Skip to main content

स्वतःलाच कधी फसवले आहे का? (चांगल्या अथवा वाईट हेतूसाठी )

लेखक स्पा यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 724
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पहिल्या पर्यायाला मत दिले आहे. स्वतःला फसवण्याचे एखादे उदाहरण देता येईल का? दुसरा पर्याय 'all is well' दिला आहे तो स्वतःला फसवण्याचा प्रकार नाही.

In reply to by नितिन थत्ते

समाजात वागताना...... किती गोष्टी... आपल्याला मनाविरुद्ध कराव्या लागतात....... ईच्छा नसताना.... वरीष्टांसमोर लाळघोटेपणा करावा लागतो....... हे सुद्धा स्वतःला फसवनच झालं.... खोटं किती बोलतो याची तर गणतीच नसते......(भले ती चांगल्यासाठी सुद्धा असेल....) हे सुद्धा फसवल्या सारखंच आहे न.......

मत कश्याला द्यायच ते ठरवु नाही शकले, पण होय मी ' मोठ्ठी माणस आप्ल्या भल्या साठीच करतात ' असा विचार करुन स्व्तःला जन्म भराची शिक्षा विकत घेतली आहे. याला फसवण च म्हणायच ना?

In reply to by अनिल २७

"ह्यांनी" वाचलं तर काय म्हणतील ? कदाचित ते सुद्धा असेच म्हणतील. बायदवे सगळे असंच म्हनतात. (कृपया हलके घेणे)

स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात? ...नुसते नाटक! स्वतःला तर कधीच नाही, शक्यतो इतरानाही नाही, चांगल्यासाठीसुध्दा नाही. मला तोंडावर ( आरशासमोर देखील) खरे बोलण्याची ( अर्थात, गोड शब्दात!) वाइट खोड आहे.

In reply to by कवितानागेश

>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात ? स्वतःशीच काय कोणाशीच प्रामाणिक नाही राहिले तर आयुष्यात खूप काही मिळते,अगदी पंतप्रधानदेखील व्हाल. नाहीतर एखादे मंत्री, संत्री तर नक्कीच

हॅ हॅ हॅ, साऱ्या भारतवासियांना फसविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. १०० दिवसांत महागाई कमी करणार होतो मी, केली का ?