Skip to main content

सल्ल हवा आहे

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 20/09/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकताच पुण्यात आलो. पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या. सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो . एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे. मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. म्हणाले की फ्लॅट्चे अ‍ॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार. माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो. शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अ‍ॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली. मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्‍यासकट झकास पार्टी दिली. एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्‍याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली. मैत्रीणीच्या नवर्‍याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली. त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना. घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे. मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?

वाचने 47836
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ!!!! भोगा कर्माची फळं!! कुणाला एकाला आजारी पडावे लागणार बहुतेक!

काय विजुभौ खरोखर वेळ जात नाहीये का? का शीरियसली विचारताय? गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे! ;) चतुरंग दत्त

In reply to by चतुरंग

गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे रंग्या जी अहो त्या पिक्चर मध्ये अमोल पालेकर मिशी लावून आणि काढून दोन वेगवेगले रोल प्ले करतो. मैत्रीणीला हे कसे जमेल . आणि समजा तिने तसे काही केले आणि त्यातून अजून काही अचाट नाटक उपटले तर माझेच विडंबन होईल

In reply to by चतुरंग

>>>(आता धागा वाचनमात्र करावा का? Wink ) का? चालु द्या की थोडी मस्ती... ! अडचण असेल तर करा वाचन मात्र. जे धागे करायला हवे तिकडे मात्र दुर्लक्ष.. पण निखळ कुणालाही न दुखावणार्‍या मनोरंजक धाग्यांवर संक्रांत !! वा ! अजबच कारभार आहे !! हाच धागा मिभो वगैरेंचा असता तर असा प्रश्न पडला असता का ? नसताच.. चालु ठेवलाच असता धागा !! आणि समजा धागा भरकटेल असं वाटत असेल तर तसे प्रतिसाद उडवता येतातच ना? मग मनोरंजनाला का कात्री?

In reply to by अवलिया

संपादकांना मी चांगला ओळखुन आहे सदस्यांना संपादक ओळखून नाहित कि काय? इकडे धागा मजेत चाललेला दिसत असताना मंडळाला तिकडे खरडी आणि व्य. नि. मात्र तक्रारींचे असतात त्याचे काय?

In reply to by रेवती

एखादा धागा मजेत किंवा भांडणात किंवा इंचाइंचाने चालु असतांना एखाद्या सदस्याला त्यातील काही प्रतिक्रिया गैर वाटल्या म्हणुन त्याने तशा अर्थाने संपादक मंडळाला खरड व्यनी करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. संपादक मंडळाचे तसे आकलन असल्यास तशा पद्धतीचे धोरण जाहिर केल्यास सदस्य अशा प्रकारे संपादक मंडळास खरड व्यनी करणार नाहीत असे मला वाटते. सबब योग्य तो खुलासा संपादक मंडळाने करावा.

In reply to by अवलिया

कोणाला कश्यात मजा वाटेल ते सांगता येत नाही. नापसंतीचे निरोप येत राहणार. त्यावेळेस सगळ्यांनाच तारतम्याने निर्णय घ्यावे लागतात. संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे. उगीच येताजाता टोमणे मारून काहीही साध्य होणार नाही.

In reply to by रेवती

सहमत आहे. कुणाला कशात मजा वाटेल ते सांगता येत नाही... संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे. संपादकांनी त्रास दिलेला संपादकांनाच कळवायचे मग कसा निर्णय होणार? तुम्ही पण गंमतच करता ब्वा ! असो. टोमणे मारायला सुरवात मी केली नव्हती. पण तरीही माझ्या बाजुने या धाग्यापुरते थांबतो. धन्यवाद. परमेश्वर आपल्याला दिर्घायुष्य देवो !

आपण वयाने लहान दिसतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! स्मरणशक्ती कमी असणार्‍याने थापा मारू नयेत. एकतर स्वतः खुळं असल्याचं आता नाटक करा नाहीतर मालकाला खुळं बनवा. स्वतःच्या पत्नीलाच घेऊन तिकडे जा आणि ठासून सांगा हीच तुमची बायको आणि हिच्याशीच तुम्ही ओळख करून दिली होतीत वगैरे वगैरे. अदिती (गोबेल्स)

In reply to by मृत्युन्जय

घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.
बायकोच ठासुन मारेल...

नवीन घर शोधायला सुरुवात करा! तसेही तुमच्या एका मित्राचा पुण्यात १ बीएचके आहे म्हणे......तिथे मस्तपैकी रहा अन् प्यार्टी करा!

आता मैत्रिणीलाच विचारा की तिला जुळी बहिण आहे का? अन्यथा त्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/अपहरण) करा. हाय काय अन नाय काय? इजुभौ जरा स्वप्नातुन बाहेर या आणि थोडे बॉलीवुड्पट/हिंदी मालिका पाहात जा ;)

मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे नाहिय्ये. अन्यथा द्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/कुंभका मेला) करा. हाय काय अन नाय काय? आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का? नाटक सिनेमात ते ठीक आहे. पण खर्रखुर्रे?

In reply to by विजुभाऊ

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का?
नाही, तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय. सोप्पय........... हम्म.... आत्ताच आमची गॉन केस झाली आहे. तसे काही केले तर पुरती वाट लागायची.

In reply to by विजुभाऊ

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! सिंपल हाय!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दीड महिन्याच्या कालावधीत नविन फ्लॅट भाड्यानं घेउन, पहिल्या बायकोला मारून , दुसरं लग्न करून वर तुमची वास्तु कित्ती लकी आहे असं म्हणायच :) भोवळ येइल मालकाला ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचतिये हो!;) विजुभाईंचा धागा आहे हा! वाचायलाच हवा! उद्या मला कोणी 'पाशवी' म्हटलंच नाही तर वाईट वाटेल ना!;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी ही हेच सुचवणार होतो पण कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्यात. मेलेल्या बायकोचा तेरावा घालण्याएवढे पण दिवस नाहीत त्यांच्याकडे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! आणि मग पहिल्या बायकोची ओळख "ही माझी दुसरी बायको" अशी करून द्यायची? त्यापेक्षा घरमालकाची पापी घेतलेली परवडेल त्यांना, काय विजुभौ? ;)

स्पष्ट सांगा न...वेळ नाहिये म्हणून्....तुम्ही बांधिल थोडेही आहात तुमच्या बायकोला कोणाला पण भेटवायला? तुमच्या त्या मैत्रीणीला आणि तिच्या नवर्‍याला देखिल सांगा कि तुम्हिही थोडी attitude दाखवा...! ... कारण प्रसंग आहे खरा बाका....आणि घ्.मा. पुणेरी दिसतो आहे....प्रसंग अंगावर बेतला ना तर पोलिस कंप्लेण्ण करायलाही मागे पुढे पाहणार नाही! All the best....!

सोमवारी दुपारीच 'कार्यक्रम' सुरु केलात का? बाकी चालू दे.. १०० नक्कि.. झाड बुक करतो लगेच..

घर मालक तसा भला माणूस आहे. पण काही सांगता येत नाही. अ‍ॅटीट्यूड दाखवून उपयोग नाही. प्रेमळ निमन्त्रण आहे

In reply to by विजुभाऊ

....मग त्याची एक गोड पापी घ्या आणि सांगा कि अहो काका.....XYZ......XYZ....XYZ>...! मग त्याचा भलेपणा कसा रुद्रावतार धारण करतो ते पहा! jokes apart.... खरच जर असेल ना समजुतदार मनुष्य तर खरच त्याला एखाद्या योग्य वेळी सत्य सांगुन टाका. हवे तर तुमच्या (खर्‍या) बायकोला बोलावून घ्या.आणि त्यांना त्यांच्या बायको करवी समजावयाचा प्रयत्न करा... हवे तर असेही सांगा ही हा फ्लॅट convinient होता.अजुन एक चान्गले कारण म्हणजे मी वास्तु मानतो...तुमची ही वास्तू अतिशय शुभ आणि प्रसन्न वाटली ...तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on....! हवे तर त्यांना सांगा कि मी फ्लॅट चेंज करायलाही तयार आहे..! कारण चुक झाली तर आहे.. सरवा सारव किति दिवस करणार? you have to confess and face it...! Face it! काय होइल्? थोडे दिवस अवघड्ल्यासारखे होइल...आणि घर बदलावे लागेल ना...ठिक आहे... accept it the way it comes! पण रोजची भिती तरी कायमची जाईल ना!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात.
घराबाहेर काढेल हे ऐकून तो मालक ... अगदी कायदा आणि अ‍ॅग्रीमेंट धाब्यावर बसवून!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

घरमालकाची आधी एक गोड पापी घेतली असेल आणि 'तुम्ही मला वडलांसारखे आहात' हे म्हटल नाही तर जास्त प्रॉब्लेम्स येतील बहुतेक ...:)

In reply to by पुष्करिणी

घरमालकाची आधी एक गोड पापी अवघड आहे. घ मा एक विशाल मिशाळ रीटायर्ड फारेष्ट हापिसर आहेत. त्यांच्या घरी दुनळी बंदूक आहे. मी ठ्यॉ करायला जायचो ते ठो ..ठो... करायचे.

In reply to by विजुभाऊ

ते घरमालक मिशाळ नसते, फॉरेश्ट हापिसर नसते, त्यांच्याकडे दुनळी बंदूक नसती तर..............तुम्ही त्यांची गोड पापी घेतली असती??????????????????

In reply to by अनामिक

>>If you don't learn from your mistakes, there is no sense in making them. =)) =)) =)) =)) काय संदर्भ आलाय ह्या वाक्याला. ;) >>त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल! ह्म्म्म....भौ, भौतेक तुम अबी गयाच कामसे. आता आम्ही तुम्हाला 'ब्लॅकमेल' करणार.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on त्यापेक्षा ही पण मला बायकोसारखीच आहे असे म्हणुन ओरिजिनल बायकोला समोर करणे जास्त सोपे जाइल त्याला.

तुमचा हा प्रश्न लवकरच सुटूंदेत अशा शुभेच्छा! :-) बाकी ही चर्चा/लेख " मदत" शिवाय "नृत्य" या सदरात का वर्गिकृत केली आहे ते कळले नाही. पण चर्चेचा मूळ मुद्दा त्यात नृत्य, मदत वगैरे वाचून अंमळ अजूनच गोंधळ झाला आहे. ;)

In reply to by विकास

कारण त्यांची जी तारांबळ चालु आहे ति दिसते आहे ना! ''त्रे धा ति र पि ट..... त्रे धा ति र पि ट" या तालावर! ;) आणि घरमालकांना सत्य कळल्यावर ते तांडव करतील ते वेगळेच.. एकुण काय.. चम्मतग आहे सगळी!

कोणालातरी आजारी 'पाडो'च !!!!!!!!! आणखी एक मोलाचा सल्ला जाईचे ऐकू नका नाहीतर तुमचे दुसरे लग्न नक्की.

आधी नसती झक मारावीच कशाला भाऊ? च्यायला, वहिनींना फोन करुन बोलावुन घेता येत नव्हतं काय? आता हे लफडं तिकडं कळालं तर येतात सगळे संस्थानिक मेव्हणे तलवारी घेऊन...... ओ भौ, आपुन तुमाला वळकत नाय हां...आधीच सांगुन ठिवतोय. ;)

... हा आहे..... तो आहे......झालच तर आपले धमाल राव...! असे निधड्या छाती चे मित्र अस्ताना तुम्हास भिती कशास वाटते? .. हो की नाही ओ धमालराव..? बघा कस्से धाऊन येतिल मदतीला!

In reply to by भडकमकर मास्तर

अगोदरच्या १०-१५ धाग्यांची पण लिंक द्या, इंच इंचाची, आरक्षणाची लिंक पण द्या, मालक काय इथून हलणारच नाय मग.

आबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ. माताय काय पण सल्ला दिलाय. हे म्हणजे पेटलेलं शेपूट कसे विझवायचे याचा सल्ला "रॉकेल टाकून "असा देण्यासारखे आहे

'अशी ही बनवाबनवी'? सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः १. कार्यक्रम किती मोठा आहे? बरेच लोक येणार असतील तर बरं. २. कार्यक्रम जिथे आहे त्या जागेला दोन प्रवेशद्वारं आहेत का? असलेली बरी. ३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का? ४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का? ५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः १. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का? २. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?) याही प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नकारार्थी असेल तर क्षमस्व.

In reply to by नगरीनिरंजन

सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः ३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का? हे मी तिला डायरेक्ट विचारून शकत नाही. उगाच दोन दणके खावे लागतील ( इमॅजीन करतोय की मी तिला विचारतोय " तू माझ्यासाठी संध्याकाळी कितीवेळा कपडे बदलू शकतेस?" ४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का? हो आहे ५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का? माहीत नाही. सल्ला नको पण तुमचे प्रश्न आवरा . ( "जुदाई" मधला प्रचिन्हाची केसांची बट असलेला परेष रावळ आठवा) आमचे उत्तर "आब्बा जब्बा डब्बा " वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः १. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का? हो आहेत. डॉ दाढे ऑर्थोडेन्टीस्ट आहेत. त्यांचा उपयोग घरमालकाने किंवा माझ्या मैत्रीणीने माझे दात पाडल्यावर होऊ शकेल. २. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?) खोटं अगोदरच बोलून झालय. हातचलाखी कशी करायची ते शिकवा.

त्यात काय सल्ला मागायचा? तुम्ही, तुमची मैत्रीण, आणि तिचा नवरा तिघेही जा घरमालकाकडे आणि सांगा आमच्या दोघांचीही हिच्च बायको आहे म्हणून. त्याने काही वाद घातलाच तर द्या ना द्रौपदीचे उदाहरण! आपलीच संस्कृती आहे म्हणून सांगा, शिवाय तुमची मैत्रीण आयटीतील एक आधुनीक, मुक्त, पाशवी, पुणेरी स्त्री आहे असेही सांगा. त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.

In reply to by अनामिक

त्यापेक्षा त्या मैत्रिणाचा नवरा आणि विजुभाऊ दोघांनी त्या घरमालकासमोरच 'ही माझी बायको आहे' असं भांडण केलं तर? >>त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका. =)) =)) =)) =)) =)) का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))

In reply to by धमाल मुलगा

आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून! >>का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =)) अगदी अगदी... आणि ही चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!