Skip to main content

(गं बाई करू मी रांधप कुणीकडे)

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 21/09/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गुरुमाऊली यशोदामैय्याच्या झुरळे, पाली आम्हां सोयरी.. वरून प्रेरणा घेऊन व पी. सावळाराम यांची माफी मागून. किरकिर उंदिर करे सारखा ओट्यावरही झुरळ चढे पालीच पाली चहूकडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? घरभर फिरले मारण्या पाली गोणी, पिंपं, ओट्याखाली चमकून बघता वरती दिसली दचकून माझा ऊर उडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? काप काढली असती तळुनि (पण) कढई भरली मधमाशांनी खुणाविते मज फळीवरूनि घसरत झुरळच दुग्धि पडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? मूळ काव्य - रिमझिम पाऊस पडे सारखा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5278
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

आयला, मेव्या तू पण शिकलास माझ्या संगतीत राहून विडंबनाच्या जिलब्या पाडायला!! गुरूदक्षिणा (सौजन्य द्रोणाचार्य/एकलव्य) कधी देणार?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'सेरेना विल्यम्स-लिझेल ह्युबर' यांचं सध्याचं 'टॉप रँकिंग' धोक्यात दिसतंय! ;)

In reply to by मेघवेडा

नाय ना! चेंडू बडवायची सोय नाही आहे ना ... :-( मग फुलं (आणि कीबोर्ड) बडवण्यावरच समाधान मानून घेते मी! असो. माझ्या सर्कारी वेदनांवर मी वेगळं विडंबन पाडेन! सोप्पं तर असतं प्राचीला गच्ची जोडणं, बरोबर की नाही?

In reply to by पैसा

त्याला बंगाली बनवून त्याचं नावच 'मेघवेडा पाल' केलं तर?

वा रे मस्त विडंबन!;) अनेक वर्षात स्वयंपाकघर स्वच्छ केले नाही काय अशी शंका आली.;) या निमित्ताने तुझ्यातील तरल भावनांचे दर्शन झाले.

मेव्या मस्तच रे !! पहिली दोन कडवी मस्त मीटरमध्ये बसतायत. खुणाविते मज फळीवरूनि गडबड थय गई.

आज काल नवविडंबकांचा विडंबनाला चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणुन हा प्रतिसाद. बाकी मेव्या हे विडंबन जमलयं महराजा...

ब्येक्कार! पहिलं कडवं तर एकदम छप्परफोड! अवांतर - अचानक 'कवनात राहिले झुरळ, मध्माशा पाली' असं का झालंय बॉ मिपावर? ;)

कोण म्हणते मराठी भाषा धोक्यात आहे? अगदी सायबाच्या देशात बागडलेले दोन मराठी बहाद्दर, कुठून कुठून भुले बिसरे गीत काढून विडंबन करत आहेत.