पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ gallery मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.)
मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली. (आतमध्ये मी रामरक्षा वाचतो असा बंगांचा दावा आहे. खरे खोटे माहित नाही.)
सगळ्यात शेवटी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर, लोकांची अर्धी कामे झाल्यावर अभ्याची Gym उरकल्यानंतर नानगुडे पाटलांचा अभ्यास करून व orkut-facebook सहित सर्व बघून झाल्यानंतर, बंगांचे सगळे पेपर वाचून झाल्यानंतर जहापन्हा उठले. तोपर्यंत १२:३० झाले होते. जहापन्हानी आरश्यात बघत केस ठीकठाक करून आपण माणसात आलोय याची खात्री करून घेतली. त्यानंतर जहापन्हा बाहेर येऊन पेपर वाचत बसले. पाच-दहा मिनिटानंतर अभ्याची करडी नजर जहापन्हावर पडली. आणि जहापन्हा समजले कि सगळी मंडळी जेवणासाठी थांबली आहेत. जहापन्हानि पेपर सोडला आणि दात घासण्याचा ब्रश हातात घेतला.
जेवण करत असताना अभ्याच्या मोबाईल वर तबला वाजला (तबल्याची ringtone हो...) अभ्याने फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या प्रयत्नात UPSC-prelim पास व्हावी तसा आनंद झाला. त्याच कारणही तसं खासच होत. सदाशिव पुणेकर हा आमचा एक नंबरचा चिकट मित्र. कधी स्वताच्या पैशाने चहा म्हणून पाजला नाही. उलट बिल द्यायची वेळ आली आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने अचूक समजत (पुणेकरांना सगळ्या गोष्टीच उपजतच ज्ञान असत म्हणा..पुणे तिथे काय उणे) आणि हा फोन आल्याचा बहाना करून बरोबर सटकतो. तर ह्या सदाशिव पुणेकरान आम्हाला चक्क घरी जेवायला बोलावलं होत. घोरपडी का काय असलाच प्राण्याच नाव असलेल्या ठिकाणी त्याने नवीन घर घेतलं होत.
दुसऱ्या दिवशी काळेवाडी आघाडीचे सदस्य खुशीतच होते. आज संध्याकाळीच जेवनाच निमंत्रण होत. दुपारच्या जेवणात मावशींना फक्त वरण भात सांगण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता काळेवाडीचे चार सदस्य - अभ्या, बंग, जहापन्हा आणि नानगुडे पाटील हे घोरपडीला जाण्यास निघाले. नानगुडेनची सफारी गाडी काळेवाडी च्या दिमतीला असल्यामुळे कसे जायचे हा प्रश्न नव्हता. प्रथम आम्हाला कोथरूडला जायचे होते. कारण काळेवाडीचा माजी सदस्य भाऊ(उर्फ मराठवाड्याचा Marx) सध्या तिथे राहतो. तोही आमच्या सोबत येणार होता.कोथरूडवरून भाऊला घेऊन आमची स्वारी घोरपडीला निघाली. कॅम्पात पोहोचेपर्यंत प्रवास सुरळीत झाला. तिथे मात्र एका वळणावर आल्यावर डावीकडे जायचे कि उजवी कडे असा पेच पडला. तिथे भाऊने Marx ची two class theory मांडली. डाव्या बाजूला झोपडपट्टी होती त्यामुळे उजव्या बाजूला capitalist क्लास रहात असावा असा निष्कर्ष भाऊने काढला. पण आमचा मित्र मध्यमवर्गात मोडत असल्या मुले व Marx च्या तत्वज्ञानात मध्यम वर्गाला स्थान नसल्यामुळे भाऊला हि theory मागे घ्यावी लागली.
आपण पुण्यात फार वर्षे राहतो त्यामुळे कुणाला पत्ता विचाराने हे कमीपणाचे लक्षण आहे अस मानून आम्ही कॅम्पात डावी उजवी वळण घेत राहिलो. अर्ध्या तासानंतर अस लक्ष्यात आल कि आपण पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो आहोत.
थोड्या वेळाने जहापन्हांच्या अस लक्ष्यात आल कि बंग हे घोरपडीला एकदा जाऊन आले आहेत. बंग कुठे आहेत याच्या शोध घेतल्यानंतर अस लक्ष्यात आल कि बंग हे गाडीच्या मागच्या सीट वर निवांत झोपले आहेत. पण गाडी थांबल्यामुळे तेही खडबडून उठले. बंगानी दिशादर्शनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र आमची स्वारी सुरक्षितपणे घोरपडीला इच्छितस्थळी जाऊन पोहचली.
घराच्या परिसरात गाडी पार्क करून काळेवाडीचे सदस्य उतरले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा झाले होते. समोरच्या रस्त्यावरून जाणारी सौंदर्यस्थळे जहापन्हानी अचूक हेरली व त्यावर भाऊशी तपशीलवार चर्चा चालू केली. नानगुडे पाटलांनी चालता चालता 'या बिल्डिंग चे गेट जर थोडे मोठे असते तर आपल्याला ट्रक आणता आला असता यावर अभ्याशी वाद घालायला चालू केला. त्यावर बंगांनी 'आपण ट्रक घेऊन कशाला येणार असा प्रतिप्रश्न करून नानगुडेना निरुत्तर केल.
घरी पोहचल्यावर आमच्या मित्राने आमचे मोठ्या प्रेमाने(? बहुतेक) स्वागत केल. थोड्यावेळाने आम्हाला त्याने घर दाखवायला चालू केल.नवीन घर घेतलेल्या लोकांना भेटताना तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागेल ते म्हणजे : 'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवल . मग rate कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग space कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे . सदशिवाने पण gallery कशी spacious आहे , kitchen मध्ये कशी छान हवा येते वगैरे तांत्रिक बाबी सांगितल्या. शेवटी एकदाचे घर बघण्याचे सोपस्कार पार पाडून आम्ही hall मध्ये येऊन बसलो.
मग काकुनी आम्हाला 'पोहे खाणार का ? अस विचारलं.
पहिल्यांदा लगेच होय कस म्हणायचं या रीतीरिवाजानुसार आम्ही 'नको-नको -कशाला' अस करू लागलो.(अर्थात पोहे खाल्यानंतर जेवण कमी जाईल हा सुज्ञ विचार त्यामागे होताच) तरीही पोहे खायला हरकत नाही अस एकंदर आमच मत बनत चालल होत. पण एवढ्यात सदाशिव पटकन म्हणाला
'अरे पोहे नाही अर्धा कप चहा तरी घ्या'.
त्यावर भाऊने चपळाई दाखवत 'हो चहा चालेल' अस म्हणून होकार देऊन टाकला. आणि थोड्या वेळात आमच्यासाठी अर्धा अर्धा कप चहा आला.(यालाच कदाचित half tea diplomacy म्हणत असावेत!!!!)
चहासोबत गप्पा मारता मारता साडेसात होऊन गेले. सर्व मंडळींचे लक्ष नाही म्हंटले तरी किचेन कडे होतेच. थोड्या वेळाने आमचा मित्र आलोच हं एका मिनिटात म्हणून आत गायब झाला. पाच-दहा मिनिटे अशीच गेल्यावर मात्र आतून फोडणीच्या आवाजापाठोपाठ फोडणीचा वासहि दरवळला. मग मंडळी थोडी relax झाली. भाऊ ला कोपऱ्यात ठेवलेली काही पुस्तके दिसली आणि भाऊ ती चाळण्यात मग्न झाला. अभ्या व जहापन्हा gallery त जाऊन रस्त्यावरच्या लोकांना न्याहाळू लागले. बंगानी बाजूचा pune times उचलून वाचायला (? कि बघायला) चालू केला. तर नानगुडे पाटलांना कुठेतरी कोपऱ्यात एका सुडौल शरीरयष्टीचा फोटो दिसला(पुरुषाचा.. उगीच नसत्या कल्पना नको) व तो पाहण्यात ते दंग झाले.
आठ वाजून गेले. हा मित्र हि आतच गायब होता. आता मंडळींच्या position हि बदलल्या होत्या. नानगुडे पाटील पुस्तक वाचक होते तर बंग body builder ला बघण्यात दंग झाले. भाऊ gallery त पळाला तर अभ्या आणि जहापन्हा नुसतेच शून्यात नजर लाऊन बसले होते. tv वरच्या मराठी मालिकांचे स्वर आतून ऐकू येऊ लागले होते. 'चला आता जेवायला घ्या' हे उत्साहवर्धक शब्द ऐकायला सर्व जण अधीर झाले होते. साडेआठला सदाशिव बाहेर आला(अरे वाह). अरे sorry बरका 'फोनवर बोलत होतो' - इति सदाशिव. 'बर माझे ट्रेकचे फोटो दाखवतो तुम्हाला'. आमच्या मित्राला कुठेतरी डोंगरावर कानाकोपऱ्यात अडचणीच्या जागी चढून जायची व आपण तिथे गेलो होतो हे दाखवण्यासाठी तिथले फोटो काढायची आवड होती (त्यालाच काही लोक ट्रेक असहि म्हणतात). तर हे ट्रेक चे फोटो दाखवण्याचा कार्यक्रम बराच वेळ लांबला. आम्ही पण 'अरे वा' 'छानच' ' मस्त आहे' 'सहीच' अस काहीतरी उगीच बोलायचं म्हणून बोलत होतो. आता tv वर मराठी मालिकांच्या जागी सासबहुच्या हिंदी serial लागल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्हाला मग लक्षात आल कि आपली काहीतरी गफलत झाली आहे. थोड्या वेळाने मग आता परिस्थितीचा अंदाज घ्यायचा म्हणून जहापन्हानि एक खडा टाकून पाहिला.
'बराच उशीर झाला आहे आम्हाला निघायला' - जहापन्हा
'हो माझ्या लक्षातच आल नाही.. उगीच तुम्हाला फोटो दाखवत थांबवून ठेवलं, या पुन्हा असेच निवांत' - इति सदाशिव
आता मात्र सगळ्या मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे झाले झाले. अभ्यानेच फोन वर निमंत्रण स्वीकारले होते त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्याने चेहऱ्यावर आता बाहेर जाऊन काय असेल ते settle करू असा भाव आणला. मग निरोप घेऊन आम्ही बाहेर निघालो. निघता निघता काकू म्हणाल्या 'जेवायला थांबला असता तर बर झाल असत..'
कदाचित 'जेवायला' याच्यापुढचे शब्द जहापन्हा नि ऐकले नसावेत ते तसेच पादत्राणासहित आत जायला निघाले पण नानगुडे पाटलांनी बाका प्रसंग ओळखून त्यांना मागे खेचले.
काळेवाडीचे सदस्य मग आपल्या कार्यालयात परत आले आणि रात्री खिचडी भात करून त्यांनी आपली भूक भागवली.
मित्रानो या अनुभवातून आघाडी बरीच शहाणी झाली आहे. आघाडी ने असे बाके प्रसंग इतर लोकांवर ओढवतील याची सामाजिक जाणीव (याबाबतीत काळेवाडी नेहमी आघाडीवर असते म्हणूनच 'काळेवाडी आघाडी' असे नाव आहे ) ठेवून काही नियमावली तयार केली आहे.
१. कोणत्याही पुणेकराचा तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देणारा फोन/इमेल/अन्य आल्यास स्वताला चिमटा काढून आपण स्वप्न तर पाहत नाही ना याची खात्री करावी. समोर कोणी असल्यास त्याला चिमटा काढायला सांगणे उत्तम...
२. इतके केल्यानंतर पुन्हा जाताना एकवार फोन करून त्याच वर्षाच्या दिवशीचे निमंत्रण आहे का हे पडताळावे.
३. कुणाही पुणेकराच्या घरी गेल्यानंतर काही हवे का म्हणून विचारले तर पटकन हो म्हणावे अन्यथा पाणी सुद्धा मिळणे दुरापास्त होईल.
विशेष सूचना - वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रे मात्र वास्तव जगातील आहेत. तसेच या लेखामुळे कोणत्याही पुणेकराच्या व प्राणी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याला काळेवाडी आघाडी जबाबदार असणार नाही. तसेच याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
सर्व हक्क सुरक्षित@काळेवाडी आघाडी
आघाडीशी येथे संपर्क साधा : https://kalewadi-aghadi.blogspot.com/
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास.........
आघाडी आवडली. अजुन येऊ देत.....
लेख आवडला
आणि तुम्ही रिकाम्या हस्ते गेलात त्याचं काही नाही वाटतं? :)
तुम्हीही चिक्कू पुणेकरच बरं का काळे आघाडी वीर!!!
बरोबर. .. दारावरचा आहेर
In reply to लेख आवडला by शुचि
बरोबर. .. दारावरचा आहेर नाहीतर बाहेर हा बोर्ड काळेवाडी आघाडीच्या सदस्यांनी वाचला नसेल. कदाचित ते साक्षर नसण्याचीही शक्यता आहे. ;)
अभिनंदन ! तुम्ही अर्धा कप चहा
अभिनंदन ! तुम्ही अर्धा कप चहा पिऊन आलात !!!! :))
अजून लिहा..
आम्ही पुणेकर ...
खरकट्या हाताने कावळा हाकलत नाही तिथे तुम्हाला अर्धा कप चहा मिळाला ... ही तर पंचतारांकित मेजवानीच म्हटली पाहिजे ...
मस्त!
:)
पुणे तिथे काय उणे...
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. विद्येचं माहेरघर. पुण्याने भारताला टिळक, आगरकर, रानडे वगैरे थोर्थोर मंडळी दिली. शिवबाची पुण्यभू हीच. पेशव्यांनी इथूनच राज्य करून सर्व भारतात मराठ्यांचा दरारा बसवला.
अशा या पुण्यनगरीला माझे शतशः वंदन.
(आजकाल मी सगळी खरेदी पुण्यातच करतो)
पुण्याची हवा
In reply to पुणे तिथे काय उणे... by राजेश घासकडवी
पुण्याची हवा गुर्जींनाही मानवली म्हणायची! गुर्जींनी खरेदी सोडून दिली आहे का काय असा एक दुष्ट विचार डोकावून गेला!
असो, लेख मस्तच जमला आहे. अजून लिहा.
अवांतरः एका सदाशिव पेठी दुकानदाराच्या खर्चाने मी एकदा मस्तानी प्यायली आहे.
मी विचारच करत होतो की अजुन
In reply to पुण्याची हवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी विचारच करत होतो की अजुन हलकट लोकांचे प्रतिसाद आले कसे नाहीत...
असो.. त्या दिवशीची पैसे आपल्या दुरदेशीय काकांनी दिले होते ;)
नवीन विषय
In reply to मी विचारच करत होतो की अजुन by परिकथेतील राजकुमार
ओ काळेवाडी मंडळ, हा घ्या नवीन विषय आणि होऊन जाऊ द्या आणखी एक झक्कास लेख:
अवांतराशी अंशतः सहमत. मी एका
In reply to पुण्याची हवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतराशी अंशतः सहमत. मी एका सदाशिवपेठी मित्राच्या खर्चाने चा-बिडी प्यायली आहे .परत त्याच्या दुकानात बसून त्याचे डोके फुकटात खाल्ले ते वेगळेच. :)
गप गुमान पोहे खाऊन घ्यायचे
गप गुमान पोहे खाऊन घ्यायचे तर?
हावरट पणा नडला तुम्हाला, दुसरे काय!!
सफेद झुट ...
लेख वाचायला घेतला आणि पहिल्या वाक्यातच खडा लागला ...
अत्यंत विसंगत आणि बेसलेस असलेल्या ह्या २ वाक्यांनी लेखाचे आधीच "स्पॉट फिक्सिंग" केले आहे.
प्रॅक्टिकली शक्य नसलेल्या अधोरेखित संकल्पनांचे उदात्तीकरण करुन त्याआधारे स्वतःला 'उच्चविद्यावुभुषित सुसंस्कृत' म्हणवुन घेऊन नंतर ह्याच अकाउंटवर पुण्याला व पुणेकरांना नावे ठेवण्याचा प्रकार तसा आम्हाला नवा नाही.
तद्दन 'दबंग' स्टाईल फेकुबाज लेख आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
( दबंग ह्या सिनेमाचे समिक्षण आम्ही नंतर कधीतरी सवडीने लिहुच, तुर्तास त्याची तहान ह्या लेखावर भागवायला हरकत नाही ) ;)
असो, अभ्याचा जरा व्यासंग कमी पडतो आहे असेही आम्हाला वाटते.
बाकी चालु द्यात, तुर्तास त्या घोरपडीच्या मित्राला आमचे संपुर्ण समर्थन आहे.
अवांतर : काय रे अभ्या, आजकाल तो घोरपडीचा मित्र दिल्लीला असतो काय रे ? ;)
- जहापन्हा डॉनराव नानगुडे पाटील
बस क्या हरी.. अरे हेच वास्तव
In reply to सफेद झुट ... by छोटा डॉन
बस क्या हरी.. अरे हेच वास्तव आहे .. बेंगळूरू मध्ये राहिल्या मूळे तुला खऱ्या जगाचा विसर पडला आहे. बरंय आता तू पुण्यात येतो आहे.. खर जग तुला कळेल.. आणि लेखातली पात्रं तू समजतो तशी नाहीत.... अभ्या म्हणजे मी नाही... तशी हि जागा वैयक्तिक बाबीची चर्चा करण्याची नाही पण असो....
आघाडी आवडली. मी तर जेवन देत
आघाडी आवडली.
मी तर जेवन देत असले कोणी पुण्यात तरी सरळ नाही वरच आडुन बसतो.
कारण जेवायला बसलो तर चहा बरोबर नाष्टा केला जातो तेव्हडे ही पोट भरत नाही .
आणि एक पुरी वजा चपाती संपत नाहि ताटातील तोपर्यंत भात घालु असे सुरु होते.
तो ही जेवणाच्या डब्यात बसेल येव्हडाच समोर असतो ..
असो आपली आघाडी आम्च्या कडे वळवा एकदा.
रविवारी आला तर चहा मागीतला तरी मटनाचे ताट येइल पुढे.
आणि उरुळी कांचन येथील मुख्य शाखेची नविन शाखा रहाटनी - काळेवाडी ला ओपन आहे.
येरवी व्हेज असलेल्या ताटावर मन समाधानी करुन मिळेल
आघाडी आवडली. मी तर जेवन देत
आघाडी आवडली.
मी तर जेवन देत असले कोणी पुण्यात तरी सरळ नाही वरच आडुन बसतो.
कारण जेवायला बसलो तर चहा बरोबर नाष्टा केला जातो तेव्हडे ही पोट भरत नाही .
आणि एक पुरी वजा चपाती संपत नाहि ताटातील तोपर्यंत भात घालु असे सुरु होते.
तो ही जेवणाच्या डब्यात बसेल येव्हडाच समोर असतो ..
असो आपली आघाडी आम्च्या कडे वळवा एकदा.
रविवारी आला तर चहा मागीतला तरी मटनाचे ताट येइल पुढे.
आणि उरुळी कांचन येथील मुख्य शाखेची नविन शाखा रहाटनी - काळेवाडी ला ओपन आहे.
येरवी व्हेज असलेल्या ताटावर मन समाधानी करुन मिळेल
धन्यवाद... आपल्या तपशीलवार
In reply to आघाडी आवडली. मी तर जेवन देत by गणेशा
धन्यवाद... आपल्या तपशीलवार निमंत्रणाची काळेवाडी आघाडी वाट पाहत आहे....
गनेशाजी मी पण वाट पाहत
In reply to धन्यवाद... आपल्या तपशीलवार by आपला आभि
गनेशाजी
मी पण वाट पाहत आहे...
आपला पूर्ण पत्ता द्यावा...
अभ्या (पहिला ) - आघाडी संस्थापक अध्यक्ष
प्रस्तुत लेखाचा लेखक हा अभ्या - (दुसरा) आहे
'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे
'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवल . मग rate कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग space कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे .
हे लै खास...
लेख आवडला...
अवांतर : पुणेकरांना शिव्या पडत असतात तेव्हा मी पुणेकर नसतो
णिषेढ....
णिषेढ....
णिषेढ....
णिषेढ....
णिषेढ....
णिषेढ....
वा वा वा!!! चहा तरी मिळवलात
वा वा वा!!! चहा तरी मिळवलात हो..
इथू पुढे लक्षात ठेवा...पुणेकराने चहा विचारला तर हो तर म्हणायचेच पण वर " अजून जेवणही व्हायचे आहे, उगाच काही गोड धोड करत बसू नका...साधसच चालेल " असं म्हणा..काय?