(तथास्तु !!)
अनुप्रियाची तथास्तु !! वाचुन विडंबन करावे असे वाटले नाही (खर तर तसा कवितेचा विषय विडंबावा असा बिल्कुल नाही आहे )
तरिपण रिकामा वेळ असल्याने थोडासा हा नराधमपणा....
थांब संपादका !! तुला शांती नाही
हा धागा कदाचित तु साफ करशिलही
पण या विषयाशिवाय काही बाकी नाही ॥
कोवळ्या कवितांना, उसळत्या विचारांना
संपादनारा तू......
लेखांचा, लेखकाचा
चोथामोथा करणारा तू......
२०० प्रतिसाद घ्यावे अशी प्रतिभा ज्याची
त्याला खरडफळा बनवणारा तू....
डु.आयडीचा वापर करुन
डोळ्यात धूळ फेकणारा असा तू.........
पायाचा फोटो आदराने मागवुन
पायात पाय घालुन, पाडणारा तू
मायाजाल हे सोडणार नाही तुला
ध्यानी धर संपादका........
तू हात लावलायस
एका धगधगत्या चितेला
द्वेशाने रंगलेल्या दुधारी तलवारीला
चर्चाकर्त्यांच्या लाडक्या विषयाला
आता भोग कर्माची फळे तू
अधिकारांपेक्षा जबाबदार्याच भयंकर
तूच ते भोग आता.......तूच ते भोग आता
अवांतरः सर्व संपादकहो ह.घ्या.
लक्ष ठेवण्यासारख्या बर्याच चर्चा येथे होत असल्याने तुम्हाला वेळ नसेलच :;)
हॅहॅहॅ....
ज ब रा हो चेतनराव.... गेले
हा हा हा
नुसतेच जालकंटक नाही..
अरेरे बाण चुकीच्या ठिकाणि
वाट लग गयी
तीव्र हलकट्पणा
खपला तुमचा आय डी आता...
>> आता भोग कर्माची फळे
धन्यवाद