Skip to main content

अट्टल चोरटा मी........!!

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/09/2010 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अट्टल चोरटा मी........!! नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द कुणीतरी सहज बोलून जातो अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात नजर स्थिर होवून मन डोलायला लागते कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो आणि ती नादब्रम्हाची लय चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी सद्‍गुणाची उचलेगिरी अंतराच्या शुद्धीसाठी असा अभय भामटा मी असा अट्टल चोरटा मी.......!! गंगाधर मुटे .......................................................
लेखनविषय:

वाचने 1422
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

उत्कट भव्य ते घ्यावे..... आवडली कविता....

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मस्तं.