कवितेला नाव देण्याची (ठेवण्याची) आमच्यात प्रथा नाही, पण इथे आपली चार अक्षरं प्रकाशित करायची म्हणजे तिचे आधी नामकरण करणे आवश्यक असल्याने ही नवी कला आत्मसात करायच्या प्रयत्नात आहे. जिथे काही नाव सुचणार नाही तिथे
कवितेची पहिली ओळच शीर्षकात घालावी म्हणते. हा मधला मार्ग चालून जावा अशी आशा आहे !
तुझ्या-माझ्या 'आपल्याचं',
हे 'माझं-तुझं' कधी पासुन ?
शरीरात वाहत्या रक्ताचं...
हे असं गोठणं कधी पासुन ?
तुझी-माझी एकरुपता
शब्दांत न मावणारी.....
मग भावनांना असं तराजूत
हे तोलणं रे कधी पासुन ?
स्वप्नांमध्ये मुक्तपणे
आपल्या पाखरांचं फिरणं --
अन अचानक व्यवहारी
हे असं बोलणं कधी पासुन ?
तुझं-माझं दोघांचं,
अद्वैताचं नातं ना ?
मग हात सोडून अनोळखी,
हे चालणं रे कधी पासुन ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1341
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
कवितेचे नाव
अय्या, कित्ती योगायोग...
In reply to कवितेचे नाव by अनुप बंगाली
कधीपासून ?
आपल्या
सुंदर कविता
कधीपासून ..............