✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

औट घटकेचा पाहुणा...

प
प्राजु यांनी
Tue, 05/13/2008 - 20:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15002 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

ऋ
ऋचा Wed, 05/14/2008 - 09:34 नवीन

खुप छान

खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं. :) खुप छान मांडणी केली आहेस..
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 05/14/2008 - 17:19 नवीन

+१

छान लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
ध
धनंजय गुरुवार, 05/15/2008 - 04:10 नवीन

+१

छान अनुभवचित्रण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सकेत गुरुवार, 05/15/2008 - 14:16 नवीन

छान

सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान............. =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
व
विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 09:52 नवीन

सुंदर..

ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली! मस्त अनुभवकथन! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 05/14/2008 - 09:52 नवीन

भन्नाट

तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-) त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन. असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/14/2008 - 10:06 नवीन

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/14/2008 - 10:23 नवीन

विशेष नाही.

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला. बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/14/2008 - 10:27 नवीन

छान गं प्राजु

बोट कसंय आता??
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 10:53 नवीन

मस्त अनुभव

ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/14/2008 - 11:05 नवीन

ताई अगदी.....

ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे..... तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला..... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... (विठु विठु प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/14/2008 - 11:13 नवीन

अरेच्या एकदम अँटीक्लायमॅक्स झाला की!

पोपटाची ष्टोरी मस्त. (अवांतर - तुझ्या बोटांचा झालेला 'पोपट' आता नीट झाला असेल अशी आशा आहे. ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 14:22 नवीन

हो..

बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/14/2008 - 17:08 नवीन

त्याच वेळी

त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;) छान अनुभव !! असेच लिहीत राहा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
य
यशोधरा Wed, 05/14/2008 - 11:32 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :) बोट कसं आहे आता? >> त्याचे पंख कापले होते :(
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 12:55 नवीन

जखमा..

प्राजु, पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान! तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना? स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 05/14/2008 - 12:40 नवीन

तुमच्या दुख:त सह्भागी

ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला लेख अगदी जिवंत वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 12:54 नवीन

हेच म्हणतो

ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की ! हेच म्हणतो. :)) बाकी लेख मस्तच. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 13:05 नवीन

क्रौर्य...

त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे? तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही. बाकी गोष्ट छान आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 05/14/2008 - 14:03 नवीन

मस्त कथन....

प्राजु, मस्त लिहिले आहेस. प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:) आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.
  • Log in or register to post comments
स
सुमीत Wed, 05/14/2008 - 14:19 नवीन

सुरुवात आणी शेवट

सुरुवात आणि शेवट, मस्तच आणि हो लेख पण :) लेखनशैली छानच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 15:01 नवीन

आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.

माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Wed, 05/14/2008 - 15:02 नवीन

हेच म्हणतो

सुरुवात आणि शेवट, मस्तच आणि हो लेख पण
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/14/2008 - 15:23 नवीन

अनुभव छान....

त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली. पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही. म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे. पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली. (बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/14/2008 - 16:15 नवीन

अरेरे... एव्

अरेरे... एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की! बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :) खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(
पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं
:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/14/2008 - 19:25 नवीन

असेच म्हणतो! छान लिहिलंय!

एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की! शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:)) आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:)) पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:)) -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आंबोळी गुरुवार, 05/15/2008 - 13:15 नवीन

औट घटकेचा यजमान

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... औट घटकेचा यजमान "त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ). मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली". अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर. अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वरदा Wed, 05/14/2008 - 17:20 नवीन

अरे रे

प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... पण लिहिलयस झकास्..ए वन... मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला.. तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त.... आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस... अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/14/2008 - 18:01 नवीन

मस्त.

प्राजु छान लिहले आहेस, पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात. काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/14/2008 - 18:47 नवीन

+१

प्राजुताई, मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:37 नवीन

अनुभव कथन

अनुभव कथन छान लिहिले आहे. आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:14 नवीन

हेच खरं!

सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून हेच खरं! अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
अ
अव्यक्त Wed, 05/14/2008 - 20:10 नवीन

राणीचा बाग...

....राणीचा बाग... ....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 05/14/2008 - 21:54 नवीन

छान अनुभव

अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले. माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. खरच काय हे क्रौर्य ! ईश्वरी
  • Log in or register to post comments
ग
गृहिणि Wed, 05/14/2008 - 23:49 नवीन

छान!

फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 05/15/2008 - 12:26 नवीन

जिवंत लिखाण

प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं. इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं. आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 16:01 नवीन

आणि तो

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल. अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!! पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!! असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी.. नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का? प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस. तुझा लढ्वय्या बाणा कामि आला म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :) आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं.... हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 05/17/2008 - 04:03 नवीन

हे हे

कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))
  • Log in or register to post comments
अ
अभिता Sat, 05/17/2008 - 18:17 नवीन

असाच अनुभव

असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा