Skip to main content

कट्टा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 14/05/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टे तह्रेतह्रेचे कट्टे हसत खिदळत चघळत गप्पा बहरत खुलत सतत हा कट्टा गहीवरून कधी बसतही धक्का बांधीत नकळत मनांते पक्का वासु कट्टा वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल खटनट वासु म्हणे करन्ट कमाल पेन्शनर कट्टा म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले पारावर चार पेन्शनर पळभर विसावले गप्पांवर स्मृतींवर खरोखर तरवरूनी जगले कचेरी कट्टा टपरी आड खडं झाड पल्याड खुराडं कचेरीचे जथ्थाड जाड उंचाड भांड खादाड कर्मचार्‍यांचे वाढ हाड तयांना जुगाड खाडखाड हो कामाचे कट्टा द्वाड, परी तडोताड चीरफाड नाड लाल रंगांचे महिला कट्टा जमल्या दुपारल्या किटीला एका महिला बला विशाला अनेका हसल्या फुसकुल्या वात्रटल्या जोका चाखल्या कागाळ्या, कानाला हलक्या मिपा कट्टा शब्द बांध धुंद उदंड छंद हप्ता भराचा बलदंड अंदाधुंद अखंड तरंग हा भावांचा नोंद प्रचंड सांडता मंद गंध कल्पनांचा मिपा सांधे बंध करी थंड, ताप व्यापांचा ...... लगे रहो मिपावासीयों.....
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3655
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल :)) :))

शब्द बांध धुंद उदंड छंद हप्ता भराचा बलदंड अंदाधुंद अखंड तरंग हा भावांचा नोंद प्रचंड सांडता मंद गंध कल्पनांचा मिपा सांधे बंध करी थंड, ताप व्यापांचा हे छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हा हा ! मस्तच. - =D> =D> =D> =)) =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ही: हा:हा: लय भारी हो!!! मजा आली :))