>>क्षणभरासाठीही पापणी मिटतानाही पुन्हा डोळे उघडण्याची डोळ्याना घाई व्हायची.
आई ग्गं..
>>या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....!
बाय.. पाहणे आणि दिसणे यात येक्झॅक्टली हाच फरक आहे.. तुला 'दिसलं' .. एवढं जागं राहाताना नेहेमीच त्रास होतो.. गुंगी बरी...
>>आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
दणकट..
>>ळुहळू गायरांगर गाव दिसू लागले. तीन बाजूंनी डोंगर कडे आणि मध्ये बेचक्यात अळंबीसारखे फुललेले हे खेडे !
मस्त..
तर अप्रतिमच. खुप आवडली.
या धबधब्यांचं आयुष्य काय ? हा पॅराग्राफ खुप आवडला. त्यावर अर्धवटरावांनी भाष्य केलच आहे.
फोटो पाहुन मंत्रमुग्ध झालो. खरच मला प्रत्यक्ष पहायला मिळाले तर त्या निसर्गात आपली तर समाधी लागेल बॉ.
सगळेच फोटो सेव्ह केलेत (न विचारता).
अगं तु येडीयेस का?
कुठे जाऊन आलीस तू....च्यायला, डायरेक्ट स्वर्ग दिसतोय हा तर. खल्लास! आपण खंप्लीट खल्लास!!
>>पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी !
व्वा!
मस्तच लिहितेस हां तू.
पुढच्या भागांची वाट पाहतोय. :)
वर्णन आणि फोटो एवढे आवडले की जायचा विचार करतोय.
इकडे जायचा सगळा खर्च काय असेल हो (राहणे-खाणे-पिणे-फिरणे)?
आणि भेट देण्यासाठी वर्षातला बेश्ट कालावधी कोणता?
फ क्क ड.
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्यातल्या एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
सगळ्याचं सार आहे हा परिच्छेद! केवळ सुंदर!!!
(नि:शब्द)रंगा
प्रतिक्रिया
झकास ,मस्त झालाय हा भाग
सुरेख
अप्रतिम
फोटो मस्त आहेतच पण लेखन ग्रेट
फसक्लास्स्स्स्स्स्स्स
मितानराव तै.. लै भारी झालाय
सुंदर सुंदर सुंदर!!! फोटो आणि
असेच म्हणतो!
सुरेख!
केवळ अप्रतीम !!
सुंदर!!
सुरेख
>>क्षणभरासाठीही पापणी
+१
प्रत्येक
अरे क्रमशः कुठे गेले???? हाही
अप्रतिम
तुमची शैली
सुंदर...
या धबधब्यांचं आयुष्य काय ? हा
मस्त गं छान लिहिते
अप्रतिम
आईईईईशप्पथ!
लेख व फोटो दोन्ही सुंदर..मस्त
क्लासिक लिखाण आणि फोटोदेखील.
थेट भेटच..
क्या बात है!!
किती सुंदर आहे गायरांगर