Skip to main content

सल्ल हवा आहे

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 20/09/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकताच पुण्यात आलो. पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या. सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो . एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे. मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. म्हणाले की फ्लॅट्चे अ‍ॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार. माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो. शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अ‍ॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली. मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्‍यासकट झकास पार्टी दिली. एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्‍याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली. मैत्रीणीच्या नवर्‍याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली. त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना. घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे. मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?

वाचने 47851
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by अनामिक

>>आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून! घोळच घालायचे आणि त्या घ.मा.ला येडाच करायचाय तर तिनं उत्तर द्यायचं, 'जो जिंकेल तो!' =)) घ.मा. डोईला तेल थापून एरंडेलाचा पानच बांधून बसेल. >>चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाच अग्ग्ग्ग्ग्ग...नको यार आठवण करुन देऊ. मग मला डायबिटिसवरचं औषध इस्त्राईलहुन आणणारा लक्षा आठवतो. =))

In reply to by अनामिक

वा वा. आणि तिने दोघेही असे उत्तर दिल्यानंतर समोर विजुभौची बायको (खरीखुरी) समोर येउन ठाकली तर शोल्लिड धमाल. मला नो एण्ट्री आठवला.

In reply to by मृत्युन्जय

अगंआयेऽऽ... अरे गपा रे! नो एंट्री म्हणाल्यावर विजुभाऊ फरदीनखानसारखं डोंगराच्या कड्यावर उभं राहून 'चंपाऽऽऽ...चंपाऽऽऽ' करुन बोंबलताना डोळ्यापुढं दिसले.

In reply to by धमाल मुलगा

हॅ हॅ हॅ. आणि यावरुन मला झूठ से मुझे सख्त नफरत है असे म्हणणारी सेलेना आठवली. विजुबौ वहिनींना झूठ से नफरत नाही आहे ना? नाहीतर तुमची मूळ घरातली एण्ट्री बंद व्हायची. कायमस्वरूपी पुणेकर व्हायला लागेल (आणि मग तिसरीच बाई बायको म्हणुन घरमालकाला दाखवावी लागेल)

एक आयड्या! त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))

त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =)) देशमुखबाबा .......स्वधर्मे निधनण श्रेयः.परधर्मो भयावहः ( हे वाक्य बहुतेक चार लग्ने करण्याच्या सौजन्य भयास्तव म्हंटले गेले असावे ) ते तसे काही केले तर मला गॅलरीतून कचरा खाली फेकावा लागेल , चौथ्या मजल्यावर बोकड पाळावा लागेल आणि तुम्हीच आम्हाला सोसायटीत जागा देणार नाही.

In reply to by विजुभाऊ

=)) =)) =)) छे छे! उलट आम्ही तर घाबरुन जागा देऊ तुम्हाला..नायतर तुम्ही ब्यारिश्टर शिंदेंमार्फत आमच्यावर खटला भराल की.

In reply to by धमाल मुलगा

श्री धमाल यांच्यासारख्यांच्या भावना भडकावणे सोपे आहे हे मला आता पटू लागले आहे. -अमोल पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =)) असु शकते. आमच्यावर सुदैवानं हळद+लोणी+मुसळ असा प्रयोग कधी झालेला नाही त्यामुळे असे नक्की असु शकते.

In reply to by विजुभाऊ

ऐकतोय, जिथून जे काही चांगलं कामाचं भेटतं ते उचलाव माणसानी. बाकी तुम्हाला बोकड पाळायला, कचरा फेकायला, जिन्यात गर्दी करायला कोणी अडवले आहे काय ? मला सांगा, बघतो एकेकाकडे.

In reply to by विजुभाऊ

मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." तुम्ही थत्ते काकांना विचारा हो ते समान नागरी कायद्यातुन काहीतरी पळवाट काढुन देतील. मग तुम्हीही ४-४ लग्ने करु शकाल. It will be convenient u see.

अहो विजुभौ, तुम्ही ते जपानी गादीचे सेमिनार अटेण्ड केले होते ना! त्यातल्याचा काही कॢप्त्या ( आयचा घो कॢ च्या) वापरा ना! टारुस्टैल सही (भाडेकरु) फ्लॅटोबा ओनर!

खरंतर तुमचं "सल्ल हवा आहे" शिर्षक वाचून, १) तुम्ही दबंग पाहिला आणि तुम्हाला सल्लू हवा आहे असं वाटलं. २) मंद हवा, धुंद हवाप्रमाणे ही 'सल्ल' हवा काय आहे हे बघण्यासाठी धागा उघडला.

In reply to by अनामिक

>>इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव! -अनामिक स्वतःची किती जाहिरात करावी ;)

थांबा, थांबा, थांबा!!! हे असं काही असूच शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? (ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.) क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्‍याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही. आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत(बासरी वाजवतात हा आणखी एक गुण!). त्यांची मित्र मंडळीही तशीच सज्जन असणार. त्यामुळे हे असं काही घडणार नाही. कृपया कबूल करा विजुभाऊ!;)

In reply to by रेवती

छ्या ! निदान १०० तरी प्रतिसाद होऊ द्यायचे होते ना ! एक तर नुकताच विजुभाउंना ५०+ प्रतिसादांचा फारमुला मिळाला आहे आणि तुम्ही बिंग फोडता ! छे ! पापक्षालनार्थ दोन दिवसांत फक्कडशी पाकृ टाका ब्वा !

In reply to by रेवती

पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) अगं नाही काकू. खरंच पुण्यात आहेत ते.. शप्पथ, मी भेटलोय त्यांना.. चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं. कोणाला काय काय करावे लागते? ;)

In reply to by रेवती

पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) अडला हरी... दुसरं काय दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? तो "आतले आणि बाहेरचे" सारखा प्रकार असावा. पुण्याच्या बाहेरचे लोक पुण्यात यायच्या आधी पुणेरी लोकांना शिव्या घालणारच. तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? (ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.) आता ती बाई बायको म्हणून यायला तयार आहेत तर तूला काय प्रॉब्लेम्म रेवती तै? आणि सिनेमात नसूनही विजुभाऊनी एन्जॉय नाही केलं कशाबरून?? क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. त्या बाईने नवर्‍याला सांगीतलं नाही हे कुठेही लिहिलेलं नाही.

In reply to by रेवती

आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत पुणेरी नसले तरीही? ऐकावं ते नवलच की! :D ओ विजूभाऊ तुम्ही ते स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप वागा त्या दिवशी मालकासमोर! मामला खल्लास होऊन जाईल!

In reply to by यशोधरा

ते भले वागतील स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप, पण त्या मैत्रीणीने आणि तिच्या नवर्‍याने कसे वागावे बरे? कि त्या मैत्रीणीने पार्ट टाईम जॉब करते म्हणून सांगावे? ;)

In reply to by रेवती

>> पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? आयुष्यात काहीही चांगलं घडायचं असेल तर त्याचा मार्ग पुण्यातून(च) जातो हे ठाऊक नाही काय ? (और इसे कहते है... लगाव बत्ती !)

In reply to by रेवती

दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे. तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली. माझ्या मैत्रीणीला विचारले .तिला गम्मत वाटली आणि ती त्यावेळेस सोबत आली. तिच्या नवर्‍याला सुद्धा गम्मत वाटली पण पुढे असे काही होईल असे काही वाटले नव्हते क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्‍याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही. मैत्रीणीच्या नवर्‍याला या प्रकाराची कल्पना आहे. पार्टी ही घरमालकानी आम्हा दोन्ही कुटुंबियाना भेटवण्यासाठी बोलावली आहे. मी त्यांचा भाडेकरु आणि मैत्रीणीचा नवरा त्यांचा इन्टेरीयर डेकोरटर.

In reply to by विजुभाऊ

फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे. अर्रर्र! फ्लॅट छान आहे असं म्हणावं लागतय तुम्हाला. तुमचे दु:ख समजू शकते.;) ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली. मग आता तुमच्या सौंना खरा गोंधळ सांगा, त्यांच्या डोक्यात जी आयडीया त्यावेळी येइल तीला तोंड द्या. मैत्रीणीच्या नवर्‍याला या प्रकाराची कल्पना कल्पना आहेच मैत्रिणीच्या नवर्‍याला, पण व्यक्ती कोण? हे माहित नाहीये ना (म्हणजे ती व्यक्ती तुम्ही आहात हे माहित नाही हा अर्थ मी तरी घेतला होता)!

आणि तुमच्या कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ कळवा बाकी तुमच्या टेंपररी बायकोचं मिपाकरांवर सोडा! ;) (खुद के साथ बातां : रंग्या, एकाचवेळी चारचार जण विजुभौंच्या टेंपररी बायका घेऊन तिथे हजर झाले तर काय धमाल येईल ना? ;) ) (टेंपररी )चतुभाऊ

In reply to by चतुरंग

तो सध्या आयटीमय व्हायचा मनापासुन प्रयत्न करतो आहे. उगाच त्याला डिस्टर्ब करु नका.

In reply to by चतुरंग

रंगाकाकांशी सहमत आहे. तसेही बरेच दिवसात मैत्री निभावण्याची संधी नाही मिळाली. ;)

In reply to by चतुरंग

ए हॅलो... ते वडिलांसारखे आहेत असं म्हणुन गोड पापी घेणारेत! एकाला दोन काय म्हणतांव? =))

तुमचा घर माल भला माणुस आहे म्हंटला आहे तुम्ही. आणि तुम्ही अग्रीमेंट करत्या वेळेसची तुमची मैत्रीण त्याने पुनह पाहुनही जुली बहिन आहे का असे विचारले. म्हणजे आजचय जमान्यातील खरेच भला माणुस दिसत आहे. कारण कोणी तरी सगळीकडे दवंडी पिटवली असते बायकोने २ जणांना फसवले आहे. आणि ज्या बायकोला अग्रीमेंट ला ही बोलवता आले नव्हते.. तुम्ही रीक्वेस्ट केली होती तशी तीला येता येणार नाही ते पण त्यांनी ऐकले नव्हते .. सोसायटीच्या नावाखाली. आता तसेच सांगा बायकोला येता येणार नाही. का आता ही सोसायटी साठी बायको बघायची आहे त्या भल्या मालकाला ? खरेच येवु शकत नाही म्हनाय्चे .. आणि मैत्रीणीला सारखे बायको बद्दल बोलायला लावय्चे .. तुमचे खुप घरचे संबध आहेत, कश्या सारख्या दिसण्यावरुन बहिनी दिसायचो ते . नाही तरी भाल माणुस म्हंटल्यावर अग्रीमेंट च्या वेळेस असे कीतीवेळ तो तुमच्या बायको कडे बघत असणार म्हणा .. त्याल हे जाणवेल थोडा फरक असतो .. असो बस्स येव्हडे करा .. तरी डाव फिसकटला तर .. येथे बोलण्यापेक्षा अग्रीमेंट च्या वेळेस बायकोची संमती असल्या नआटकाचय वेळेस का नाही घेतली य्६आवरुन स्वताला २ शिव्या द्याच . आणि ते ही नाही जमले .. तर मैत्रीणीला म्हणा बाई तु मागच्या वेळेस धावुन आली .. आता पाय दुखत आहे म्हणुन घरीच रहा .. माजेहे बायको पण नाही येणार .. बायका कश्या आळशी असतात .. ऐकत नाहीत .. हे पुणेरी भल्या माणसाला सांगा .. बघा तो सगळे विसरुन त्याच्या बायकोचे पुराण ऐकवेल . काहीच जमले नाही तर मला बोलवा .. सॉल्व करुन देतो -

In reply to by गणेशा

तुमचा घर माल भला माणुस आहे म्हंटला आहे तुम्ही.
आँ!!! विजुभाऊ, हे हो काय? एकदम दोस्ताना?

In reply to by अनामिक

पुरे! (हे बनवाबनवी मधल्या सुधीर जोशी स्टाईल वाचावे! ;) ) चतुर जोशी

In reply to by अवलिया

फोटो काढताना हातात नावाची पाटी धरलेली आहे काय ? फोटो कुठून व्हता, डावीकडून, उजवीकडून, का समोरून ?

In reply to by गांधीवादी

कृपया वैयक्तीक प्रश्न खवतून किंवा व्यनीतून विचारावे अशी गांधीवादी यांना समज देण्यात येत आहे. (नसलेला संपादक)

त्या मैत्रिणीचा नवरा त्यांचा इंटेरिअर डेकोरेटर आहे ना? म्हणजे त्या घरमालकाच्या सगळ्या शेंड्या मैत्रिणीच्या नवर्‍याच्या हातात आहेत. तुम्हाला हवे तसे वागा. तो काही वाकडे करु शकणार नाही!

यातलं "खर्‍या" वहिनींना किती माहिती आहे?