Skip to main content

मेणबत्ती...

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 28/09/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा निकॉन पी-१०० मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12229
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

आवडेश.. आधी शेगड्या पेटवल्या मग मेणबत्या आता पुढे काय?? हा लेकाचा कसलेही फोटो काढतो पण येवढे छान येतात.. आम्ही हातात कॅमेराघेतला तर अ‍ॅशपण राखे सारखी दिसेल ;)

छान आलेत फोटो.

शेवटचा फोटो जास्त आवडला. त्यातले वितळत असलेले मेण पारदर्शक झालेले आहे आणि अगदी कडेला येऊन थांबले आहे.

वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे. *याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे. भूतबाधा झालेली नाही आणि ज्योतीच्या (मेणबत्तीच्या...;) ) अंगात देखील आलेले नाहीये !!! ;) याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत! मेणबत्तीच्या खाली कुठलीही काच किंवा इतर वस्तू ठेवलेली नव्हती, कॅमेरा कोणत्या अँगलने धरला आहे, त्याच्या लेंन्सवर किती प्रकाश पडतो आहे, प्रकाश ज्योतीचे हलणे, कॅमर्‍याचे मेणबत्ती पासुनचे अंतर या सर्व गोष्टी कारणीभूत असतात... मुख्यतः लेंन्सवर पडलेला प्रकाशच या गोष्टी करता कारणीभूत ठरतो, तेव्हा अँगल बदलुन फोटो काढणे हाच पर्याय मला योग्य वाटतो. बाकी यमी ताई तूमची नजर तिक्ष्ण हाय... ( बहुधा लांबचे तारे पाहुन पाहुन डोळ्यांना चांगला व्यायाम होत असावा !!! ;) ) वेगळ्या अँगलनी काढल्यावर त्यात घोस्ट इफेक्ट कसा स्पस्ट दिसतो हे खालच्या फोटोत पाहुन कळेल...

सर्व प्रतिसाद देणार्‍यांना धन्स... :) आपले मौल्यवान प्रतिसाद टंकण्याचे कष्ट न घेणार्‍यांना होलसेल मधे धन्स... ;)

तु लावलेले दिवे आवडले. कॅमेरा उभा धरुन(आता आहे तसा आडवा / लॅडस्केप नको) अजुन टाईट कंपोझिंग करता आल असत. पुढच्या वेळी करुन बघ. १ला आणि शेवटाचा विशेष आवडले.

लास्ट- ब्लॅक व्हाईट मस्त आहे.

खूपच छान, सर्व फोटो आवडले. रंग सुरेख आले आहेत.

पहिल्या फोटोत दोन स्त्रिया ओढणी घेऊन प्रकाशाच्या तळ्याकाठी पाठमोर्‍या बसल्या असाव्यात असा मेणाचा आकार झाला आहे. शेवटचा फोटोही सुंदर.

खूप छान छान प्रतिसाद आहेत.. प्रतिसाद खूप आवडले.. अजून प्रतिसाद येऊ द्यात.. वेगवेगळ्या अँगलने..

पहिला आणि शेवटचा आवडला. मेणबत्ती विझवल्यावर येणार धूर पण टिपायला पाहिजे होता... तो पण छान दिसतो.

सगळे फोटो भारी आले आहेत.

बाकी बाणाने क्यामेरा आणल्यापासुन नवे उद्योग चालू केले आहेत... वरची फोटोग्राफी मात्र झक्कास जमून आली आहे.. - (रिकामे उद्योगप्रेमी) पिंगू