रसिया मुठिया
सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी -
सामग्री -
शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम )
बेसन - अर्धा ते पाऊण कप
ताक - ५ ते ६ कप
आले लसूण पेस्ट - २ चमचे
लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा)
हळद - अर्धा चमचा
हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी
अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप
कृती -
एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट व कढिपत्ता घाला. थोडी हळद आणि लाल तिखट घाला.वरून चमचाभर बेसन ताकात मिसळून ते फोडणीत घाला. गॅस बंद करून टाका.
आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन, उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या. त्याचे मुटके वळता यावे एवढे मऊ मळून घ्या. प्रत्येक वेळी हात पाण्यात बुडवून मुटके वळून घ्या.
कढई ठेवलेला गॅस चालू करा. फोडणी घातलेले मिश्रण चांगले उकळू लागले की त्यात हळू हळू एकेक मुटका सोडा. मुटके सोडल्यावर न हलवता कढईवर झाकण ठेवा.
जेवणाची तयारी करा. ५ मिनिटात मुटके शिजून वर आलेले दिसतिल. त्यात अर्धा चमचा साखर आणि चमचाभर तूप घाला.असेल तर कोथिंबिर पेरा. एका वाडग्यात तयार रसिया मुठिया घ्या. वर अजून एक चमचाभर तूप घ्या आणि खा.
ज्यांना कढीभात आवडतो त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रीया भलानी मावशींना कळवतेच :)
याद्या
7855
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
आईशप्पथ काय टायमिंग हाय! जेवण
मस्त दिसतेय, करून पहाणारच
तूप-साखरसुद्धा मुळात जास्त
In reply to मस्त दिसतेय, करून पहाणारच by पुष्करिणी
नीट वाच की बयो, भातात
In reply to मस्त दिसतेय, करून पहाणारच by पुष्करिणी
बिरयाणी सोडून भात तसा आवडत
छान दिसतोय पदार्थ अन सोपा.
चूक झाली ! :(
दुरुस्ती केली आहे!
In reply to चूक झाली ! :( by मितान
धन्यवाद ! नाहीतर सगळ्यांचा
In reply to दुरुस्ती केली आहे! by चतुरंग
झाले! आत्ताच हादडले! लै भारी
छानच
एकदम स्लऽऽर्प स्लऽऽर्प
क्या बात है!!
फोटू आणि पाकृ वेगळीच
अगदी असच म्हणतो.
In reply to फोटू आणि पाकृ वेगळीच by रेवती
वाह...
नक्की करून बघीन.. छान
मस्त !
छान व सोपी रेसिपी आहे आजच
आधी फक्त नाव ऐकलं होतं
छान! सोपा प्रकार आहे.
मस्त!
आई शपथ्थ!!! आता हा प्रयोग
सहीच!
छान
बर्याच जणांनी मुठिया करणार
सही दिसतंय, नक्की करून
वेगळी