Skip to main content

तुम्हाला स्वप्नात नाग, साप, अजगर, कावळा, किंवा तुमचे मृत पूर्वज दिसले आहेत का? आत्तापर्यंत सगळे मिळून किती वेळा? अंदाज सांगा

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 27/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3555
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

मला साप नाग कावळा किंवा मृत पूर्वज स्वप्नात नाही दिसले पण मला नदीवर पाणी पिणारा वाघ बर्‍याचदा दिसतो ( सेव्ह द टायगर कँपेन सुरू व्हायच्या आधीपासून ). कैलास पर्वत (म्हणजे जो पर्वत दिसतो तो कैलास पर्वत आहे असं मला स्वप्नात माहित असत). जीव/आत्मा रहित शरीर , म्हणजे मृत शरीर नाही कारण मी इकडून तिकडून फिरून परत शरीर होते थोड्या वेळानं. पण स्वप्नात स्वतःला शरीर आणि 'मी' अशा दोन्ही रूपात अनुभवते... परिक्षेची स्वप्नं बरीच पडतात, त्यात मी चुकीच वेळाप्त्रक उतरवून घेतल्यानं भूमितीचा अभ्यास केलेला असतो आणि हातात भूगोलाची प्रश्नपत्रिका पडते आणि मी खो खो हसतेय किंवा पेपर दुपारी आहे अशा अंदाजात असलेल्या मला मैत्रिण तरातरा ओढून चल आता निघूया, ९ ला पेपर आहे असं सकाळी ८.३० ला म्हणतेय...अशी बर्‍याचदा .

लोकांना, ना आपल्या पुर्वजांचे स्मरण होते की काडीचीही भूतदया आहे. एक मिपाकर म्हणुन मला लोकांच्या अश्या वागण्याची अतिशय शरम वाटते. (गतजन्मीचा नोहा) सहज

० वेळा हे उत्तर दिले आहे. आणि ते माझ्या बाबतीत खरे आहे. मला स्वप्न खुप कमी पडतात, पडली तरी १ % स्वप्ने पण मला उठल्यावर आठवत नाहीत. काही वर्शांपुर्वी मात्र स्वप्न पडले की मी सकाळी नेहमी प्रमाणे ते विसरत असे, पण स्वप्न पडले होते हे मात्र आठवत असे काय ते कळत नसे.. पण काही महिन्यांनतर तेच स्वप्न कंटीनिव्ह व्हायचे आणि स्वप्नातच मला कळायचे या आधी हे घडलेले आहे. पुन्हा सकाळी ब्लँक सगळे .. फक्त हे आठवत रहायचे की अश्या प्रकारचे स्वप्न पडले होते .. जे क्रमशः होते. असा अनुभव आहे का कोणाचा? .. कारण मला असा अनुभव येणारे कोणीच भेटले नाहीत, बाकी स्वप्नातले सगळॅ कालप्निक असते माझ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

घर आणि काम ह्याशिवाय दुसरीकडे कुठेही हात मारता येत नाही तर कोणाच्या स्वप्नांत काय जाणार डोमला. आमच्या स्वप्नांवर देखील कुणाचीतरी पाळत असते आणि आम्ही आमच्या स्वप्नात देखील कुणाचेतरी कैदी असतो. हापिसात इंटरनेट मिळतो हेच आमचे नशीब.

In reply to by अवलिया

अश्या किती वायल्या आन्घोळ्या करता तुम्ही ? आणि किती पाणी वाया घालविता ? प्रकरण आता गंभीर होत चाललेले आहे.

In reply to by गांधीवादी

**च्या नावाने आंघोळ करणे हा वेगळा प्रकार आहे हे कदाचित ठावं नसावं त्यांना. असो आम्हाला रोज कोण ना कोणतरी बुद्धीवादी भेटत असल्याने आमची रोजची आंघोळही कोणाच्याना कोणाच्या नावाने होत असते. :)

स्व्प्नांत नाग, साप, कावळा वगैरे दिसणे या सर्वांशी त्या फ्राईडने 'पाचकळ' संबंध जोडले आहेत हे खूपच लहानपणी (५ वीत असतानाच; नूमविय असल्यामुळे असेल कदाचित) समजले होते, त्यामुळे हे प्राणी स्वप्नांत आल्याचे निदान आठवत तरी नाही. कदचित हे लिखाण करत असल्यामुळे आज हे लोक स्वप्नांत आल्यास उद्याला कळवीनच. माझी आजी (वडिलांची आई) मला लहानपणी दिवसभर सांभाळत असे, शाळेतून ने-आण पण करत असे, त्यामुळे माझे आणि तिचे आजी-नातू हे नाते जरा अधिकच गहिरे असावे. तिला जाऊनपण ८-१० वर्षे लोटली असतील. माझे वय ४१ वर्षे; पण आत्ता काही महिन्यांपूर्वी मला स्वप्न पडले कि मी खरोखरच लहान झालो आहे (अहाहा काय मजा आली नुसत्या त्या स्वप्नांतील लहान होण्यामुळे) आणि माझी आजी मला हाताला धरून कुठेतरी नेत आहे. पण रस्त्यांत मला काही मुले दिसली, आणि मी त्यांच्याबरोबर खेळायला जाऊ दे म्हणून आजीपुढे हट्ट धरला, पण आजी काही मला खेळायला जाऊ देत नव्हती. म्हणून मग मी लहानपणीसारखेच भोकाड पसरून रडायला लागलो आणि ..... जागा झालो (श्या जळ्ळ मेलं लक्षण). बायको, मुलगी उठून बघतच राहिले ... पण त्यांना हे स्वप्न सांगितल्यावर आणि दुसर्या दिवशी सकाळी घरातील इतरांना कळल्यावर माझ्यासकट सगळेच भरपूर हसलो. आजीचा कर्मफल सिद्धांत सोडून इतर कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नव्हता, त्यामुळे आम्हीपण कोणताही दैवी , पैशाची, अद्भुत, अतर्क्य असा निष्कर्ष काढत बसलो नाही. माझ्याच मनांतील खूप पूर्वीची एखादी सुखद आठवण स्व्प्नाच्या रुपातून पुनर्प्रतीत झाली असे वाटते.

In reply to by sagarparadkar

हे स्वप्न मात्र थोड्या फार दिवसांनी (रात्रींनी?) परत परत असे तीनवेळा दिसले आणि कोणतीही पूर्वसूचना वगैरे न देता बंद झाले: मी एक टिनपाट एस्.टी. बस चालवत आहे (कर्म माझं), बसमधे प्रवासी संख्या तशी मध्यमच. अगदी आड्बाजूच्या गावाजवळ बस आली आहे,वेग फारच मंदावला आहे आणि आता बस थांबवण्यासाठी ब्रेक दाबायला लागलो तर त्या ब्रेक लीव्हरवर असलेला (म्हणजे असायला पाहिजे असणारा) फूट-रेस्टर चा आडवा तुकडाच पडून गेलाय, त्यामुळे ब्रेक लीव्हर जोर करून दाबताच येत नाहिये (पावलात घुसेल म्हणून)... बस थांबली नाही तर बस्-स्टँड ओलांडून कडेच्या नाल्यात जाणार (नशीब फारसा खोल असा नव्हताच, जेमतेम ५-६ फूट). मग मी जिवाच्या आकांतानी पायाचा आंगठा आणि त्याजवळील बोट यांच्या पकडीत ती ब्रेक लीव्हर घट्ट पकडून दाबली, बस कशीबशी थांबली (नशीब त्या प्रवाश्यांचं, दुसरं काय म्हणणार...) आणि मला जाग आली ... पण हे स्वप्न पडण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून, म्हणजे कार चालवायला शिकतानापासूनच, मी ड्रायव्हर सीटवर बसत असल्यास पादत्राणे काढून ठेवूनच गाडी चालवत असतो. त्यामुळे ह्या स्वप्नातून देखील काहीच संकेत वगैरे शोधायच्या भानगडीत पडलो नाही. कदाचित पूर्वी जागेपणी कधीतरी मनात विचार आला असावा, की ब्रेक लीव्हर वरचा फूट्-रेस्टर्चा आडवा तुकडा कोणत्याही कारणामुळे तुटून पडला तर काय करायचं ... हां एक मात्र नक्की, की मी आता कोणतीही गाडी चालवण्यापूर्वी ब्रेक लीव्हर मात्र नीट आहे ना हे तपासून घेतोय :) ह्यापुढे काही तसा अनुभव आल्यास नक्कीच मिपावर कळवीन ... बाकी परीक्षेसंबंधीची सर्व तर्‍हेची स्वप्न ही तर नित्याचीच गोष्ट झालीय.

माझ्यात स्वप्न आठवण्याचा दोष नाही. :)

In reply to by नितिन थत्ते

तरीच म्हंटलं, हा शब्दप्रयोग अजून कसा वापरला गेला नाही. ;)

साप, नाग ६-७ वेळा स्वप्नात आले आहेत. आणि एकदम मोठ्या संख्येने असतात. प्रत्येक ४ फुटावर कमीत कमी एक. पण शांत पडुन असतात, त्रास देत नाहीत. पुर्वजापैकी कोणाचाच मृत्यु फार जवळुन पाहिलेला नसल्याने कोणी येत नाही स्वप्नात. मे महिन्यात सासरे गेले तेव्हापासुन मात्र चार पाच वेळा आले होते स्वप्नात.

काही वर्षांपूर्वी कॅनडात एक वर्षासाठी होतो. त्यावेळेला लग्न व्हायचं होतं. मी ज्या गावात राहायचो ते पण फार छोटं होतं. तेव्हा वरचेवर होमसिक व्हायचो. त्यावेळेला मला स्वप्नात साप, मोठाले अ‍ॅनाकोंडा वगैरे दिसायचे. लागोपाट दोन-तीन वेळेला अशा प्रकारची स्वप्न दिसल्यानंतर गूगलून पाहिलं तर 'स्नेक ड्रीम्स' बरीच कॉमन आहेत हे समजलं. आणि विषेश म्हणजे जवळच्या व्यक्तींची जेव्हा फार आठवण होत असते तेव्हा अशा प्रकारची स्वप्न दिसतात असा जनरल निष्कर्श काढला होता. नंतर भारतात परत आलो अशी स्वप्न पडणं बंद झालं.

माझ्या स्वप्नात अनेकवेळा माझी मृत आई आणि मृत बहिण येते. बाकी आत्तापर्यंत १०-११ वेळा स्वप्नात नाग दिसलेला आहे.