतात आणून विकायचे प्रस्थ वाढले आहे.
अशा महाभागांमुळे भारतीयांतली उरली सुरली सृजनशीलता ही संपुन जाईल.
आजही आमच्या भांडवलदारांची नविन संशोधनावर पैसे खर्चायची कुवत नाही (टाटा सारखे लोक अपवादात्मक आहेत).
(३)
संरक्षण उत्पादनात जेथे नविन संशोधन, सॄजनशीलतेला वाव आहे, तेथे लाल फीत, दिरंगाई मुळे कोणी धडाडीचा इंजीनीयर टीकत नाही. (भारत सरकार संरक्षण संशोधनावर पुरेसा पैसा नेहमीच उपलब्ध करून देते. तरिहि दिरंगाई, खुर्ची टिकवण्यासाठी लाटलंगोटं करणे, प्रकल्प वर्षानुवर्षे उबवणे इ. प्रकार चालू असतात)
भारतीय लढाऊ विमानासाठी बनवले जाणारे 'कावेरी' इंजीन २५ वर्षांनंतरही विकसित होऊ शकले नाही, शेवटी सरकारने तो विकास प्रकल्प बंद केला. आता तसले इंजीन अमेरीके कडून आयात होईल.
अर्जुन रणगाड्याला लागणारे ५०००+ हॉ.पावरचे इंजीन आम्ही विकसीत करू शकलो नाही.
आता अर्जुन प्रकल्प मोडीत काढून आम्ही रशीया कडून रणगाडे तंत्रज्ञान घेणे चालू ठेवले आहे.
लालफीत, भ्रष्टाचार, दिरंगाई हे कायमचे शत्रू आहेत.
अर्जुन रणगाड्यासाठी माझ्या मित्राने परकीय पॉवरसप्लायला रिप्लेस करणारा डीसी पॉवरसप्लाय विकसित केला होता. (आयात सप्लायच्या बर्याच कमी किमतीत हा तयार केला होता!) अतिशय दणकट असा सप्लाय चेन्नै जवळच्या आवडी येथील रणगाडा केंद्रातून सर्व तर्हेच्या टेस्ट्स व्यवस्थित उत्तीर्ण झाला.
मोठी ऑर्डर मिळण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. त्यानंतर कुठे माशी शिंकली ते माहीत नाही (पण अंदाज करु शकतो आपण!) ही सगळी प्रक्रिया अचानक रद्द झाली. काही कळवले नाही.
हे अनुभव त्याला खाजगी कंपन्यातून सुद्धा आले. अशाच लालफितीच्या इतर कारभाराला कंटाळून त्याने शेवटी त्याचे पुण्यातले वर्कशॉप १५ वर्षे चालवून बंद केले. त्याने १२-१५ लोकांना रोजगार दिलेला होता त्यात बरेच इंजिनिअर्स होते.
त्याचाही अनुभव असाच होता की इंजिनिअर्स शिकायला कचरतात, ऑन दि जॉब ट्रेनिंग घेणे, प्रत्यक्ष उपकरणे हाताळण्यासाठी जादा वेळ काम सुरुवातीला करावेच लागते त्याला फारसे राजी नसणे, सतत घड्याळाकडे पाहून कामे करणे, पगारवाढीची अपेक्षा करत राहणे. आणि एवढे करुन दोन वर्षात सोडून दुसरीकडे जाणे!
सध्या तो फिलिपाईन्समधे एकामोठ्या कंपनीत लीड डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करतोय!
चतुरंगजी, प्रतिक्रीया उशीरा देतोय या बद्दल क्षमस्व..
आपल्या मित्राने बनवलेले इंपोर्ट सबस्टिट्युट स्विकारले गेले नाही.
केवळ भ्रष्टाचार हे कारण असणे कठीण आहे.
माझा अनुभव सांगतो की, भारतीय बनावटीची उपकरणे संरक्षण साधनात वापरायला स्वतःवर विश्वास असलेले अधिकारी लागतात.
परकीय उपकरण फिल्डमधे फेल गेले तर इतका गहजब होत नाही.
परंतु भारतीय बनावटीचे उपकरण फेल गेले तर, त्याव्यक्तीला (उपकरण निवडणार्या) जीव नकोसा होईल इतक्या चौकशा कमीटी बसवून करतात.
आपल्या देशात गोर्याकातडीच्या सायबाला देवाचा दर्जा आहे. त्याचा चूका माफ होऊ शकतात. आमच्या नाही.
ह्यासाठीच चाचण्या असतात. उदा. रणगाड्यात वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स हे तीव्र धक्के सहन करणारे हवे. 'जी शॉक टेस्टिंग' नावाचा एक प्रकार असतो. त्यात त्या उपकरणाला अतिशय तीव्र धक्के दिले जातात आणि मग ते पुन्हा तपासले जाते. अशा अतिशय कठिण चाचण्यामधून हा सप्लाय पार पडलेला होता.
एवढे करुनही काही फेल्युअर्स होऊ शकतात पण ते कोणत्याही उपकरणाबाबत असू शकते आणि चुकेल म्हणून करायचेच नाही असे ठरवले तर सुधारणा करणार कशात?
असो. गुंतागुंतीचे प्रश्न आणि उत्तरे आहेत हे खरे.
"इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा."
~~ जरी श्री.नितिन थत्ते वरील वाक्यातून विशिष्ट विषयाच्याच 'रसिकास चेतावणी' दिली असली, तरी शिक्षणक्षेत्रातील विविध घडामोडीविषयी मला एक चळवळ्या या नात्याने उत्सुकता असल्याने व जरी मी कला शाखेचा पदव्युत्तर विद्यार्थी असलो तरी हा धागा विषय व त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिसाद मुद्दाम वाचले. इथे जरी फक्त इंजिनिअरिंग टीचिंग फॅकल्टी आणि अभ्यासक्रमाच्या उदासनेतेविषयी चर्चा घडत असली, तरी या राज्यातील कला आणि वाणिज्य शाखेतील अॅट पार सिच्युएशन अजिबात वेगळी नाही, इतकेच म्हणतो. ८०% मुले-मुली "मी पदवीधर आहे" या लेबलसाठीच येत असल्याने या दोन शाखेतील (काही सन्मानयीय अपवाद वगळता) प्राध्यापकांच्या ज्ञानलालसेविषयी आनंदीआनंदच आहे.
एक वैचारिक धागा आहे हे निश्चित.
इन्द्रा
इतर व्यावसायिकांमध्ये - विशेषतः डॉक्टरांमध्ये एक मूलभूत गाभा कायम आहे - मनुष्याचं शरीर बदलत नाही. त्यावर इलाज करताना येणारे प्रश्न काळाबरोबर विस्तृत होतात, पण वेडेवाकडे पसरत नाही. इंजिनियर किंवा तंत्रज्ञांच्या बाबतीत तसं नाही - प्रश्न बदलतात, तंत्रज्ञान बदलतं. त्यामुळे एका अर्थाने इंजिनियरींगचे कोर्स म्हणजे कॉमर्स, आर्ट्ससारखे अधिक व्यापक कोर्स आहे असं मला वाटतं. त्यामुळे काही प्रमाणात ऑन द जॉब ट्रेनिंग होणं हे बरोबर वाटतं. अर्थात सिव्हिल इंजिनियरिंगसारख्या शाखेबाबत हे तितकंसं लागू होत नाही.
त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी शिकवावं हा मुद्दा पटला.
अतिशय उत्तम काथ्याकुट काढल्याबद्दल थत्तेशेठ, मनापासून अभिनंदन.. प्रतिसाद ही खूप उत्तम आले आहेत.. एक अभियंता या नात्याने ह्या प्रश्नाकडे बघताना घासकवडीशेठशी काही प्रमाणात सहमत..
डॉक्टर, वाकील काही प्रमाणात कॉमर्स ह्या विषयाचे ऍप्लिकेशन (वापर? )तसा मर्यादित क्षेत्रात आहे.. पण सापेक्षतेने अभियांत्रिकीचा वापर, आवाका खूप मोठा आहे.. त्यामुळे वापराच्या दृष्टीने नक्की कशा कशाचे प्रात्यक्षिक अध्यायानं अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये घेतले पाहिजे असा प्रश्न मला नेहमी पडतो..
अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्णं केल्यावर मिळणार्या अभियांत्रिकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याची लॉजिकला थिंकिंग (तर्कशुद्ध विचार? ) करायची क्षमता इतर अभ्यास क्रमां पेक्षा जास्त वाढते असे वाटते.. आणि त्याच मुळे आयटी क्षेत्राची कवाडे जेव्हा उघडली तेव्हा अभियंत्यांना त्यात प्राधान्य देण्यात आले(आयटी मधले काही ही येत नसताना).
त्याच बरोबर हे ही तितकेच सत्य आहे की विद्युत अभियांत्रिकीच्या ४ वर्षात मी जे काही शिकलो ते टाय्मर ,कॉंटाक्टर आणि मशिन्स मला आज पर्यंत कधीच दिसले नाही तंत्रज्ञान फार पुढे गेले होते.. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात फिल्डवर्क जरी नसले तरी निदान, जे व्यावसायिक क्षेत्रात वापरले जाते त्या तंत्रज्ञानाचा समावेश असावा. ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलते आहे त्याच वेगाने अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम अद्ययावत करायला हवेत.
शिक्षणाने इंजिनीअर नसतानाही प्रतिसाद देते आहे -
वकील, डॉक्टर, सी ए - यांच्या चूकांना क्षमा नाही त्यामुळे त्यांना आधीच भरपूर सराव देत असावेत. आणि भरपूर प्रकल्प देखील उपलब्ध असतात हेदेखील कारण असेल.
मरीन इंजीनीअरस ना भरपूर अॅप्रेन्टिसशिप करावीच लागते. कारण वन्स ऑन द शिप, यु आर ऑन युअर ओन.
सिव्हील इंजीनीअरस ना का नाही देत भरपूर सराव (फिल्ड वर्क चा) कोणास ठाऊक. कदाचित तितके प्रकल्प उपलब्ध नसतील की प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवून शिक्षण देता येईल "रेडी फॉर मार्केट" करण्यासाठी.
________________
प्राध्यापकांची ज्ञानलालसा - फर्ग्युसन रॉक्स!!! द बेस्ट फॉर प्रोफेसरस. पुणं खरच विद्येचे माहेरघर आहे. खूप मनापासून शिकवणारे, तळमळीने शिकवणारे, क्रिएटीव्ह प्राध्यापक मिळाले. ते नसते तर आयुष्यात काहीतरी चांगलं हरवलं असतं आणि ते हरवलय हे कळलही नसतं. ज्ञानदान या व्यवसायाबद्दलच आदर आहे.
वकील, सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या चुकांनाही क्षमा नसते, असे वाटते. उदा. पुरेसे आणि आवश्यक सुरक्षानियंत्रक नियम नीट न वापरल्याने कित्येक कोटी डॉलरमूल्य असलेला कंपनीच्या ग्राहकांचा खाजगी विदा जालकंटकांच्या हाती पडून नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. या 'अक्षम्य' चुकीबद्दल संबंधित सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या गटप्रमुखाची हकालपट्टी झाल्याचे एक उदाहरण डोळ्यांसमोर आहे. त्यावरून हे विधान करीत आहे. असो.
(अनुभवी)बेसनलाडू
डॉक्टरांचा - विशेष करून शल्यविशारदांचा - मानवी जीवनाशी थेट, प्रत्यक्ष संबंध जितका येतो, तितका इतर कोणत्याही व्यावसायिकाचा येत नसावा. नाही म्हणायला स्थापत्य अभियंते, आर्किटेक्ट वगैरेंचा संबंध येतोच; त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल कोसळल्यास होणारी जीवितहानी व वित्तहानी हे मोठेच नुकसान आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या चुका क्षम्य असतीलसे वाटत नाही. हीच गोष्ट विद्युत अभियंते, विद्युत दळणवळणा अभियंते, संगणक अभियंते यांच्याही बाबतीत सिद्ध करता येईलच.
(अभियंता)बेसनलाडू
मला वाटते ही क्षम्याक्षम्यता स्थलकालसापेक्ष, व्यक्तीसापेक्ष आहे. एका ठराविक व्यावसायिकांच्या गटास सरसकट लागू करण्यात हशील नाही.
(निरपेक्ष)बेसनलाडू
निदान संगणकशास्त्राशी संबंधित ज्ञानशाखांमध्ये तरी उपयोजनाभिमुख प्रकल्पांचा तुटवडा नसावा, असे वाटते. माझे संगणकशास्त्राचे पदवी शिक्षण २००१ - २००५ आणि पदव्युत्तर शिक्षण २००५ - २००७ या कालावधीत झाले. निदान या सहा वर्षांच्या शैक्षणिक कालखंडात एक विद्यार्थी म्हणून अशा प्रकल्पांचा तुटवडा मला भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात, त्या क्षेत्रात काम करणार्या उद्योगांत दिसला नाही. मात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुवत, आत्मविश्वास, व्यावसायिक म्हणून होणारा निरोगी व्यक्तीमत्त्वविकास आणि अशा उद्योगाभिमुख प्रकल्पांमध्ये काम करण्याची वैकल्पिक किंवा अनिवार्य संधी हे सगळे घटक उत्तम व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्यास कारणीभूत असावेत, असे वाटते.
(व्यवसायाभिमुख)बेसनलाडू
सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या चुकांनाही क्षमा नसते,
+१.
प्रत्येक शाखेनुसार याचे नियम बदलतात. काही शाखांत कायदेशीर कारवाईही होउ शकते.
अमेरीकेचे उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डिझाईन सारख्या महत्त्वाच्या कामासाठी पी. ई. ची परिक्षा पास करावी लागते. इथे तुमच्या चुकीमुळे मोठी (जिवीत अथवा इतर) हानी झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होउ शकते.
विमान अभियंत्यांमध्ये विमानाच्या मेंटेनन्सचे लायसन्स घ्यावे लागते. विमान उडण्यास सुस्थितीत आहे अशी सही ह्या लायसन्स इंजिनीअरने केल्याशिवाय विमान उडु शकत नाही. हे लायसन्स मिळवणे बरेच वेळखाउ आणि कष्टाचे काम असते.
बर्याच अंशी सहमत आहे. इंजिनिअरींग मध्ये पुस्तकी ज्ञानावरच पुष्कळ भर असतो (ते ज्ञान महत्त्वाचे आहेच). मी स्वतः इंजिनीअरींग करुन प्रथम इंटर्न म्हणुन लागलो तेव्हा माझ्या मनात आलेले विचार अश्याच प्रकारचे होते. मला दिलेल्या कामात (बेसिक सोडले) तर मी शिकलेल्यातले फारसे उपयोगाचे नव्हतेच.
मात्र विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या इंटरेस्टने बर्याच गोष्टी शिकुन घ्यायला हव्यात असे माझे मत आहे. जे काही वर्कशॉपचे तास असतात त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे(जवळजवळ सर्वच जण, मी कुठे लेथ वगैरे वापरणार आहे आयुष्यात म्हणुन कसेबसे वर्कशॉप आवरतात).
इंडस्ट्रीअल अनुभव पुरेसा मिळणे शक्य नाहीच, त्याच अक्रीता इंटर्नशीप -फायनल इअर प्रोजेक्ट वगैरेंचा फायदा घेउन शक्य तितक्या गोष्टी शिकाव्यात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकी ज्ञान तरी किमान नीट मिळवावे, तेही जमले नाही (अनेकांना जमत नाही हे स्वानुभवाने सांगतो, अनेक शिक्षकांनाही नसते म्हणा) तर मात्र तेलही गेले अन तुपही गेले.
मी ६७ चा मेक्यानिकल इंजिनिअर असुन कारखान्यात शोप फ़्लोअर वर काम केलेला माणुस आहे...
खरा अनुभव तुम्हाला शोप फ़्लोअर वर काम केल्यावरच मिळतो..हि लाईन कष्टाची असुन त्यात खुप मानसिक समाधान मिळते..क्रिएटिव्हिटीला खुप वाव असतो..टूल्स व जिग्ज्स फ़िक्स्चर्स च्या कामात..
परंतु ९५ नंतर कंप्युटर ची लाट आली व व तरुण पिढिला हात काळे करण्याची व १० तास उभे राहुन काम करण्याची व कामगारांशी हुज्जत घालुन उत्पादन चे लक्ष गाठणे हा मार्ग कष्ट प्रद वाटु लागला. व त्या मुळे बी.ई झाले कि सी ड्याक सारखा एखादा कोर्स करुन कधि अमेरिकेला पळतो अशी तरुणांना घाई झाली. व ह्या क्षेत्रात करीअर करणार्यांची संख्या घटली...
त्या पेक्षा बी.ई होऊन एखादा सोफ्ट वेअर चा कोर्स करुन ८ तास मस्त थंड हवेच्या ए.सी वातावरणात कळ फलक बडवणे व मोठा पगार घेणे फायदेशिर वाटु लागले..
मेक्यानिकल इंजिनिअरींग हि सर्व इंजिनिअरींग लानईची आई आहे..व नोकर्या निर्माण करण्याची क्षमता फक्त मेक्यानिकल इंजिनिअरींग मधे आहे..पण मुक्त अर्थ व्यवस्था आली अन ह्या क्षेत्राची वाट लागली..लाखो कामगार बेकार झाले..
आज सोफ्ट वेअर हा परवलीचा शब्द आहे..व तरुणांचा तिकडे ओढा जास्त आहे...
त्या मुळे आज श्रम व श्रम प्रतिष्टा हे शब्द इतिहास जमा झाले आहेत..
काळाचा महिमा...उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे...
मेकॅनिकल इंजीनीयरींगची उपयुक्तता पुन्हा लोकांना कळेल.
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिवील इं. ह्या शाखांतुन अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅजुएट शाखांचे जास्त पर्याय उपलब्ध असतात.
थत्ते काका, एक छोटीशी सुधारणा करतो - अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेत एम एस आणि पी एच डी हे ग्रॅज्युएशन आणि बॅचलर डिग्री (बी एस, बी ए वगैरे) हे अन्डरग्रॅज्युएशन समजले जाते. हे भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या तुलनेत वेगळे आहे. असो.
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू
येथे बॅचलर, मास्टर्स आणि पी एच डी सर्वच शिक्षणास्तरांवर इन्टर्नशिप (साधारण ३-४ महिने) आणि को-ऑप (साधारण ६-८ महिने) अशा दोन माध्यमांतून विद्यार्थ्यांना थेट उद्योगक्षेत्रातील प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. कंपनीमध्ये काम करताना त्या इन्टर्नशिप किंवा को-ऑप च्या मुदतीत मुदतीत पूर्ण होऊ शकेल, विद्यार्थ्यांचे अनुभव, ज्ञान, ज्ञानोपयोजनक्षमता व व्यवसायाभिमुख व्यक्तीमत्त्व यांचा विकास होईल, अशा स्वरूपाचे छोटेमोठे काम मिळते. बव्हंशी तांत्रिक स्वरूपाचे आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणशाखेशी थेट संबंध असणारे असे हे काम असून त्याबद्दलचा एक सविस्तर अहवाल विद्यार्थ्याला ते काम पूर्ण झाल्यावर त्याच्या विद्यापिठाकडे सुपूर्त करावा लागतो. असाच एक लिखित अहवाल किंवा छोटे प्रेजेन्टेशन त्याला कंपनीमध्येही द्यावे लागते. मात्र असे असले, तरी स्वानुभवावरून इतके सांगता येईल की असे करतानादेखील 'मार्केट स्टडी' तितकासा होत नाही; तो पूर्णवेळ काम करतानाच अधिक परिणामकारकपणे करता येतो.
भारतात अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अशी इन्टर्नशिप किंवा को-ऑप ची संधी मिळत नाही. नाही म्हणायला शेवटच्या वर्षी जे प्रोजेक्ट करायचे असते, ते कॉलेजबाहेर कंपनीत करता येते; पण सर्वच विद्यार्थ्यांना तशी संधी उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. तसेच इन्डस्ट्रिअल टूर नावाचा जो एक निरर्थक खेळ खेळला जातो, त्यानेही फार फायदा काही होत नाही. आठवडाभराच्या इन्डस्ट्रिअल टूर मध्ये आम्ही बंगलोरमध्ये याहू आणि विप्रो ला एक दिवसाची भेट देऊन उरलेले पाचेक दिवस उटीमध्ये थंड हवेत घालवले होते ;)
याव्यतिरिक्त उत्तम अभियांत्रिकी शिक्षणासाठी खाजगी उद्योग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी (पक्षी सरकारने) विद्यापिठांमधील संशोधनांत गुंतवणूक करणे, उद्योग क्षेत्रातील अधिकाधिक व्यावसायिकांनी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिकवणे, सेवाक्षेत्रातून निवृत्ती पत्करल्यानंतर महाविद्यालयांमध्ये अध्यापन हे कळीचे मुद्दे आहेत, असे मला वाटते. येथे दिलेल्या माझ्या एका प्रतिक्रियेत मी यावर मत मांडले होते.
(अनुभवी) बेसनलाडू
इन्टर्नशिप चा चांगला अनुभव आला आहे. दिलेले काम आवडीचे, महत्त्वाचे (कंपनीसाठी तसेच आमच्यासाठी) होते. कंपनीच्या मुख्य प्रकल्पाशी थेट संबंध नसलेले असल्यास पूरक तरी असायचेच.
फायली लावायला लागण्याइतका वाईट (?) अनुभव कुणाकडून ऐकला नाही. 'मॅन्युअल टेस्टिंग' हा त्यामानाने वाईट ठरणारा अनुभव मात्र मी स्वतः घेतला आहे :)
(अनुभवी)बेसनलाडू
चर्चा विषय चांगला आहे - चर्चेची मांडणी आणि प्रतिसाद देखील आवडले. खालील प्रतिसाद हा चर्चा आणि प्रतिसादांना (व्यक्तीगत नावे न घेता) आहे. काही मुद्दे आले असले तरी महत्वाचे वाटतात म्हणून लिहीत आहे:
इंजिनियरींगच्या संदर्भात अमेरिकेत, कॅनडात तसेच इतरत्र कदाचीत सर्वच प्रगत राष्ट्रात "प्रोफेशनल इंजिनियर" (पी.ई. / पी. इन्ज.) सारख्या प्रमाणपत्राची गरज असते. त्या शिवाय ते कायम ठेवण्यासाठी काही ठिकाणी रिफ्रेशर कोर्सेस पण करावे लागतात.
अमेरिकेत पी.ई. हा प्रकार प्रत्येक राज्यात वेगळा आहे! त्यामुळे उ.दा. म्हणून न्यू यॉर्क राज्यातील पी.ई.स मॅसॅच्युसेट्स मध्ये पि.ई. म्हणून काम करता येणार नाही. शिवाय त्यांच्या परीक्षांची पद्धत पण वेगळी असते. एक गंमत म्हणून जाता जाता उदाहरण देतो: सर्वत्र समान असलेली इंजिनियर इन ट्रेनी ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पिईच्या हाताखाली डिझाईनचा अनुभव असल्याचे सिद्ध करावे लागते. मॅसॅचुसेट्स मध्ये ते दाखवायला रिपोर्ट लिहावा लागतो. त्याची किमान काही वर्षांपुर्वीची अट होती की हा रीपोर्ट ८.५"क्ष११" कागदावर असला पाहीजे आणि त्याचे वजन १ पौंडापेक्षा कमी असले पाहीजे! (कागद किती ते महत्वाचे नाही!). असो.
सिव्हील इंजिनियरींग मधे पिई ही स्ट्रक्चरल, जीओटेक, पर्यावरण, आणि सिव्हील इंजियरींग म्हणून (कन्स्ट्रक्शन) वेगवेगळी असते. एका टोपीने दुसर्या टोपीचा व्यवहार करता येत नाही.. असे एक ना अनेक... मला हा प्रकार जबाबदारी (लायाबिलीटी) पेक्षा प्रोटेक्शनचा जास्त वाटतो.
सध्याच्या काळात भारतात, माझ्या माहीतीप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून नगरपालीकेत नाव नोंदवताना अनुभव दाखवावा लागतो वगैरे प्रकार आहे. भारतात पण सध्या असेच सर्टीफिकेशन आणायचे चालले आहे. मात्र एकीकडे गरज आहे असे नक्की वाटत असताना हेच उत्तर आहे का हे कळत नाही, विशेष करून त्यातील ढुढ्ढाचार्यांच्या वापराच्या प्रकारामुळे...
इंजिनियरींगच्या क्षेत्रात फिल्डवर्क कमी असते हे जसे सत्य असते, तसेच वर संबोधिलेलेल ढुढ्ढाचार्य पटकन नवीन मुलाला कामे देऊन अनुभव घेण्यास मदत करत नाहीत तर आपल्या हाताखालचा एक इंजिनयर तयार करतात असे वाटते. भारतात मला या संदर्भात खूप चांगला अनुभव आला आहे, त्यामुळे हा आरोप करत असलो तरी मी स्वतःला अपवाद समजतो. दुसरे अपवाद अर्थातच लहान कंत्राटदार अथवा कन्सल्टंट्स. पण त्यांच्याकडे क्वालीटी कामापेक्षा काम कसे करून घेयचे हेच जास्त प्रॅक्टीकल म्हणून शिकता येते... हे अर्थातच मी जास्त करून सिव्हील इंजिनियरींगच्या संदर्भात बोलत आहे.
पुर्वीच्या काळात प्राध्यापकांना काहीना काही बाहेरचा फिल्ड एक्पिरीयन्स असायचा आणि मुलांना प्रॅक्टीकल गोष्टी शिकवल्या जात. अनेकांचे प्रॉजेक्ट्स हे पेपरवरचेच न राहता फिल्डवर करावे लागत. त्यातील अनेकजण यशस्वी सिव्हील इंजिनियर्स झालेली मी पाहीलेली आहेत. पण आमच्या पिढीपर्यंत सगळे बदलले होते. त्यावर लिहीणे म्हणजे अतिअवांतर होईल म्हणून तुर्तास इतकेच...
बाकी सँडविच कोर्स हा प्रकार भागुभाई आणि व्हिजेटीआयच्या डिप्लोमामधे आहे. तेथील डिप्लोमा इंजिनियर्सना चांगले प्रॅक्टीकल ज्ञान असायचे. १२ वी नंतर हा डिप्लोमा केलेले काही अमेरिकेत डायरेक्ट एम एसला पण आलेले ऐकलेले आहेत..
अमेरिकेसंदर्भातः
मी एम एस झालो असल्याने त्याचा अनुभव हा वेगळा आहे. बॅचलर्स हा प्रकार जरा वेगळाच आहे. कारण तुम्हाला विविध विषय शिकण्याची मुभा असते. अर्थात इंजिनियरींगमधील प्रमुख विषय शिकावे लागतातच. मुलांना खर्या अर्थाने प्रॅक्टीकल प्रॉजेक्ट्स करावे लागतात. स्ट्रक्चरल अथवा मेकॅनिकलमधे कसे असते माहीत नाही. फक्त मी शिकत असताना इंजिनियरींगच्या विद्यार्थाना गणित शिकवण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा किमान त्यावेळेस माझ्या अनुभवापुरते बोलायचे तर ते खूपच मागे दिसले. तेच रसायनशास्त्रासंदर्भात. पण खर्या अर्थाने शिकून पुढे येण्याची जिद्द जास्त होती...
मी अमेरिकेत एम एस करत असलो तरी बॅचलर्स लोकांना काही विषय शिकवले आहेत, त्यावरुन काही निरिक्षणे नोंदवु शकतो.
मुलांना खर्या अर्थाने प्रॅक्टीकल प्रॉजेक्ट्स करावे लागतात.
इथे खर्या अर्थाने म्हणजे काय तर अगदी व्यावसायिक प्रोजेक्टस करता तुम्ही. उदाहरण द्यायचं तर, इंजिनीअरींगच्या चौथ्यावर्षाला सिनीअर प्रोजेक्ट करावयाचे असते. सहसा ही प्रोजेक्ट्स कंपन्यांची असतात आणि पैसेही कंपन्या देतात. बरेचदा ह्याच मुलांना कंपन्या तेच प्रोजेक्ट् पुर्णत्वाला नेण्यासाठी पुढे ग्रॅज्युएशन नंतर पुर्णवेळ नोकरीही देतात.
(उदा. म्हणुन, काही विद्यार्थी फास्टेस्ट सायकल बनवत आहेत. अपेक्षित खर्च १५ हजार डॉलर्सच्या वर. सायकलच अश्या प्रकारची असेल. संपुर्ण सायकल विद्यार्थ्यांनीच बनवायची आजे, डिझाईन पासुन असेंबली पर्यंत. त्यासाठी योग्य असे अलॉय शोधण्यापासुन सगळे विद्यार्थीच करतात.)
अशा प्रकारची सायकल पाहिल्यावर आधी मला हसायला आलं होतं. पण हवेमुळे होणार्या घर्षणामुळे सायकलचा वेग किती कमी होतो हे ती सायकल पळताना पाहून लक्षात आलं. मी पाहिलेली अश्या प्रकारची सायकल बंद नव्हती. एक मध्यमवयीन बाई ती सायकल चालवत होती. आणि आम्हां दोन पंचविशीच्या लोकांना ती चढावावर एवढ्या सहज मागे टाकून पुढे गेली की हवेमुळे होणारं घर्षण आणि प्रतिरोध या दोन्ही गोष्टी दोन खगोलाभ्यासकांना लगेच समजल्या.
विज्ञानातही थोड्याबहुत प्रमाणात आपल्याकडे हेच होत आहे. आम्हाला एमेस्सीला शिकवणारे बरेचसे लोकही आपापल्या क्षेत्रात संशोधन करणारे नव्हते. सिरीयस काम करणारे काही लोक शिकवायचे आणि त्यांच्या वागण्या-बोलण्या-शिकवण्यातला फरक लगेच दिसून यायचा.
भारतात विज्ञान शाखांसाठी आता IISER सुरू झाल्या आहेत, तिथे बारावीनंतर पाच वर्षांसाठी मुलं शिकायला येतील. तिथे शिकवायला संशोधकच आहेत, तेच लोकं कोर्सवर्क ठरवणार आणि या विद्यार्थ्यांना तिसर्या आणि चौथ्या वर्षात, आपल्या आवडीच्या विषयात संशोधनपर प्रकल्प करावा लागणार अशी व्यवस्था आहे.
मी वकीली आणि सी एस अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. साधारण वकीली शिक्षण घेणारे लोक आधी वाणिज्य किंवा कला शाखेची पदवी घेतात. म्हणजेच वयाच्या साधारण २१व्या वर्षी ते वकीली अभ्यासक्रमाची सुरुवात करतात. तो पर्यंत थोडा अनुभव आलेला असतोच. पुण्यापुरते सांगायचे झाले तर इथली महाविद्यालये चांगली आहेत. बी एम सी सी आणि लॉ कॉलेज मध्ये पदवी शिक्षण घेताना खूप चांगले अनुभव आले, चांगले प्राध्यापक मिळाले. बी एम सी सी वाणिज्य महाविद्यालय असूनसुधा इथे बरेच इवेंटस व्हायचे (जसे की मॉक बोर्ड मिटींग्ज, मॉक ए जी एम, मॉक स्टॉक एक्स्चेंज ई). लॉ कॉलेज मध्ये तर वीकली काही ना काही असायचेच. लॉ मधे मूट कोर्ट हा १०० मार्कांचा एक विषयच आहे. आता तर ईंटर्नशीपचे लोण आले आहे. वकीली पूर्ण होईपर्यंत मुले निदान ५-६ ईंटर्नशीप पुर्ण करतात... आणि हो वेगवेगळ्या शहरात (मुंबई, कोलकता, दिल्ली ई). सी एस ला तर ईंटर्नशीप करावीच लागली कारण तिथे प्रॅक्टीकलला खूपच महत्त्व आहे. केवळ थीओरी वर पास होणे अवघडच आहे. ह्या सर्वांचा प्रत्यक्ष काम करत्ताना खूप फायदा झाला, होतो आहे. असे असले तरीही प्रत्यक्ष काम करतो तेव्हाचे अनुभव वेगळे असतात. आणि आपण जसे जसे त्या क्षेत्रात रमत जातो तस तसे अजून प्रगल्भ होत जातो.
सर्व प्रतिसादांचा आदर राखुन मला इथे नम्रपणे नमुद करावेसे वाटते ते अशाप्रमाणे:
विद्यार्थ्यांनी जर थोडासा पुढाकार घेतला तर त्रुटींवर मात करुन कॉलेजमधे प्रॅक्टीकल इंजिनियर बनणे सहज शक्य आहे.
पण विद्यार्थ्यांचा कल नसतो.
>>पण विद्यार्थ्यांचा कल नसतो.
असे सगळ्या विद्यार्थ्यांना नावे नका ठेऊ हो,
आमच्या नशिबी BE ची फ्री सीट असून सुद्धा घेता आली नाही. आमची आमचे BE EQ. (AMIE). पूर्णवेळ काम करून ७ वर्ष आणि १० हजार रुपयांत पूर्ण केले आहे. आणि त्याबळावर आज एक योग्य पदावर रुजू आहे. सगळे तुम्ही म्हणता तसे नसतात हो.
विद्यार्थ्यांनी जर थोडासा पुढाकार घेतला तर त्रुटींवर मात करुन कॉलेजमधे प्रॅक्टीकल इंजिनियर बनणे सहज शक्य आहे. पण विद्यार्थ्यांचा कल नसतो.
अगदी पूर्ण सहमत. फक्त विद्यार्थ्यांना कल नसतो तशीच ती दिशा देखील नसते. पालक-विद्यार्थी एका विचित्र चक्रात अडकलेले असतात. जणू काही याच्या बाहेरचे काहीच नाही असे वाटत. ह्यात मी बाजू घेत नाही पण जी वस्तुस्थिती वाटत आहे ती सांगत आहे इतकेच.
बाकी आपल्या प्रतिसादावरून अजून एक गोष्ट आठवली: आमच्या इंजिनियरींगच्या पहील्या वर्षात सिव्हील इंजिनियरींग स्टूडंट असो. चे फ्रेशर्स सोशल होते. त्यात वेगळे काय करायचे ह्याचा विचार करताना आम्ही, "मी माझी इंजि. लाईन का सिलेक्ट केली" या वर शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांतील प्रतिनिधींना बोलायला सांगितले. (एस पी असल्याने तीनच शाखा). हे अर्थातच सगळे माहीती-तंत्रज्ञान-संगणक क्षेत्र क्रांतीच्या आधीचे.
इलेक्ट्रीकल चा मुलगा त्याची शाखा कशी ग्रेट सांगत त्यात कसे जॉब्ज आहेत म्हणून मी त्यात गेलो म्हणाला. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याने मी आधी कसा सिव्हील मध्ये होतो पण मेकॅ. मधे जॉब्ज असल्याने कसा फर्स्ट इयरला कसा झटलो आणि शाखा बदलली हे सांगितले. सिव्हीलच्या विद्यार्थ्याने अपराधी भावना लपवत सिव्हील कसे ग्रेट आहे आणि त्यात पण कसे जॉब्ज आहेत हे सांगितले...
त्यानंतर एक गुजराथी आणि विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ प्राध्यापक उभे राहीले आणि "उपदेशोही मुर्खाणाम प्रकोपाय न शांतये" असे म्हणत पुढे म्हणाले की, "engineers duty is to create jobs not demand one!". अर्थातच त्यात त्यांना प्रत्येकाने धंदे सुरू करा असे म्हणायचे नव्हते पण रिसोअर्सफुल आणि उद्यमशील असणे महत्वाचे हे सांगायचे होते. ते सगळे ऐकल्यावर, मनापासून टाळ्या वाजवत सर्व विद्यार्थी परत सब्मिशन आणि ग्लास ट्रेसींगचा विचार करत हॉल मधून बाहेर पडले... ;) (कारण एका वाक्याने आणि एका प्राध्यापकाने सुधारण्याची ही गोष्ट नाही. अख्खा नसेल पण ९०% समाज हा अंधश्रद्धेप्रमाणेच अॅडमिशन आणि अॅडमिशन मिळाले की लाईफ बनगयी या विचारांच्या चरखात अडकलेल आहे...)
प्रतिक्रिया
दुर्दैवी परिस्थीती...
प्रॅक्टिसिंग इंजिनिअर .....
बरोबर
सहमत. पण पुणे विद्यापिठात
खरय
पूर्वी एकदा
खो खो !!!
असाच एक किस्सा, लेथ मशिनावर
सँडविच कोर्स असा काहीतरी
सँडविच कोर्स....
हल्ली
माझा अनुभव
चर्चा आवडली.
गद गद हस्लो
आम्ही पण लोटपोट हसलो. मी
भारी उत्तर !!
जेर्मोन ईंजिनीअर..
प्रिसाईजली हाच विचार या
फंडामेंटल किंवा ब्रेकथ्रू काम भारतीयांकडून फारसे होत नाही -
अगदी खरे आहे.
परकीय पॉवरसप्लायला रिप्लेस करणारा डीसी पॉवरसप्लाय ...
फील्डमधे फेल जाऊ नये
कला आणि वाणिज्य
वैविध्य
अतिशय उत्तम
+ १
प्रकल्पांचा तुटवडा?
चुकांना क्षमा | डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिक | प्रकल्पांचा तुटवडा
सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या
बर्याच अंशी सहमत आहे.
मी ६७ चा मेक्यानिकल इंजिनिअर
बाप कोण?
कुलकर्णी साहेब, जरा थांबा!
परदेशात इंजिनिअरिंग शिक्षण
एक छोटीशी सुधारणा | माझे निरीक्षण
इन्टर्नशिप
माझ्या अनेक मित्रांना
आय टी आणि इतर
चांगला विषय
मी अमेरिकेत एम एस करत असलो
अवांतर आहे पण ...
पाचवे वर्ष
वाचतोय..
वकील/ सी एस बद्द्ल थोडेसे
आदर
>>पण विद्यार्थ्यांचा कल
सहमत...
कॉलेजमधे प्रॅक्टीकल इंजिनियर बनणे सहज शक्य आहे.
मी
एकुण काय प्रॅक्टीकल किन्वा