मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहीबुत्ती

मितान · · पाककृती
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते ! अशी ही माझी आवडती दहीबुत्ती- सामग्री : - भात दही फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप. कृती: १ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा. थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे. फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी. थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी. हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :) Dahibhat फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते. काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)

वाचने 9153 वाचनखूण प्रतिक्रिया 29

धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 18:45
च्यायल्ला! दहीबुत्तीसाठी आपण खूनपण करायला तयार है. :) मी तर बुवा त्या फोडणीत थोडे शेंगदाणेही घालतो. मस्त लागतात. अवांतरः दहीबुत्तीसोबत घोंगुरा पिक्कल खाऊन पाहणे. नाय तिच्यायला समाधी लागली तर सांगा. :)

गणपा Mon, 09/20/2010 - 18:54
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते
हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो. तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये ;) हां असा दहीभात नुसता आणुन द्या पातेलभर हाणु आपण. :D बाकी फोटो आणि पाकृ १०० पैकी १००. :)

In reply to by गणपा

मितान Mon, 09/20/2010 - 19:28
>>>हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो. तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये संदर्भासह स्पष्टीकरण द्या ! (तिखटखाऊ) मितान

सूड Mon, 09/20/2010 - 19:15
अरे वा !! दहीबुत्ती हजर !! असो. रेशिपी, फोटो दोन्ही छान आहे मितानतै.

चतुरंग Mon, 09/20/2010 - 22:57
बरं झालं जेवण झाल्यावरच धागा उघडायचा निर्णय अंबळ बरोबर ठरला! ;) (दहीबुत्तीप्रेमी)रंगान्ना मिरजकर

रश्मि दाते Mon, 09/20/2010 - 23:28
मलाहि खुप आवडतो दहिभात्,पण शेव भाजी सोबत साघा भातच हवा रश्याबरोबर ओरपायला,हवेतर नंतर ग्लास ग्लास ताक प्यावे तिख्ट झेपत नसेल तर

सहज Tue, 09/21/2010 - 20:25
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध असे सुंदर धागे वाचनखुण म्हणून साठवता येत नाही अजुन म्हणून

In reply to by सहज

गणपा Tue, 09/21/2010 - 20:53
असा धाग्यांवर निषेध करण मिपाच्या धोरणात बसत का ;) मान्य आहे तुम्ही ही मागणी तांत्रिक समीतीकडे आधीच धा वेळा नोंदवली असेल पण म्हणुन इतका त्रागा :)

कुक Wed, 09/22/2010 - 15:52
काल केलेल , दुपारी गणपती पाहुन आल्यावर येताना सोबत दही आणले , व करुन खाले मस्त झालेला सोबत चटणी होती