अतिषय सुंदर लेखमालेचा शेवट व्हावा असं वाटतच नव्हतं.
फोटो तर शब्दापलिकडचे आहेत.
दरीतली छोटीशी वस्ती खूप आवडली.
या ठिकाणंना भेट द्यायलाच हवी.
इतकं छान, स्वच्छ आपल्याकडे लोकांना का राहता येत नसावं असं नेहमी वाटून जातं.
दुसर्या भागात पुर्ण लेखमाला आवडली असे सांगितले होतेच.
तरीही ही लेखमाला मनाला खुप भावली असे पुन्हा एकदा सांगतो .
आपली लेखणशैली खुपच अप्रतिम आहे हे निर्विवाद.
टाका आता ती ग्रीसची लेखमाला मिपावर.
लिखान वाचुनच मन खुप प्रसन्न झाले आहे.
प्रत्येक्ष अनुभवातुन तर मन कोठे असेन हे तुम्ही जबरी लिहिले आहेच.
प्रवास वर्णन हे माझे सगळ्यात आवडते साहित्य. पण आता पर्यंत वाचलेल्या प्रवास वर्णना मध्ये हे सगळ्यात अनोखे .. वेगळे आणि तितकेच चित्र बद्ध होते.
आपण नाही गेलो पण कोणीतरी आपले तेथे जावुन आले आहे म्हणुन आम्हलाच हेवा वाटतो आहे उगाच.
कंपणीत चोरुन मिसळ पाव ओपन करताना ही .. आजु बाजुच्यांना सर्वांना नॉर्वे चे फोटो दाखवुन झाले आहेत.
अआणि कोण गेले होते नॉर्वे ला असे विचारल्यावर .. मितान चे पहिलेच लेखन वाचत असताना ही माझी फ्रेंड गेली होती असी उगाच खोटे सांगुन ही मन भरुन येत होते.
असो . कधी जायची वेळ आलीच तेथे तर तुमच्या या लिखानाची प्रिन्त घेवून जाणार आहे.
परंतु येक .. तुमच्या वाटीचा जो मांसाहार राहिला आहे त्याची परतफेड करुन येईन मी नक्की ..
त्या नॉर्वेच्या अप्रतिम निसर्गाला, तू काढलेल्या ह्या सगळ्या फोटोंना आणि तुझ्या रंगवुन सांगण्याच्या शैलीला!
यु रॉक माया...यु रॉक!
नशीबवान आहेस, ह्या अशा स्वर्गाची सफर करुन आलीस!
कित्येक दिवसांनी इतकी सुंदर लेखमाला वाचली. मितानताई, तुमच्या स्वर्गातल्या फेरफटक्याचा हेवा करु का तुमच्या हटके लिखाणाचा करु का त्या केवळ अनिमिष नेत्रांनी बघण्यासारख्या दृश्यांच्या फोटूंचा करु समजत नाहीये!
हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला..
क्या बात है!! लेखनातलं लालित्य इतक्या सहजपणे यावं तर असं....
(मंत्रमुग्ध)चतुरंग
मितान,
अतिशय तरल भाषा, तितकीच अप्रतिम छायाचित्रे आणि एकूणच तुझी शैली... स्वर्गिय अशीच ही लेखमाला होती.
आम्ही सुद्धा हरवून गेलो होतो नॉर्वे मध्ये..
मला या भागातलं आवडलेलं वाक्य.." आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत नव्हते." या एका वाक्यातच अख्खा नॉर्वे सामावलेला आहे असं वाटलं.
तुझं खास अभिनंदन, इतकी सुंदर लेखमाला लिहिल्याबद्दल.
आणि आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. :)
काल लिहीता हो तुम्ही !! मानलं तुम्हाला. चौथ्या भागात " असं वाटलं या समुद्राला उचलून घेऊन त्याच्या जावळांवर हात फिरवावा !" हे वाचून तिथल्या तिथे दाद द्याविशी वाटली पण म्हटलं एकादमात फुटून बोलूया...
कमाल केलीयत.. सुंदर लिखाण, नुस्त्या शब्दांच्या जोरावर त्या दर्याखोर्यांत घेवुन गेल्यात. अजुन्ही तिथेच आहे.. त्याला जोड, अतिशय नेमक्या, सुंदर आणि बोलक्या फोटोजची.. (तो ढगांचे reflection पाण्यात दाखवणारा फोटो तर चोरून नेवून फ्रेम करावासा वाटतो).
मनापासून सांगतो, फार्फार दिवसांनी इतक्या तरल शब्दांत, इतक्या सुरेखपणे केलेलं प्रवासानुभव वर्णन वाचलंय.. तोडलं तुम्ही अक्षरशः ! आता फक्त गंडा बांधून घ्यायला कधी येवू, ते सांगा..
हे एक अतीशय उत्कृष्ट प्रवास वर्णन आहे... :-) जोडीनी फोटो तर,अंगावर रोमांच उभे करत होते.
लेखमालेचा शेवट वाचताना ,का कोण जाणे ?,मन अतीशय स्तब्ध झालं...!
मितान ताई तुंम्हाला सलाम...
हे संपूर्ण नोर्वे प्रकरण वाचले... आणि परत दिव्यासारखी हसणारी आजी मनात घर करुन गेली. बाकी प्रवासवर्णन, फोटो वगैरे किती अप्रतीम आहे हे सांगायचा प्रयत्नही करणार नाहि.
अर्धवटराव
हि माझी आता पर्यंत वाचलेली सर्वात आवडती सफर आहे... आज पुन्हा धागा वर आल्याने फोटो पाहिले पुन्हा मस्त..
येथे मात्र पायी भटकंती केली पाहिजे असे मात्र वाटत आहे... एकदा नक्कीच नॉर्वे ला जाता आले पाहिजे असे वाटत आहे
खुप छान वर्णन केले आहे. नोर्वे सुन्दर आहे अस ऐकुन आहे. प्रवास वर्णन छान केले आहे. ईतक्या जवळ जाउन नोर्दन लाईटस नाही पाहिले क? त्या साठी सुध्धा नोर्वे प्रसिध्ध आहे.
प्रतिक्रिया
अप्रतिम!!! नॉर्वेवर कविता अहे
हेवा
सु-रे-ख !
मस्त
वर्णन
अतिषय सुंदर लेखमालेचा शेवट
ग्रेट!!!!!!!!
अमेझिंग
सुंदर लेखन आणि मस्त
धन्यवाद! एक सुंदर अनुभव
सुंदर!!
सुरेख
सुरेख!
लिखान वाचुनच मन खुप प्रसन्न
स्टँडिंग ओव्हेशन!
केवळ क आणि ड आणि क! आणखी काही
सहीच, संपूर्ण लेखमालाच सुंदर
झ का स!!!!
अप्रतिम लेखमाला!!
मितान, अतिशय तरल भाषा, तितकीच
कुठं होता?
सलाम....
अगदी चित्रासारखे दिसते आहे
तायडे.. अतीसुंदर.. महान.. लै
अ प्र ति म
लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील गाँडॉर
नका रे नका हा धागा वरती आणु.
वा!!
ही लेखमाला वाचायची राहिली
हे एक अतीशय उत्कृष्ट प्रवास
धागा वर आणून कौतुक
आज परत...
क्लास...
अत्यंत सुंदर देश, त्याचे
सर्व भाग वाचून काढले. अप्रतिम
हि माझी आता पर्यंत वाचलेली
अतिशय छान. अप्रतिम
अतिशय छान. अप्रतिम
माहितीपुर्ण लेख
अप्रतिंम सुंदर लेखमालिका !