शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा
शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||
गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||
नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||
घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०
काव्यरस
वाचने
6035
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ! सर्वांना
सर्वांना शब्दाबद्दल खुलासा
In reply to मस्त ! सर्वांना by अवलिया
वा वा! आज आमच्या सणाचं गाणं
सुंदर!!! बरेच नवीन शब्द कळले.
अतिशय छान कविता
छान जमलीये कविता. पाभे भाऊ,
पोळ्याच्या दिवशी बैल
In reply to छान जमलीये कविता. पाभे भाऊ, by पक्या
मस्तच
चांगली कविता. खरोखर आवडली.
आज आवतण घे....