Skip to main content

आले गणपती माझ्या अंगणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/09/2010 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी मुकुट शिरावरी दिसे शोभुनी भरजरी पितांबर अंगी नेसूनी पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी शुंडेसहित एकदंत राखूनी आले गणपती माझ्या अंगणी कमळपुष्प हाती धरूनी दुसर्‍या हाती परशू घेवूनी एका हाती मोदक लेवूनी शुभ हाताने आशिष देवूनी आले गणपती माझ्या अंगणी वक्रतुंड हेरंब लंबोदर विकट विनायक विघ्नेश्वर गणेश महोदर विघ्नहर अगणीत असली नावे घेवूनी आले गणपती माझ्या अंगणी दहा दिवस गणपती येता दारी रोमहर्षक सोहळा घडतो भारी मुर्ती तुझी एक सदस्य होई कुटुंबात सुख आमच्या आणूनी आले गणपती माझ्या अंगणी - पाषाणभेद (दगडफोड्या) ११/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2196
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कालानुरूप छान कविता.