बाळाला जर पंख दिले, संस्कार दिले मी शुभंकरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||१||
सहचार-अपेक्षापूर्ती करी, उतरतसे कसोटी अनुदिनी
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||२||
मात्यापित्यांस शांती दिली, कण फेडीले ऋण अपुलेपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||३||
मित्रास लावला जीव जरी,उत्तेजनही दिधले परोपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||४||
आदर्श जिणी रमता अनुदिनी,एके दिनी जायचे मिटूनी,
सरणावरती शांत मनानी, जाईन तुला मी सामोरी ||५||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2652
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली, आय मीन चांगली गेयता
तुम्हाला खरोखर असे वाटते का
प्रश्न कळला नाही. कविताच आहे
In reply to तुम्हाला खरोखर असे वाटते का by Pain
तुमच्या जबाबदार्या किंवा
In reply to प्रश्न कळला नाही. कविताच आहे by शुचि
मॅपींग द जर्नी आफ्टर डेथ" हे
In reply to तुमच्या जबाबदार्या किंवा by Pain
नाही ते ठीक आहे
रसभंग नाही झाला. वेगळा
In reply to नाही ते ठीक आहे by सहज
जन पळभर..
In reply to नाही ते ठीक आहे by सहज
शुची कवित अत्त्युत्तम! थोडा
मृत्युचे स्वागत... !
मॄत्यु नंतर नक्की काय होत
मॄत्यु
आवडली!
एक दिवस प्रत्येकाला जायचे
आवडली!!