कृपया मनापासून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौल संपल्यानंतर आकडेवारीचा आढावा घेणारा एक लेख लिहिण्याची इच्छा आहे.
जर तुम्हाला नागाचं स्वप्न ४ वेळा पडलं असेल, कावळा २ वेळा दिसला असेल व पूर्वज ५ वेळा दिसले असतील तर तुमचं उत्तर
४ + २ + ५ = ११ असं द्यावं अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
शून्य वेळा ला मत दिलं आहे.
त्याचं काय आहे की आम्हाला स्वप्न पडत नाहीत. पडली तरी ती जागे झाल्यावर लक्षात रहात नाहीत. आम्ही ठार झोपतो ते पहाटे जाग येईपर्यंत!
त्यामुळे स्वप्नात साप, नाग, अजगर, कावळा, (साहेब, बायको, संपादक... लिश्ट् फार लांब आहे!!!) पहाणार्याबद्दल कणव आहे!!!!
:)
मला स्वप्न पडतात.
मृत सास-यांच्या नावाने पितृपक्षात दही भात ठेवायला सांगणारे जैन साधू दिसले होते. कुठलाही काहीही विचार/ घटना/ संपर्क काही ही नाही. ऑल ऑफ अ सडन. कारण तो दिवस मी पूर्ण विसरले होते. दहीभात / जेवणाचा विचार ही नव्हता.
मी अजून त्या दिवशी दहीभात ठेवते. ते कावळा/ कुत्रा कुणीही खाल्लेले पाहिले नाही.
साप खूपदा दिसतात.
परिक्षेचा अभ्यास झालेला नाही, काही येत नाही आहे वगैरे नेहमीच पडतात. (लॅक ऑफ कॉन्फिडन्स !)
काही प्रश्नांवर अचूक तोडगे स्वप्नात/ रात्रीच मिळाले आहेत.
लेखनाचे विषय ही रात्री शांतता असताना सुचले आहेत. मी तेव्हा झोपेत नसते.
माझे श्रध्दास्थान श्री गजानन महाराज यांचे ही स्वप्न २-३ वेळा पडले आहे. त्यांनी दर्शन दिले असेल किंवा माझ्या मनाचा खेळ.
मी शहानिशा करत बसले नाही. करणार तरी कुणाकडून? स्वप्न मानले पण अजून लक्षात आहे सविस्तर. साशंकता कारण स्वप्नात ला श्री गजानन महाराजांच चेहरा वेगळाच होता. पोथी, पुस्तकात तो कधीच दिसला नाही. पण एका फोटोत साधर्म्य होते. मला महाराजांनी सांगितले की ये आणि ही बघ तू मागच्या जन्मी ची. त्या स्वप्नात मागचा जन्म स्पष्ट दिसला. मी लहान होते ती जागा वगैरे. पण पुन्हा कोण विश्वास ठेवणार? मी सुद्दा नाही. ते स्वप्नच होते.
हे सर्व काही ही मनात विचार नसताना. नाही भाषण/ वाचन/ ना इतर काही.
३६ ते ४० वेळा याला मत दिले आहे.
मला स्वप्नात नेहमी माझे मॄत नातेवाईक मित्र किंवा ओळखीची व्यक्ती असे दिसतात.
स्वप्नात ते माझ्याशी गप्पा देखील मारत असतात. विचित्र म्हणजे स्वप्नात आलेली ती व्यक्ती मेलेली आहे हे मला जाणवत असते.
भीति वगैरे नाही पण अगोदर हे मला फार विचित्र वाटायचे . घरात सहज म्हणून हे साम्गितले तर मला काही जणानी नारायण नागबळी वगैरे करा म्हणून सांगितले. अर्थात ते अजूनतरी केलेले नाही. करणार नाही.
माझ्या पत्रीकेत कालसर्प योग आहे असे कोणी कोणी म्हणतात. त्यामुळे काय होते हे मला माहीत नाही . माहीत करून घ्यायची इच्छासुद्धा नाही.
मॄत नातेवाईक स्वप्नात आले तर त्यामुळे काय होते? ते कशाचे द्योतक असते?
मला ते स्वप्नात येवू नये असे वाट्त नाही. यावेत असेही वाटत नाही. त्यामुळे नक्की काय होते?
हा धागा कशासाठी काढलाय हे कळाले नाही.
किती जणानी काय लिहिले म्हणजे कोणता सर्व्हे होईल आणि त्यातून कोणती निष्पत्ती निघणार आहे हे कळाले तर बरे होईल
तसे असते तर तुमचे व तुमच्या पितरांचे कधी पटले नसते. बाकी ह्याला स्वप्नदोष देखिल म्हणतात.
स्त्रींयाना देखिल अश्या पध्दतीने पुरुष अभिनेते किंवा राहुल गांधी स्वप्नात येतात का? त्याला देखिल स्वप्नदोषच म्हणतात काय?
अगदी असेच .. एकतर स्वप्न पडत नाही आणि एखाद्यावेळेस पडलच तर ते लक्षात राहात नाही.
मला तर इतकी गाढ झोप येते की मला कोणी उचलुन जरी नेलं तरी समजणार नाही. त्यामुळे पिडांकाकांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना हे प्राणी वगैरे दिसतात त्यांच्याबद्दल कणव आहे :)
पण मुंग्या मात्र असंख्य वेळा दिसल्या आहेत, भसाभसा वारुळातून बाहेर पडणार्या मुंग्या आणि मला भीती वाटून मी जागा झालेलोही आठवते आहे. हे स्वप्न बरेचदा पडायचे, १०-१२ वर्षांचा असताना बहुदा बंद झाले.
लहानपणी बुद्धीबळ खेळायला शिकलो त्यानंतर काही दिवस हत्ती, घोडे, उंट दिसत मग ते बंद झाले.
सध्या नजिकच्या काळात काही प्राणी दिसल्याचे आठवत नाही.
माझे कोणी पूर्वजही मला स्वप्नात कधी दिसलेले नाहीत. कोणत्या पर्यायाला मत द्यावे हे समजत नाही.
चतुरंग
मला आजपर्यंत अंदाजे १०-१५ वेळा नाग्/साप (एकटा साप , सापांचा समुह , सापांचा गराडा )स्वप्नात दिसले आहेत.
दरवेळी डेंजर घाबरून जागा झालो आहे.
कावळा स्वप्नात कधी नाही दिसला. कावळ्यामुळे विशेष दखल घेण्याजोगी कोणतीही भावना जागृत होत नसल्याने , जरी तो दिसला असला तरी कदाचित आठवत नसावे.
काही निकटचे मृत पूर्वज ही स्वप्नात २-३ वेळा आले आहेत.
(अवांतर : सध्याच एका चित्रपटात झोंबी कावळा बघितला , आता कधीतरी तो ही स्वप्नात येईल)
शुन्याला मत दिले आहे.
कधी लहानपणी कोणी पूर्वज दिसले असले तरी आता आठवत नाही.
नाही म्हणायला वेडीवाकडी स्वप्ने सारखी पडत असतात.
त्यात प्राणी दिसले असले तरी आत्ता आठवत नाहीत.
मला जवळ जवळ रोज, अगदी चुकून झोपले तर दिवसाढवळ्याही स्वप्ने पडतात. पण अजून कुठल्याही पक्षाने आणि पितराने माझ्या स्वप्नात येऊन कसलाही टाईमपास केला नाही.
आणि जरी आले असते, तरी मी त्यांच्या दिसण्याचा आणि कसलाही संबंध लावला नसता. पण आता या चर्चा वाचल्यावर एक प्लॅन सुचतोय. स्वप्नात आलेल्या पक्षाच्या, प्रिफरेबली कावळ्याच्या स्वप्नात आपण जायचे आणि त्याला स्वप्न पाहायला लावायचे, त्याच्या स्वप्नात जे कुणी येईल, त्यालाही स्वप्न पाडायचे. अशा पाच-सहा लेव्हल्स झाल्या की कंटाळा आला म्हणायचे, मग कंटाळ्याचाही कंटाळा करायचा. ज्यांना हवेय त्यांनी स्वप्नातच भकाभक सिगारेटी ओढायच्या, दारू प्यायची.. आणि डोक्याची उगीचच झेडझेड झाली म्हणायचे... आणि स्वप्नातून परत येऊन 'शून्यच शून्य' पुस्तक लिहायचे. पुस्तक लिहिताना त्यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही हे अगदी मस्ट हं!!! मग पुस्तक लिहून आपल्याला आणि वाचकांना काही कळत नाही. तरी एक पुस्तक आवडणारा आणि एक न आवडणारा गट तयार होतो. पुस्तक आवडलेले लोक पुस्तक खरेदी करून वाचतात. न आवडलेले, या पुस्तकात नक्की न आवडण्यासारखे काय आहे हे पाहायला पुस्तक खरेदी करतात. आणि आपली मानधनाची चान चान सोय होते.
आर्किटेक्ट, फोर्जर, केमिस्ट, या लोकांसाठी फर्स्ट कम फर्स्ट अॅक्सेप्टेड धर्तीवर संधी उपलब्ध. येथे त्वरित संपर्क साधा..
ही सुंदर रेसिपी आहे. मस्त कलंदर तै, तुम्ही ते पुस्तक वगैरेच्या फंदात न पडता तो तुमचा ज्यूस विका. थोड्याच काळात मिलियनेर व्हाल. (तो लीगल आहे की नाही माहीत नाही, पण त्याने काही फरक पडत नाही)
मला रोज न चुकता स्वप्नं पडतात, विकेंडला झोप लांबवली तर दोन दोन वेगळी स्वप्नं पण पडतात. मध्येच उठलो तरी स्वप्नं कंटीन्यु होतात (स्वप्नं आहेत की केकता कपुरच्या सीरीअली च्यायला) आणि बराचसा तपशीलही आठवतो.
माझ्या स्वप्नांचा मात्र रोजच्या जगण्यावागण्यतला संबंध बराचसा स्पष्ट असतो. (ड्रायव्हिंग शिकताना, रोज अपघाताची स्वप्नं, हाईकिंगला जाताना हरवुन जाण्याची किंवा खायला प्यायला काही नसल्याची स्वप्नं, रोप क्लाइंबिंगला जायच्यावेळी रोप तुटुन कपाळमोक्ष होण्याची स्वप्नं वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे अजुनही परिक्षेच्या वेळेला, दुसर्याच विषयाचा अभ्यास करुन गेलो, हॉलटिकिट घरी विसरलो वगैरेतर अजुनही न चुकता पडतात.)
थोडक्यात, हे म्हणजे कै च्या कैच आहे राव!!
पण वरील प्राणी, पक्षी किंवा हळव्या मनाने निर्माणे केलेली काल्पनिक पात्रं काही आमच्या स्वप्नांत अजुन आलेली नाहीत.
गाढ झोप लागते आणि पोटात असेल तर मढ्यागत.
रात्र आणि कधीही होणारी सकाळ ह्या दरम्यानच्या घडामोडींची नोंद होत नाही.
सकाळी गजर झाला तरच जाग येते नाय तर पलंगाला ओझ असह्य झाल कि तोच लाथ मारुन हकलतो.
शून्य वेळा ला मत दिलं आहे.
त्याचं काय आहे की आम्हाला स्वप्न पडत नाहीत. पडली तरी ती जागे झाल्यावर लक्षात रहात नाहीत. शेवटी कुणीतरी लाथ घालुन उठवत. त्यामुळ स्वप्न आठवणार्या माणसाबद्द्ल आश्चर्य वाट्त
'शून्य' ला मत दिले आहे.
कारण ?
पूर्वजाविषयी ~ माझ्या वयाच्या दुसर्या कि तिसर्या वर्षीच वडीलांचा मृत्यु झाला व त्यानंतर काही महिन्यातच अंतर्गत कलहामुळे आईसमवेत धारवाड सोडून इकडे कोल्हापुरात मामांच्याकडे कायमचा स्थायिक झाल्यामुळे वडिलाकडील (अगदी बापाचाही चेहरा आठवत नाही) पूर्वजापैकी कुणीही आठवण्याचा प्रश्नच येत नाही. इकडे आईच्या माहेरकडील मंडळी भरभक्कम कोल्हापुरी असल्याने व मामाकडील मंडळी ८०-९० वयापर्यंत ठणठणीत जगत असल्याने अजूनपर्यन्त 'मेजर मेंबर'चा मृत्यु पाहिलेला नाही...त्यामुळे इथेही आईच्या नात्यातील पूर्वज स्वप्नात येण्याचा पत्ता कटला. हां...एक चांगली मावशी होती, जी ब्रेस्ट कॅन्सरने गेली. पण तिच्याशी जवळकीचा कधी संबंध न आल्याने तीही कधी स्वप्नात आलेली नाही...येण्याची सुतराम शक्यता नाही.
कौलात उल्लेख केलेले नाग, साप, अजगर, कावळा ही मंडळी कधीही स्वप्नात आलेली नाहीत. मात्र एकदा मी कुठल्यातरी समुद्रात पोहत आहे आणि शार्कसारखा दिसणारा मासा जवळून जात आहे, अशा स्वरूपाचे स्वप्न पडल्याचे आठवते. अर्थात त्याच्या अगोदर लागोपाठ दोन वेळा टॉम हॅन्क्सचा 'कास्ट अवे' पाहिला असल्याने कदाचित त्या स्मृती (विशेषतः "विल्सन" ची) मनी ठेवून झोपी गेलो असेन व मग त्याचीच परिणती तसल्या स्वप्नात झाली असेल.
इतकेच
इन्द्रा
दोन-चारदा दिसले असावेत असं अंधूकसं आठवत आहे. अर्थात हे या पूर्वजांच्या मृत्युनंतर लगेच काही महिन्यांमधे दिसले होते.
एकदा तर माझं बीएस्सी पूर्ण होण्याच्या आधीच तिकीट काढलेले एक पूर्वज एमेस्सीच्या लॅबमधे आले आहेत असं स्वप्न दिसलं; तर अर्धवट झोपेतच "हे इथे दिसणं अशक्य आहे!" असा विचार करतच मी जागी झाले.
पूर्वी मला खूप स्वप्नं पडायची आणि उठल्यावर प्रयत्न केला तर ती आठवायचीसुद्धा! एकदा तर बाबांनी हाक मारल्यावर मी "पाच मिनीटं" म्हणत झोपले. चालू स्वप्नं टीव्ही सिरीयलप्रमाणे थोडं रिवाईंड झालं, गोष्ट पूर्ण झाली आणि मग माझी झोप व्यवस्थित संपल्यासारखं वाटलं. आता यातल्या गोष्टी आठवत नाहीत.
उठायची वेळ निश्चित असली तर साधारणतः त्या वेळेच्या पाचेक मिनीटं आधी स्वप्नं पडायची आणि हाक मारल्यावर अचानक जाग यायच्या ऐवजी अगदी सावकाऽऽऽश जाग यायची, मस्त वाटायचं. कधी आजूबाजूचे, प्रत्यक्षात ऐकू येणारे आवाजही (दाराची बेल, स्वयंपाकघरातले भांड्यांचे आवाज, पाण्याचा नळ इ.) स्वप्नात लॉजिकल वाटावेत अशा प्रकारे स्वप्न मॉडीफाय/इंप्रोवाईज व्हायची. त्याची मला तेव्हा त्याची फार गंमत वाटायची. स्वप्न पडत असताना मी पूर्ण झोपलेल्या स्थितीत असायचे असं म्हणणं चूकच ठरेल. मी तेव्हा चिक्कार गोष्टीची पुस्तकं वाचायचे आणि स्वप्नही बहुदा त्या तशाच गोष्टींशी साधर्म्य सांगणारी असायची यापुढे तपशील आठवत नाही. गोष्टीची पुस्तकं वाचणं कमी झाल्यावर स्वप्न पडणं बंद झालं असं ठाम विधान करता येणार नाही, पण दोन्हीमधे साधारणसा संबंध असावा.
अलिकडे बर्याच वर्षांतमात्र कसलीच स्वप्नं पडलेली नाहीत.
मला पितृपक्ष सुरू झाला की साप स्वप्नात येतो. अनेक अनेक अनेकदा. लहानपणापासून सापांची स्वप्न पडतात, आमच्या घरात सगळेजण नास्तिक. त्यामुळेच की काय मी आस्तिक आहे. इतका गदारोळ चालाला आहे तरी आता १ गोष्ट सांगते - माझे सासरे वारले माझ्या लग्नाआधी १४ वर्षांआधी. आमचं लग्न झालं त्या पहील्या रात्रीच (कृपया यावर विनोद नको) ते माझ्या स्वप्नात आले आणि मी आणि नवरा त्यांच्या पाया पडलो.
सापाच्या स्वप्नाबद्दल एका ज्योतीषाने कुलदेवतेचं करायला सांगीतलं होतं. आमच्याकडे कुलदेवता काय साधं शुभं करोती कोणी म्हणत नाही. देव देव करण्याच्या विरुद्ध सगळे. पण त्याचा उलट परीणाम माझ्यावर झाला.
आहे हे असं आहे अजून काही वेगळेच अनुभव आहेत ज्यांना स्पष्टीकरण नाही जे फक्त घरच्यांना माहीत आहेत आणि घरचेही ते अनुभव मानत नाहीत का तर त्यांना काही स्पष्टीकरण देता येत नाही. अरे तुम्हाला जर स्पष्टीकरण देता येत नसेल तर फक्त समजाऊन घ्या कोणाचं काय म्हणणं आहे ते. ऐका .... हे जग खूप विशाल आहे, आपल्याला माहीत नसलेल्या अनंत गोष्टी आहेत , अनेक रील्म्स आहेत इथे, अनेक लोक आहेत .... त्रिवार आहेत.
असो.
या कौलात कोणाचीही चेष्टा करण्याचा हेतू नाही. स्वप्नं हा कित्येक काळापासून मानवाला कोड्यात टाकणारा विषय आहे. त्यावर बरंच संशोधनही झालेलं आहे. पण अशा संशोधनात आपण कोणीही भाग घेतलेला नसतो. म्हणून आपल्या मिपावरच्या मित्रमंडळींना काही अनौपचारिक प्रश्न विचारून व त्यांच्या उत्तरांतून काय दिसून येतं याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. यातून जे निष्कर्ष निघतील ते वैज्ञानिक सत्य वगैरे असण्यापेक्षा आपल्याला विचार करताना दिशा द्यायला उपयोगी पडतील अशी आशा आहे.
आठवतात ती तीन स्वप्ने - एक ते पाच वेळा ला उत्तर दिले आहे.
दोन वेळा दोन जवळचे नातलग आणि एकदा सिंह. सिंह आमच्या घरापाशी आला आहे या विचाराने घाबरल्याचे आठवते.
पण कावळा, अजगर, नाग साप नसावेत, निदान आठवत नाहीत.
माझ्या वडिलांचे निधन सुमारे १३ वर्षांपूर्वी झाले.ते आजपर्यंत माझ्या स्वप्नात ३-४ वेळा आले आहेत. बाकी प्राणीवर्य (साप,अजगर, नाग,कावळा वगैरे मंडळ)) कधीही आली नाहीत-- निदान अशी स्वप्ने माझ्या लक्षात तरी नाहीत.
माझा नाही तरी माझ्या वडिलांचा अनुभव मी त्यांच्याकडूनच ऐकला आहे.तो इथे लिहितो. ते एकदा खूपच आजारी होते आणि डॉक्टरना इलाज सापडत नव्हता.तेव्हा आपली वेळ आली असेच त्यांना वाटायला लागले होते.त्यांना त्यावेळी पडलेले स्वप्न विलक्षण आहे. ते रेल्वे स्टेशनवरील तिकिट खिडकीसमोरच्या रांगेत उभे होते आणि त्यांनी तिकिट घेतले.तेवढ्यात त्याच स्वप्नात त्यांचे २० वर्षांपूर्वी निधन झालेले वडिल (माझे आजोबा) आले आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या हातातले तिकिट खेचून घेतले आणि म्हटले, "तिकिट कसले काढतोस! तुझी वेळ अजून आलेली नाही" आणि ते तिकिट घेऊन माझे आजोबा गाडी पकडून निघून गेले. अर्थातच त्या दिवसापासून त्यांची dramatic रिकव्हरी सुरू झाली आणि ते महिन्याभरात ऑफिसला पण जायला लागले.
अशा अत्यंत अर्थपूर्ण स्वप्नावर विश्वास ठेवायलाच हवा असे मला वाटते. मला वाटते अनेकदा निसर्ग आपल्याला पुढे काय घडणार आहे याची कल्पना देत असतो त्यातलाच हा प्रकार आहे. मी याविषयी मिपावर इथे लिहिले आहे.
क्लिंटन
परत थोडं वयैक्तिक -
माझ्या लग्नाची पत्रिका पहीली ठेवली ती कसबा गणपती समोर. कसबा गणपतीला प्रथम आमंत्रण गेलं.....अर्थात अतिशय भक्तीभावपूर्ण, अगत्याचं, विनंतीवजा जे काही असेल ते सर्व. नंतर काही वर्षांनी आमचं लग्न जवळ जवळ मोडायला आलं होतं काही कारणानी, कलहांनी म्हणा. आईबाबा खूप काळजीत होते.
पण एके रात्री आईच्या स्वप्नात कसबा गणपती आला. आणि त्या दिवसानंतर निदान आमचे विवाहासंबंधी बरेचसे तिढे सुटले. अगदी आयुष्य पूर्ण कलहविरहित गेलं असं नाही म्हणता येणार तसं कोणाचं जातही नसेल. किंवा असलं तरी आमचं गेलं नाही. पण निदान घटस्फोटापर्यंत परत वेळ आली नाही गणपतीच्या कृपेने.
म्हणजे कसबा गणपतीला पत्रिका ठेवल्याने तुमचे लग्न संकटात आले तर. तुमच्या आईच्या स्वप्नात गणपती आल्याने ते वाचले पण देर वेळला आई मदतीला येईलच असे नाही.
मूळात कसबा गणपतीच्या नादी लागायलाच नको होते तुम्ही. गणपती ही बुद्धीची देवता आहे म्हणतात.
मला भारतात असताना स्वप्नात साप दिसायचे. तेव्हा आम्ही एका तालुक्याच्या ठिकाणी राहायचो. कौलारु घर, मागे मोठे आवार, भरपूर झाडे या मुळे साप/ विंचू निघायचे. एकदा विंचू चावलाही होता. साहजिकच लहानपणापासून बसलेली भिती झोपेत डोके वर काढायची. इथे आल्यावर बंद झाले.
माझे आजोबा माझ्या स्वप्नात यायचे. इथे अमेरिकेत नविन असताना असेच ते एकदा स्वप्नात आले. आणि त्यांनी माझ्याकडे पाणी मागितले. तेव्हा आमच्याकडे पंचांग,कालनिर्णय वगैरे काही नव्हते. इंटरनेटही नव्हते. त्यामुळे पितृ पक्ष आहे हेही माहित नव्हते. मी घरी फोन केला तेव्हा आईला स्वप्न सांगितले. तेव्हा कळले ते असे-माझ्या बाबांनी आजोबांच्या स्मरणार्थ देवळात बसणार्या व्यक्तीला जेवण वाढून नेले होते पण सोबत प्यायला पाणी नेले नव्हते. ५ वर्षापूर्वी आम्ही नविन घरात रहायला आलो तेव्हा असेच आजोबा माझ्या स्वप्नात आले. सर्व घर फिरुन पाहिले आणि निघुन गेले. त्या नंतर आज पर्यंत परत कधीच स्वप्नात आले नाहित.
राजेश घासकडवींनी अत्यंत हळुवारपणे वाईनच्या बाटलीचे बूच उघडले आणि ते म्हणाले, "सन्जोप राव, पुढच्या वेळी आपापल्या सिग्रेटी आपण आपण आणायच्या हां..."
केशवसुमाराने एका खोलगट बशीत भरपूर भेळ घेतली होती. तिच्यावर घातलेला कांदा-टमाटो चांगला मिसळून घेत तो म्हणाला, " घासकडवी म्हणजेच सर्किट आहे, असा विचार तुमच्या मनात आला तरी कसा?"
सन्जोप रावांच्या सिग्रेटीच्या धुरात पॅसिव्ह स्मोकिंग करणारे श्रावण मोडक म्हणाले, "हे काही खरं नाही. घासकडवी,हे काही खरं नाही. शेवटची घेतो हां मी. बाहेर गेल्यावर बघू काय काय ते."
मुक्तसुनीतांनी आपला कॅमेरा बंद केला आणि अत्यंत मृदूपणाने ते म्हणाले, "मला वाद वाढवायचे नाहीत, पण अनिवासी भारतियांबाबत असं बोलणं हे वैचारिक असमृद्धीचं द्योतक आहे, असं मी मानतो."
नंदनने मान डोलावली. "सार्त्र आणि कामू वाचा. स्ट्रिंडबर्ग वाचा. खानोलकर तर वाचाच वाचा. म्हणजे वाचाच असं माझं म्हणणं नाही, पण बघा म्हणजे..."
प्रकाश घाटपांडे इतके हातवारे करत होते की त्यांच्या आसपास मानवी हातांचा एक तरंगता समूह जमा झाला आहे असे काहीसे वाटत होते. "श्रद्धा ही एक प्रकारची अंधश्रद्धाच, आणि अंधश्रद्धा ही एक प्रकारची श्रद्धाच..." ते म्हणाले.
प्रदीप यांनी पुस्तकातून मान वर काढली. "दिवाळी अंकासाठी लिहायला-बिहायला वेळ नाही हां....." ते तिरसटून म्हणाले. "आणि लिहून लिहून काय लिहिणार तुम्ही? व्यक्तिचित्रं? प्रवासवर्णनं? की पुस्तकांची नाहीतर सिनेमांची परीक्षणं? छा! मूर्खांचा बाजार आहे नुसता!"
बिपीन कार्यकर्त्यांनी खिशातले पाकीट काढून दाखवले. पाकिटात शरद पवारांचा फोटो होता. "बेरीज, मंडळी, बेरीज. बेरजेचं राजकारण. पवार एवढ्या पुढं कशामुळे गेले असं वाटतं तुम्हाला?"
इंद्रजीत पवाराने तोंड उघडले. पुढची पंचेचाळीस मिनिटं तो तावातावानं बोलत राहिला. मंडळींचे डोळे मिटू लागले होते. ते इंद्राच्या ऐरावती भाषणामुळे की घासकडवींनी आणलेल्या कडव्या वाईनमुळे हे बाकी कुणालाच कळाले नाही.
हे असले स्वप्न मला पडले होते. आता यातले साप कोण, नाग कोण, अजगर किती आणि कावळे किती यावर विचार करतो आहे. ते एकदा कळाले की कौलाला उत्तर देत आहे.
मला चांगलं आठवतंय ते स्वप्न. त्यात जांभळा शर्ट घालून जालिंदरबाबा आले होते. मग त्यांचं रूपांतर एकदम शरदिनीमध्ये झालं आणि त्या म्हणायला लागल्या
"दंत उच्कटा दाढ विच्कटा
किडली सगळी किडली सगळी"
इंद्राच्या भाषणानंतर जी गुंगी आली त्यात निम्मे लोक दात गमावून गेल्याचंही स्मरतंय. काही निश्चितच साप असावे कारण अर्रर्र, विषारी दात गेले अशाही तक्रारी ऐकू आल्या.
"इंद्रजीत पवाराने तोंड उघडले. पुढची पंचेचाळीस मिनिटं तो तावातावानं बोलत राहिला."
~~ आमच्या कोल्हापुरी भाषेत "नाद खुळा". [शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील फेमस 'गणेश बेकरी' तील कुरकुरीत, झटकन तोंडात विरघळणारी खारी खाल्ल्यासारखं वाटलं].
अहो राव जी, तुमचे आभार मानतो, ते अशासाठी की निदान स्वप्नात तरी तुम्ही मला तावातावाने बोलताना पाहिले {तेही सलग ४५ मिनिटे}. नाहीतर माझ्या मित्रामध्ये मला 'फेलो फ्रॉम आईस एज' असे म्हणतात....कायम बर्फासारखा थंड !
इन्द्रा
हाहाहा मार्मिक निरिक्षण! इंद्राचे प्रतिसाद वाचून कधी कधी टूर टूर मधला, "तुझा पगार किती तू बोलतोस किती" हा डायलॉग आठवतो खरा. पण क्वचितच. बाकीच्या वेळेला मात्र त्यांचे प्रतिसाद छानच असतात.
खतरा स्वप्नं रावसाहेब! =)) =)) =))
तरीच एकदा सगळे 'बसलेले' आहेत आणि बिका फुल्या फुल्या (बेरजेच्या हो) मारताहेत असं स्वप्नं पडलं होतं बरं का मला आत्ता आठवलं! ती हीच मैफिल असावी! ;)
रंगराव
'१ ते ५ वेळा' ला मत दिले आहे. मला स्वप्नं फारशी पडत नाहीत आणि पडलेली सकाळी नीट आठवतही नाहीत. पण अंधुक आठवतंय त्यावरून फारवेळा प्राणी दिसले नसावेत. पूर्वज तसे एकदाच. वडीलांच्या मृत्युनंतर एकदा त्यांचे स्वप्न पडले होते पण काय ते काहीच आठवत नाही आणि त्यांच्याशी बोलल्याचे ही स्मरत नाही.
प्राण्यांबद्दल बोलायचं तर, कुत्रा पाळायची आवड असल्याने आणि आधी दोन-तीनदा कुत्रा पाळला असल्याने स्वप्नात कुत्री पाहिली आहेत. टांग्यासह घोडाही पाहिला आहे. लहानपणी एकदा मी आणि माझी आई बाहेरगावी जाऊन आलो होतो नगरला परत तेव्हा घरी जायला टांगा केला होता. आम्हाला टांग्यात बसवून टांगेवाला बाजूच्या टपरीकडे गेला तेव्हा तो घोडा अचानक स्वतःचा स्वतःच पळू लागला होता. तेव्हा मी जाम घाबरलो होतो. त्याचा परिणाम म्हणूनच एक-दोनदा तो प्रसंग स्वप्नात पुन्हा घडला असावा.
साप नाग अजगर वगैरे मी प्रत्यक्षातच इतक्या कमी वेळा पहिले आहेत की स्वप्नात दिसणे शक्य नाही. कावळा कधीही स्वप्नात दिसलेला नाही.
स्वप्नात बर्याचदा हडळी, चेटकीणी वगैरे दिसल्या आहेत, आता त्या पुर्वज वगैरे आहेत का नाही माहित नाही. पण अशी स्वप्ने पडली की दुसर्या दिवशी मिपा उघडल्या उघडल्या हमखास काही ढुशि देणारे मल्खां बी लेख डोक्यावर आदळले आहेत.
अशा स्वप्नांनी आता भिती बसली आहे.
मला दोन स्वप्नं नेहमी पडतात.
एक ट्रेन चुकवल्याचे आणि दुसरे शेवटच्या वर्षाचा पेपर न दिल्याचे.
बाकी स्वनं म्हणजे काय तर शेवटी तुमच्या सबकॉन्शस मांईंडने तुमच्या समोर उभे केलेले ईल्युजन त्यामुळे आमचे स्वप्न त्यात्या दिवसाच्या घडामोडिंवर असतात.
अवांतरः सध्या मला मी हड्डपा मोहंद्जडो मधे अडकलो आहे तिथुन एकदम मी उत्तर महाराष्ट्रातल्या गावात पोहचलो आहे. मग मधेच नामांतराची चळवळीत भाग घेत आहे. असे काहीसे स्वप्न पडालला लागले आहेत.
"अवांतरः सध्या मला मी हड्डपा मोहंद्जडो मधे अडकलो आहे तिथुन एकदम मी उत्तर महाराष्ट्रातल्या गावात पोहचलो आहे. मग मधेच नामांतराची चळवळीत भाग घेत आहे. असे काहीसे स्वप्न पडालला लागले आहेत."
~~ बरे झाले, तुम्हाला स्वप्नात 'खंडोबा' दिसू लागला ते..... गेला आठवड्यात त्याने माझी व चिंतातूर जंतू यांची पाठ सोडली नव्हती. फार वाईट आहे ते चेटूक !! आता बसा तुम्ही त्याच्याबरोबर या गावातून त्या गावात फेर्या मारत.
इन्द्रा
यज्ञ आहे की नाही माहित नाही. पण वे.शा.सं. महामहोपाध्याय श्री. घासुगुर्जींना विचारा. ते काही पूजा सांगतील.
पूजेच्या पथ्यांमध्ये आत्तापर्यंत न लिहिलेली पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व अडगळ नष्ट करणे. मग ती कितीही का समृद्ध असेना. सर्व धार्मिक, वांशिक, जातीय, सांस्कृतिक बंधनं झुगारून दिली की मग निर्मळ व निर्मम पूजा होते... (ही बंधनसंस्था फार माजलीय, साली) अशी पूजा केलीत तर जिथे अडकला असाल तिथून बाहेर याल, किंवा तिथेच सुखी व्हाल... जे काय हवे असेल ते.
समस्त मराठीप्रेमी जनता तुम्हाला सल्ला घेण्यापूर्वी "वे.शा.सं. महामहोपाध्याय श्री. घासुगुर्जीं" या महनीय नावाने संबोधिते आणि तुम्ही ढाले-ढसाळ-भावड्याची भाषा उत्तरात वापरता (ही बंधनसंस्था फार माजलीय, साली) ) याचे सखेद आश्चर्य वाटते प्लस वेदनाही...होतात....[मनाला, अन्यत्र नव्हे !]
इन्द्रा
इंद्रराजजी, मला तुमच्या वाचनाविषयी व्यासंगाविषयी इतके दिवस आदर होता. पण तुम्ही साली सारखा शब्द ढसाळांच्या कॅटेगरीत नेऊन ठेवलात हे पाहून ढसाळांना काय वाटेल? गोलपिठ्यातलं 'माण्साने' वाचलं की साली हा प्रेयसीला हाक मारण्याचा शब्द वाटतो.
बाकी वरच्या "वे.शा.सं. महामहोपाध्याय श्री. घासुगुर्जीं" वगैरेला भुलू नका. बेरजेचं राजकारण आहे नुसतं ते.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? माझं नाव महत्त्वाचं आहे? ;-)
ह्या धाग्यात माझं नाव महत्त्वाचं आहे अन माझ्या नावाने लोक आंघोळ करतात ही 'अननुभुत' जाणिव नेणिवेच्या सीमा उंचावणारी आहे.
मला छान झोप लागते, शिवाय झोप न मोड्णारी स्वप्नही पडतात.
ती सगळी सकाळी लख्ख आठवतात.
..अनेक वेळेस पुढे घडणार्या महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. ( ज्याचे कारण वगरै मला अजून कळले नाही.)
मोठ्ठा (१४-१५ फूट) पिवळा साप एकदाच आइच्या घरात फिरताना दिसला होता. (ती आजोबांची तिथी होती. आजोबांना जाउन १५ वर्षे झाल्यानी सगळ्यांच्याच विस्मरणात गेली होती)
इतरही अनेक सूचक स्वप्न पडतात. सगळी इथे लिहायची तर एक दैनंदिन सदर काढावे लागेल.
मोठ्ठा (१४-१५ फूट) पिवळा साप एकदाच आइच्या घरात फिरताना दिसला होता.
तिला धामण म्हणतात, आणि ती स्त्रीलिंगी असते.
तुमच्या आजोबांची काही इच्छा वगैरे अपूर्ण होती का ?
मला विशेष कोणते प्राणी दिसत नाहीत पण कुत्रे आणि पाली दिसतात स्वप्नात.
कुत्रे मला चावून अक्षरशः माझ्या पायाचे लचके तोडतात त्यातून लोंबणारे माझ्या पायाचे मांस मला दिसते. पण स्वप्नातही असा विचार येतो ठीक आहे घाबरायचे नाही ७०% लोक अपघातापेक्षा भितीने मरतात. मग मी ते मास पट्टीने बांधतो आणि पुढे निघतो. एकतर घराच्या दिशेने किंवा ससूनच्या दिशेने.
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत आणि मी झाडू घेऊन त्याना मारायला निघालो आहे असे दिसते. एकदम ४-५ पाली घरात घुसल्या आहेत असे दिसते पण मारली एकही जात नाही एखादीला झाडूचा फटका बसतो पण तीही पळून जाते. सगळ्या कुठे ना कुठे खबदाडात जाऊन बसतात. एकही मरत नाही. याचाही अर्थ काय ते मला माहीत नाही. आणि अशी स्वप्ने मला बर्याच वेळेला पडतात.
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत आणि मी झाडू घेऊन त्याना मारायला निघालो आहे असे दिसते. एकदम ४-५ पाली घरात घुसल्या आहेत असे दिसते पण मारली एकही जात नाही एखादीला झाडूचा फटका बसतो पण तीही पळून जाते. सगळ्या कुठे ना कुठे खबदाडात जाऊन बसतात. एकही मरत नाही. याचाही अर्थ काय ते मला माहीत नाही. आणि अशी स्वप्ने मला बर्याच वेळेला पडतात.
सगळ्या दगडांवर हात ठेवणे क्रमप्राप्त असल्याने परा ह्यांना आळीपाळीने सगळ्यांच्याच भावनांची खिल्ली उडवणे भाग पडते, त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक दुष्ट हेतू नसतो. भरपूर सुपार्या घेतल्यावर त्या पेरायला नकोत का? :D नायतर कधीतरी त्यांचाच गेम व्हायचा! =))
सगळ्या दगडांवर हात ठेवणे क्रमप्राप्त असल्याने परा ह्यांना आळीपाळीने सगळ्यांच्याच भावनांची खिल्ली उडवणे भाग पडते, त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक दुष्ट हेतू नसतो.
धन्यवाद, यशोताई. हे कॉम्प्लिमेंट असावे असे मी धरून चालतो.
पण तसे नसल्यासही काही हरकत नाही.
खरं तर हा लेख काल रात्री आल्या आल्या मी बघितला आणि वर वर वाचला. अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. पण रात्री उशिर झाला असल्याने, उद्या परत नीट वाचून प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. त्या प्रमाणे आज वेळ मिळताच तसे केले. जे काही व्यक्त केले आहे ते माझे प्रामाणिक मत आहे याबद्दल शंका नसावी.
मूळात मिपावर आलो तेच हिणकस लिखाणाचा शोध घेत . हे मी आधीही जाहिरपणे आणि खाजगीमधेही बोललो आहेच. त्यामुळे हिणकस लेखन, शैली वगैरेमुळे आवडते. एखाद्या माणसाने नेहमीच चांगले वागावे अथवा नेहमीच वाईट वागावे असे नाहीच ना. **
**सौजन्य :- बिका
पर्या LOL!! :D
>>अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. >> खरय, खरय! म्हंजे मग सगळ्यांचे प्रतिसाद तुझ्या प्रतिसादांशी जुळले नसते किंवा अधिक योग्य रीतीने म्हणायचे तर, तुझा प्रतिसाद इतरांची री ओढणारा नसता तर कित्ती पंचाईत झाली असती नै? :D
बरं, दोन म्हणी सांगू का रे? १. खा त्या ख. आणि २. चो म चां हवी ती घेणे! :P
बरं बरं मुलांनो भांडू नका.. ऐकला नाहीतना तर आमच्या स्वप्नामधील १ एक पाल तुमच्या स्वप्नात पाठवीन आणि तुमच्या स्वप्नातला झाडू पण पळवून नेईन, मग पकडा पाली हातानेच. :)
(स्वप्नसंपादक)पालोबा किलर
माझ्या स्वप्नात, (जागेपणी, झोपेत ) केवळ कसाब अन कसाबच येतो,
स्वप्नात तो इथल्या लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्याचा प्रतिकार करत आहे.
एकालाही भारत पूर्णपणे भ्रष्टाचारातून मुक्त झाला, महान झाला, महासत्ता झाला, असली स्वप्न पडत नाही हे मात्र विशेष आहे.
एकालाही भारत पूर्णपणे भ्रष्टाचारातून मुक्त झाला, महान झाला, महासत्ता झाला, असली स्वप्न पडत नाही हे मात्र विशेष आहे.
ज्यांन अशी स्वप्ने पूर्ण करायची असतात त्यांना झोपा काढून चालत नाही :)
मला स्वप्नात 'कुतरे', पाली, मधमाशा, झुरळे असे अनेक प्राणी मध्यंतरी दिसत असत. त्यावर उपाय म्हणून मिपावरील कवयित्री ३_१४ यांचे भुंक न कुतर्या याची ११ आवर्तने, तर यशोदामाईंची 'झुरळे पाली आम्हां सोयरी' ही कहाणी वाचून बराच फरक पडला. मधमाशा दिसू लागल्यानंतर मेवे यांच्या 'करु मी रांधप कुणीकडे' याच्या शेवटच्या कडव्याची २१ आवर्तने अतिशय लाभदायक ठरली.
अवांतर: उपाय न विचारताही आगाऊ दिले आहेत त्यामुळे दुर्लक्ष केले तरी चालेल. मुद्दा हा की प्राणी दिसत होते.
प्रतिक्रिया
हा भंपक कौल नाही.
शून्य वेळा
In reply to हा भंपक कौल नाही. by राजेश घासकडवी
शुन्य वेळा
In reply to शून्य वेळा by पिवळा डांबिस
६-१०
In reply to शुन्य वेळा by वेताळ
हो तू म्हणाली होतीस जैन
In reply to ६-१० by मीनल
३६ ते ४० वेळा याला मत दिले
In reply to हो तू म्हणाली होतीस जैन by शुचि
मलिका शेरावत हिने एका नविन
In reply to ३६ ते ४० वेळा याला मत दिले by विजुभाऊ
नसतो........
In reply to मलिका शेरावत हिने एका नविन by अविनाशकुलकर्णी
अगदी असेच .. एकतर स्वप्न पडत
In reply to शून्य वेळा by पिवळा डांबिस
शेवटच्या पर्यायाला मत दिलं
दोन पायी की चार पायी?
In reply to शेवटच्या पर्यायाला मत दिलं by विसोबा खेचर
आठवत नाही
मला सगळेच दिसतात...अन रोज
मला साप नाग दिसलेले नसावेत, निश्चित आठवत नाही
१०-१५ वेळा
शुन्याला मत दिले आहे. कधी
उत्तर शून्य वेळा..
ट्युशन क्लास
In reply to उत्तर शून्य वेळा.. by मस्त कलंदर
माझ्या स्वप्नात येणारा प्राणी
In reply to ट्युशन क्लास by पैसा
मला १ ० ० सिरीयल बघीतल्या
In reply to उत्तर शून्य वेळा.. by मस्त कलंदर
इन्सेप्शन + दीडकीचा ज्यूस
In reply to उत्तर शून्य वेळा.. by मस्त कलंदर
असेच काहीसे. मला रोज न चुकता
० वेळा
स्वप्न आठवणार्या माणसाबद्द्ल आश्चर्य वाटत
In reply to ० वेळा by नावातकायआहे
पूर्वज इल्ला
दोन-चारदा असेल...
४६-५०
धन्यवाद
In reply to ४६-५० by शुचि
१-५ वेळा
तीन-चार वेळा
परत थोडं वयैक्तिक - माझ्या
म्हणजे कसबा गणपतीला पत्रिका
In reply to परत थोडं वयैक्तिक - माझ्या by शुचि
एक काना
In reply to म्हणजे कसबा गणपतीला पत्रिका by आमोद शिंदे
मला प्राणी दिसत नाहीत
अलंकार
In reply to मला प्राणी दिसत नाहीत by पारुबाई
६-१० वेळा
माझे स्वप्न
खल्लास!!!
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
_/\_
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हा हा वातावरण जरा हलकं झालं
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हे बरं आहे!! संजोप रावांना
In reply to हा हा वातावरण जरा हलकं झालं by शुचि
शॉल्लेट...
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हा हा हा हा. लै भारी.
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हा हा हा हा. लै भारी.
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
'फेलो फ्रॉम आईस एज'
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
कहर!!!!
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हाहाहा!!! मस्तच हो साहेब.
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हाहाहाहा
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
खि खि खि
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
हा हा हा! खल्लास!!
In reply to माझे स्वप्न by सन्जोप राव
'१ ते ५ वेळा' ला मत दिले आहे.
स्वप्नात बर्याचदा हडळी,
मला दोन स्वप्नं नेहमी
खंडोबा
In reply to मला दोन स्वप्नं नेहमी by निखिल देशपांडे
फार वाईट आहे ते चेटूक !! या
In reply to खंडोबा by इन्द्र्राज पवार
यज्ञ आहे की नाही माहित नाही.
In reply to फार वाईट आहे ते चेटूक !! या by निखिल देशपांडे
पूजा
In reply to यज्ञ आहे की नाही माहित नाही. by बिपिन कार्यकर्ते
वेदना
In reply to पूजा by राजेश घासकडवी
तुम्ही का हो इतके सोवळे ?
In reply to वेदना by इन्द्र्राज पवार
तुम्ही का हो इतके सोवळे
In reply to तुम्ही का हो इतके सोवळे ? by शिल्पा ब
तुम्ही ढाले-ढसाळ-भावड्याची
In reply to वेदना by इन्द्र्राज पवार
+१
In reply to तुम्ही ढाले-ढसाळ-भावड्याची by राजेश घासकडवी
अरेरे!!! काय हे? असो. आता मी
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आंघोळ पण करुन घ्या हो,
In reply to अरेरे!!! काय हे? असो. आता मी by बिपिन कार्यकर्ते
कावळ्याची आंघोळ
In reply to आंघोळ पण करुन घ्या हो, by Nile
शुद्धीसाठी आंघोळ करायची असेल
In reply to कावळ्याची आंघोळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो पण बिका आंघोळ करणार हे
In reply to शुद्धीसाठी आंघोळ करायची असेल by Nile
आम्हाला कविता करता येत नाहीत
In reply to हो पण बिका आंघोळ करणार हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणुन काय कवणें? अहो, आम्ही
In reply to आम्हाला कविता करता येत नाहीत by Nile
पढा करो फिर...
In reply to म्हणुन काय कवणें? अहो, आम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही मन निर्मळ.... असो.
In reply to शुद्धीसाठी आंघोळ करायची असेल by Nile
आपल्याला जमत नसेल तर
In reply to नाही मन निर्मळ.... असो. by परिकथेतील राजकुमार
आंघोळ रोजच करतो... तुमच्या
In reply to आंघोळ पण करुन घ्या हो, by Nile
नाम महत्त्वाचं नाही हो, कर्म
In reply to आंघोळ रोजच करतो... तुमच्या by बिपिन कार्यकर्ते
आम्ही नामपंथी असल्याने
In reply to नाम महत्त्वाचं नाही हो, कर्म by Nile
तुम्हाला नक्की काय म्हणायचं
In reply to आम्ही नामपंथी असल्याने by बिपिन कार्यकर्ते
अनेक..
धामण
In reply to अनेक.. by कवितानागेश
मला विशेष कोणते प्राणी दिसत
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत
In reply to मला विशेष कोणते प्राणी दिसत by llपुण्याचे पेशवेll
आमच्या भावणांची खिल्ली
In reply to अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत by परिकथेतील राजकुमार
सगळ्या दगडांवर हात ठेवणे
In reply to आमच्या भावणांची खिल्ली by llपुण्याचे पेशवेll
सगळ्या दगडांवर हात ठेवणे
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by यशोधरा
पर्या LOL!! >>अर्थात तेव्हा
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by परिकथेतील राजकुमार
बरं बरं मुलांनो भांडू नका..
In reply to पर्या LOL!! >>अर्थात तेव्हा by यशोधरा
हाहाहा!!! पर्या लेका...
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by परिकथेतील राजकुमार
माझ्या स्वप्नात, (जागेपणी,
ज्यांना...
In reply to माझ्या स्वप्नात, (जागेपणी, by गांधीवादी
मला स्वप्नात 'कुतरे', पाली,
हहपुवा
In reply to मला स्वप्नात 'कुतरे', पाली, by सूड