Skip to main content

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 07/09/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो. तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

वाचने 25492
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

आगायाया, तुम्ही दोघांनी मिळून बाजार उठवला पार ... मिभोकाकांचा!

In reply to by चतुरंग

हाहाहाहा.. रंगाकाका, तुमच्या पुढ्यात कसला ज्यूस आहे ते ही आता सांगून टाका!!!! वेड्यासारखी हसतेय मी एकटीच!!!!

In reply to by चतुरंग

आजपासून 'चुम्मोबा भोक्तर' असं ठेवूयात का?
मला नवीन नाव सुचलं - 'किसळभोक्ता'. (खुदसे बातां - आपल्या नावाची दीडेकशे विडंबनं समर्थ विडंबकाककरवी आधीच होऊन गेलेली असली की कसं बरं असतं...)

In reply to by राजेश घासकडवी

हो का... मग फोटो टाकाच बुवा आता.. त्याशिवाय परिपूर्णता येणार नाही!!!! बाकी गुर्जी, _/\_

रोजच्या गप्पा टप्पा सांठी संस्थपकानी पैशे खर्चून रडफळा नावाचा विभाग सुरू केला आहे याची नोंद घ्यावी... मंडळ आपले आभारी राहील

छॅ बॉ (छबो नव्हे) आजकाल सगळ्यांनाच लारा व्हायचयं! - टिंग्या मॅक्रगा

मिभो वर अशी वेळ यावी अं? (रायगडाला जेंव्हा जाग येते - काशीनाथ घाणेकर स्टाईल मधे)

आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
आम्हाला यात इस्कॉन चा वास येतो.