Skip to main content

मी त्या रक्ताच्या शोधात आहे....

लेखक पंचम यांनी शनिवार, 11/09/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी मराठी मनगटांना स्वराज्याचे बळ दिले...... आज जो मराठ्यांना पुन्हा लढायला लावेल... हर हर महादेव पुन्हा गगन भेदून राहेल..... फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... पूर्वी सारखे आज ही परकीय आक्रमण वाढत आहे.... माझ्याच मातीत आज माझी मराठी गाढली जात आहे..... सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... -पंचम..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1764
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by शानबा५१२

नाही कदाचित कविता मराठीत असल्यामुळे तुम्हाला समजली नसावी...माफी असावी..!

आम्ही पण त्याच रक्ताच्या शोधात आहोत. म्हणजे आमच्यात आहे ते रक्त सळसळत अजून पण आमचे रक्त किरकोळ आहे. आम्ही घाऊक रक्ताच्या शोधात आहोत. मिळाले की कळेलच.