Skip to main content

बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 24/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या. परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता. माझी तोफ (Canon) धडाडू लागली........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7151
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

झक्कास! सुंदरसे फोटो निवडून मोठ्ठे प्रिंट मारून आणा आणि फ्रेम लावून टाका घरात.

लईच भारी... साला दहा वर्षं झाली विजापूरला जाऊन. बाकी, आमच्या गावच्या रस्त्याचं (सोलापूर) दुरुन दर्शन घडवल्याबद्दल धन्स रे.. :)

In reply to by किल्लेदार

फ्लिकरवरच्या फोटोवर राईट क्लिक - > प्रॉपर्टीज -> यूआरेल कॉपी -> मिपावरच्या चित्राच्या खिडकीत पेस्ट -> ओके -> पूर्वदृश्य (साईज अ‍ॅडजस्ट करायचा असल्यास मिपावरच्या चित्रखिडकीत हवी ती मापे भरुन बघू शकता. पूर्वदृश्यात कसे दिसते आहे हे समजतेच त्यानुसार कमीजास्त करता येईल.) सगळे मनासारखे झाले की मग प्रकाशित करा (मांत्रिक)चतुरंग

फोटो आवडले. सोलापूरला अनेकदा गेलोय. तिथून विजापूर किती दूर आहे ? आदिलशाहीच्या किती इमारती शिल्लक आहेत ?