रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते !
अशी ही माझी आवडती दहीबुत्ती-
सामग्री : -
भात
दही
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप.
कृती:
१ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे.
फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी.
थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी.
हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :)
फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते.
काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)
वाचने
9170
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा व्वा... छानच दिसतेय
बीशी बोळी होळी अन्ना
वा... हे खाउन नक्कीच गार
च्यायल्ला! दहीबुत्तीसाठी आपण
एकदम बरोबर! शेंगदाणे घालून
In reply to च्यायल्ला! दहीबुत्तीसाठी आपण by धमाल मुलगा
मस्त फोटू! माझा आवडता
+१
In reply to मस्त फोटू! माझा आवडता by रेवती
मस्त !
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत
उत्तरार्धासारखेच म्हणतो.
In reply to रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत by गणपा
>>>हा त्या रावण पिठल्याचा,
In reply to रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत by गणपा
हे तुम्हाला उद्देशुन नव्हत हो
In reply to >>>हा त्या रावण पिठल्याचा, by मितान
अरे वा !!
मस्त!
आम्ही यात मेतकूट घालतो व
फर्मास पाककृती
मस्त!!
चला!
सुरेख
माला हि खुप आवड्तो
मस्त...मी यात फोडणीत हिरवी
गणपा आनि धम्याशी सह्मत
व्वा! नुसता फोटो पाहुनच
मस्त !
मस्त ! गार पाक्रु पण रश्मी
व्वा! दहिभात्/दहिबुत्ती काही
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
असा धाग्यांवर निषेध करण
In reply to मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध by सहज
मस्त