Skip to main content

मिश्र डाळींची इडली.

लेखक रेवती यांनी रविवार, 19/09/2010 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, मिक्सर, इडलीपात्र. कृती: वरील तीनही डाळी प्रत्येकी अर्धा कप घ्याव्यात. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात. चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे. सहा ते आठ तासांनी इडल्या कराव्या. त्यासाठी इडलीपात्राला तेलाचा हात लावून पीठ घालावे. पंधरा मिनिटे वाफवून चटणीबरोबर इडल्यांचा आस्वाद घ्या! या इडल्या फक्त डाळींपासून केलेल्या असल्याने प्रथिनयुक्त आहेत व पचनास जड आहेत. याबरोबर चटणी जास्त चांगली लागते. सांबार नसलेले बरे. रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका. हा पदार्थ माझी मैत्रिण डॉ. गौरी हिने शिकवला आहे. रेवती

वाचने 13734
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

>>ती इतकी उखडली की ३ दिवस दोघे बोलले नाहीत!!!!! गोची झाली ती कोणाची? ;) >>बाकी सूज्ञास सांगणे न लगे! हे हे हे ;) >>कधी ही ये रे धम्या!! उभं आमंत्रण आहे, ठेंकु ठेंकु :) >>आपण साला कोकणस्थ लोकांना बट्टा आहोत ह्या बाबतीत!! हा हा हा! आणि मला लोकांना येतो त्याच्या नेमका उलटा अनुभव येतो कोकणस्थांचा. :) @चिंतामणी: अहो इडलीबद्दलच चाललंय की हो. ;) इडली देशस्थ की कोकणस्थ ह्यावरुन चाललंय. =))

In reply to by चतुरंग

कोब्रा म्हणजे ब्राह्मण क्लास आणि ओबिसी म्हणजे अदर ब्राह्मण क्लास असे का ? अवांतर :आमचा चतुरंग काही वेळा एकटा पडतो हे बरीक खरं.

इडल्या टॉप आहेत रेवती.. जरा उशिराच बघितल्या गेल्या, तोवर इतरांनी खाऊन नुसते क्रम्स ठेवलेत माझ्यासाठी...:) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

असेच म्हणतो.