✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गूढकथा: कालग्रहांचे भविष्यआरसे! (भाग-१)

न
निमिष सोनार यांनी
Sat, 09/04/2010 - 21:58  ·  लेख
लेख
दि. २२/०२/२०२२- मंगळवार- वेळ सकाळी चार मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता. "स्कोटा" कार ताशी ८० च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत. त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "राहुल, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?" राहुल म्हणाला, "मला नेमकी माहिती मिळायला मेहेनत करावी लागली रे. पण शेवटी मिळाली. शहरात नेमकी डीलीव्हरीची शक्यतो पहिली केस कोणती हे " डॅनियलः "मित्रा, मला उत्सुकता लागून राहीली आहे. कसा असेल तो जीव? आतापर्यंत सगळं जग शांत झोपलंय. ते अनभिज्ञ आहे की आज मध्यरात्री बारा वाजेनंतर जन्मलेल्या अनेक जीवांपैकी हा एका जीव एका अभूतपूर्व बदलाची सुरुवात असेल." राहुलः "डॅन, अजुन ते निश्चित नाही. म्हणूनच तर आपण बघायला जाण्याचा एवढा आटापीटा करतोय. बघितल्यावर खरे काय ते कळेल. कदाचीत ते गुणधर्म नंतर जाणवायला लागतील आपण अजून बरेच जीव बघून त्यांची नोंद ठेऊ. त्यांचा पुढे फॉलो अप करु" डॅनियलः "ओके राहू.. पण आपला अंदाज खरा ठरेल बघ." राहुलः "डॅन, डोन्ट कॉल मी राहू... इट मेक्स मी फिल डीमन लाईक" त्यांचा तो संवाद सुरू होता. गाडी वेगाने धावतांना दिसत होती. वरुन बरसणार्‍या पावसाच्या धारांना झेलत. अजून बरेच अंतर पार करायचे होते. एक मोठा पूल पार केल्यावर "ट्रेड सेंटर" आणि मग ते भलेमोठे हॉस्पीटल. समल हॉस्पिटल. त्या हॉस्पिटल मधील बारा वाजेनंतरची ही पहिली डीलीव्हरी. आईसोबतचे नातेवाईक. आईची आर्त कींकाळी. मग बाळाचा रडण्याचा आवाज.....अन बाळ बघून डॉक्टरच्या डोळ्यात एक अभूतपूर्व भीतीयुक्त चमक....!! ... मध्ये शिरतांना राहुलला सुरक्षारक्षकाने आणि इतर अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने सगळ्यांच्या डोळ्यात एका उपकरणाद्वारे काही मिनिटे प्रभाव असलेली एक इमेज प्रोजेक्ट केली ज्यामुळे तितकी मिनिटे त्या सगळ्यांना एक ठरावीक चित्र डॉळ्यासमोर दिसले. राहुल दिसला नाही. तो आत शिरेपर्यंत. डॉक्टरच्या डोळ्यातली ती अभूतपूर्व भीतीयुक्त चमक राहुलच्या डोळ्यातही दिसली. म्हणजे आता सगळ्यांना कळणार. काहिही लपून राहाणार नाही? असे सांगणार जगाला समजावून? ही बातमी टी.व्ही वर यायला सुरुवात झाली. त्याच सकाळी सहा वाजतांनाची गोष्ट. शहरात एके टीकाणी पावसामुळे ट्रॅफिक जाम होता. एका पिवळ्या कारचालकाचा दुसर्‍या लाल कारला अगदी थोडा धक्का लागला होता. पण लाल कारचा मालक सरळ गाडीखाली उतरून पिवळ्या कारच्या मालकाला भोसकू लागला. जवळ जवळ जिवानिशी मारणार होता तो. ही बातमी टि.व्ही. वर आली. एवढ्याशा घटनेमुले कुणी इतके हिंसक कसे होवू शकते बरे? ... प्रसिद्ध चित्रकार सुरेश संत हे चित्र काढता काढता अचानक थांबले. त्यांना आज सकाळपासून उत्स्फुर्तपणे काही सुचतच नव्हते. असे पहिल्यांदाच होत होते. उभ्या आयुष्यात. ते चित्र काढूच शकत नव्हते. काढता काढता मध्येच त्यांनी अपूर्ण राहीलेल्या चित्रावर काट मारली. आतापर्यंतची मेहेनत वाया गेली. त्यांनै स्वतःच ती वाया घालवली. ही बातमी टी. व्ही वर ठळकपणे येत होती. त्यांनी चित्र काढायचे कायमचे थांबवले. कारण चित्र म्हणजे काय हे जवळपास त्यांना कळेनासे झाले होते. हा स्मॄतीभ्रंशाचा प्रकार होता का? नाहि. इतर सगळे त्यांना आठवत होते, फक्त चित्र कसे काढायचे ते सोडून... अंधेरीच्या एका फ्लॅट मध्ये डॅनियल शी बोलताना राहुल या सगळ्या बातम्यांची सांगड घालत होता. त्या दोघांव्यतिरिक्त इतर अनेकांना या घटनांची सांगड घालता येत नव्हती. शक्यच नव्हते ते. डॅनियल शी बोलून झाल्यावर राहुलला तो दिवस आठवला. एके ठीकाणी उत्खननात भिंतीवर लिहिलेला तो विचित्र संदेश आणि त्याखाली असलेले दोन घड्याळांचे चित्र. प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. आणि बाजूला त्याच घड्याळाची उलट आरशातली प्रतिमा. अन त्यानंतरच्या आणि आधीच्या काही घटना.. आजचे ते बाळ! टि.व्ही. वर आता अनेक विचित्र अविश्वसनिय बातम्या येवू लागल्या. आज असे काय घडले? (क्रमश:)
  • गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग २)
  • गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ३)
  • गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ४)
  • गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ५)
  • गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग-६)- शेवट

Book traversal links for गूढकथा: कालग्रहांचे भविष्यआरसे! (भाग-१)

  • गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग २) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4286 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

छान कथा.....

वेताळ
Sat, 09/04/2010 - 22:14 नवीन
मजा येवु लागल्यावर एकदम खडा लागला.
  • Log in or register to post comments

विज्ञान कथा?? वाचली.. पण अजुन

डावखुरा
Sat, 09/04/2010 - 22:16 नवीन
विज्ञान कथा?? वाचली.. पण अजुन पाहिजे तेवढी नाही कळाली.. जरा मोठा भाग येउ द्यात.. पुलेशु...
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sat, 09/04/2010 - 23:55 नवीन
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

येऊ द्या....

केशवपुत
Sat, 09/04/2010 - 22:41 नवीन
पुढे काय ?? भाग २ त्वरित येऊ द्या.
  • Log in or register to post comments

सुरूवात चांगली आहे. उत्कंठा

प्राजु
Sun, 09/05/2010 - 00:04 नवीन
सुरूवात चांगली आहे. उत्कंठा वर्धक आहे. लवकर येऊद्या पुढचे भाग.
  • Log in or register to post comments

छान वाचतो आहे.

llपुण्याचे पेशवेll
Sun, 09/05/2010 - 08:07 नवीन
छान वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

डोक्यावरुन चाललंय. जरा

अप्पा जोगळेकर
Sun, 09/05/2010 - 13:37 नवीन
डोक्यावरुन चाललंय. जरा एक्सप्लनेशन द्या कोणीतरी.
  • Log in or register to post comments

सह्ही! थ्रिलर शिणुमासारखं

धमाल मुलगा
Wed, 09/08/2010 - 17:02 नवीन
सह्ही! थ्रिलर शिणुमासारखं वाटतंय वाचताना. मजा आली बॉ.
  • Log in or register to post comments

आजच वाचला भाग

गणेशा
Tue, 09/14/2010 - 18:43 नवीन
आवडला भाग. निवांत वाचुया असे म्हणत म्हणत तुमचे चार भाग आले तरी वाचणे झाले नव्हते . आज आत एकदाच फडशा पाडतो. प्रत्येक भागात आधीची लिंक दिली असती तर छान झाले असते -
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंतच्या भागांची लिंक-

निमिष सोनार
गुरुवार, 09/16/2010 - 09:47 नवीन
आत्तापर्यंतच्या भागांची लिंक- http://www.misalpav.com/node/14260 http://www.misalpav.com/node/14316 http://www.misalpav.com/node/14363 http://www.misalpav.com/node/14416
  • Log in or register to post comments

सगळ्या भागांच्या लिंक्स!

निमिष सोनार
Fri, 09/24/2010 - 08:18 नवीन
सगळ्या भागांच्या लिंक्स- http://www.misalpav.com/node/14260 http://www.misalpav.com/node/14316 http://www.misalpav.com/node/14363 http://www.misalpav.com/node/14416 http://www.misalpav.com/node/14458 http://www.misalpav.com/node/14486 माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या- http://thinknimish.blogspot.com
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा