आम्ही आधी वाड्यातल्या विहीरीत विसर्जन करायचो. आजुबाजुचे देखील बरेच आळशी लोक तिकडेच यायचे. आंब्याची डाळ, खोबरे वगैरे खायला मिळायचे म्हणुन आम्ही पण त्यांना अडवायचो नाही.
मात्र गेली काही वर्षे घाटावर जाउन महानगरपालीकेने बांधलेल्या हौदात विसर्जन करतो. होडीवाले फार पैसे घेतात हो.
"विसर्जन करण्याच्या प्रथेचे विसर्जन केले आहे"
+ १ निर्णय.... आणि अभिनंदन तुमचे आणि तुमच्या घरातील सर्व लहानथोरांचे ज्यांनी ही प्रथा स्वीकारली. असेच चित्र सार्या महाराष्ट्रात जी दिनी दिसेल तो खरा गणेशाचा दिन.
इन्द्रा
छानच आहे सुनीलरावांनी शोधलेली/दिलेली ही बातमी (जरी २००८ ची असली तरी). कराची सारख्या पाकिस्तानच्या एका मोठ्या शहरात "गणेश चतुर्थी" हिंदू नागरिकांच्याकडून (त्यातही प्रामुख्याने मराठी भक्ताकडून) अशा स्वरूपात साजरी केली जाते हे वाचून 'पाकिस्तान म्हणजे फक्त पीरासाठी जागा" असे चित्र अजिबात नाही हे लक्षात आले.
त्यातही तेथील गणेश मंदिराचे पुजारी श्री.मोहन गायकवाड गेली ४२ वर्षे मूर्ती स्थापना आणि पूजाअर्चनेचे काम करीत आहेत, हेही विशेषच म्हणावे लागेल.
इन्द्रा
(थोडेसे अवांतर >> याच अनुषंगाने कायदेआझम बॅ.जिना यांनी रावळपिंडी येथे बसविण्यात आलेला 'लोकमान्य टिळक' यांचा पुतळा समाजकंटकापासून वाचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा उल्लेख स्मरणात आला.)
माझ्या माहितीप्रमाणे ही मंडळी (म्हणजे त्यांचे वाड-वडील) सिंध प्रांत मुंबई इलाख्यात होता तेव्हा तेथे गेली, नोकरी-धंद्यासाठी (नोकरीच असणार! मराठी माणूस धंदा करणार आणि तोही सिंधमध्ये?).
फाळणीनंतर काही कुटुंबे तिथेच राहिली (बहुतेकांना असे वाटले असावे की फाळणी एकतर तात्पुरती असावी किंवा फाळणी राहिली तरी भारतात येणे जाणे फारसे दुर्लभ होणार नाही).
अवांतर - श्रीनगरमध्येही बरीच मराठी कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात हे ठाऊक आहे?
कमीतकमी मराठी लोक तरी अंधश्रध्दांतून बाहेर येतील असे वाटले होते.
मत इतर ला दिले आहे. गणपतीच्या मूर्तिकडे केवळ एक उत्तम शिल्पकलेचा आविष्कार या दृष्टीने पहातो त्यामुळे घरी आणून पूजा करणे यावर विश्वास नाही. देव सगळीकडेच असल्यामुळे मूर्तिपूजेवर विश्वास नाहीच. मी माणसात, निसर्गात देव शोधतो. आणि तिथे तो मला दिसतो.
आम्च्या घरी पेपर मॅशेची मुर्ती आहे तीची प्राण प्रतीषठा करुन एक छोटेसे मंदीर उभारले आहे त्यामुळे वेगळी मुर्ती आणत नाही,पण सुपारिची स्थापना करुन त्याची पुजा करतो या उत्सवात आणी घरच्या विहिरित विसर्जन करतो .
नदी पूर्ववत स्वच्छ झाली तर नदीत गणपती विसर्जन करू. सध्या नदीकाठच्या हौदात करतो. धातूच्या गणेशमूर्ती आहेत घरात पण मातीच्या रंगीत मूर्तीची मजा न्यारीच. अगदी जीवंत दिसते. बाप्पा आमच्याकडे प्रेमाने पहात आहेत असे वाटते. त्यामुळे मातीचीच मूर्ती आणतो आणि पूजतो. यथासांग पूजा वगैरे करून विसर्जन करतो.
प्रतिक्रिया
आम्ही आधी वाड्यातल्या विहीरीत
सा॑डपाणी मिसळलेल्या नदीत...
In reply to आम्ही आधी वाड्यातल्या विहीरीत by परिकथेतील राजकुमार
का पल्लवी तुम्ही मुर्त्या रिसायकल करुन
In reply to सा॑डपाणी मिसळलेल्या नदीत... by सुहास..
अहो वेताळबुवा, मुर्त्या नाही हो!
In reply to का पल्लवी तुम्ही मुर्त्या रिसायकल करुन by वेताळ
+१
In reply to अहो वेताळबुवा, मुर्त्या नाही हो! by चतुरंग
माफी असावी.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
देशी उपाय
In reply to माफी असावी. by वेताळ
घरातील धातूच्या मूर्तीचीच
नगरीनिरंजन यांचे अभिनंदन
In reply to घरातील धातूच्या मूर्तीचीच by नगरीनिरंजन
गणपती बसवत नाही त्यामुळे
In reply to घरातील धातूच्या मूर्तीचीच by नगरीनिरंजन
आमचेकडे सुध्दा
In reply to घरातील धातूच्या मूर्तीचीच by नगरीनिरंजन
आमचेकडे सुध्दा
In reply to घरातील धातूच्या मूर्तीचीच by नगरीनिरंजन
असेच
In reply to घरातील धातूच्या मूर्तीचीच by नगरीनिरंजन
पाकिस्तानी मराठी मंडळींचा गणेशोत्सव!!!
४२ वर्षे...
In reply to पाकिस्तानी मराठी मंडळींचा गणेशोत्सव!!! by सुनील
मराठी
In reply to पाकिस्तानी मराठी मंडळींचा गणेशोत्सव!!! by सुनील
कराचीत मराठी
In reply to मराठी by विकास
विर्सजन
गणपती
In reply to विर्सजन by आजानुकर्ण
आर्शिवाद
In reply to विर्सजन by आजानुकर्ण
अरेरे
आम्च्या घरी पेपर मॅशेची
नदी पूर्ववत स्वच्छ झाली तर
आम्च्या कुळागरातल्या
घरातील धातूच्या मूर्तीचीच