Skip to main content

माऊलीच माझ्या शेतात भजन गाई

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 22/09/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई

पीक वार्‍यावर हालेडूले, मागेपुढे होई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ|| शाळू, बाजरी, मका अन गहू विठ्ठलाचे रूप किती मी पाहू सारं शेतं माझं पांडूरंग होई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||१|| विहीरीचे पाणी होई चंद्रभागा सावळा विठू दिसे निळ्या आसमंता कशाला मग मी पंढरीसी जाई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||२|| कशाला गरज लागे टाळचीपळ्यांची नको कशाला गरज अबीरबुक्याची हातातला विळा वाजवीतो टाळी कपाळाला लागे बांधावरची भुई ||३|| माऊलीच माझ्या शेतात भजन गाई मजूर वारकरी निंदणी करती पीकातले पाप कापून काढती पुण्यवान पीक तरारून येई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||४|| पीक वार्‍यावर हालेडूले, मागेपुढे होई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २२/०९/२०१० (अनंत चतुर्दशी)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1343
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुंदर. : ) >> मजूर वारकरी निंदणी करती पीकातले पाप कापून काढती पुण्यवान पीक तरारून येई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||४|| >> खासच

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.