Skip to main content

गणपतीचे विर्सजन कोठे करायला आवडेल ?

लेखक बरखा यांनी मंगळवार, 07/09/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1231
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आम्ही आधी वाड्यातल्या विहीरीत विसर्जन करायचो. आजुबाजुचे देखील बरेच आळशी लोक तिकडेच यायचे. आंब्याची डाळ, खोबरे वगैरे खायला मिळायचे म्हणुन आम्ही पण त्यांना अडवायचो नाही. मात्र गेली काही वर्षे घाटावर जाउन महानगरपालीकेने बांधलेल्या हौदात विसर्जन करतो. होडीवाले फार पैसे घेतात हो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चुकीचा शब्द वापरल्याबद्दल माफी असावी. मुर्च्छा आली असेल तर देशी उपाय करावेत.

घरातील धातूच्या मूर्तीचीच पूजा करतो. विसर्जन करण्याच्या प्रथेचे विसर्जन केले आहे, त्यामुळे मत दिलेले नाही.

In reply to by नगरीनिरंजन

"विसर्जन करण्याच्या प्रथेचे विसर्जन केले आहे" + १ निर्णय.... आणि अभिनंदन तुमचे आणि तुमच्या घरातील सर्व लहानथोरांचे ज्यांनी ही प्रथा स्वीकारली. असेच चित्र सार्‍या महाराष्ट्रात जी दिनी दिसेल तो खरा गणेशाचा दिन. इन्द्रा

In reply to by नगरीनिरंजन

घरातील धातूच्या मूर्तीचीच पूजा करतो. विसर्जन करण्याच्या प्रथेचे विसर्जन केले आहे, त्यामुळे मत दिलेले नाही.

In reply to by सुनील

छानच आहे सुनीलरावांनी शोधलेली/दिलेली ही बातमी (जरी २००८ ची असली तरी). कराची सारख्या पाकिस्तानच्या एका मोठ्या शहरात "गणेश चतुर्थी" हिंदू नागरिकांच्याकडून (त्यातही प्रामुख्याने मराठी भक्ताकडून) अशा स्वरूपात साजरी केली जाते हे वाचून 'पाकिस्तान म्हणजे फक्त पीरासाठी जागा" असे चित्र अजिबात नाही हे लक्षात आले. त्यातही तेथील गणेश मंदिराचे पुजारी श्री.मोहन गायकवाड गेली ४२ वर्षे मूर्ती स्थापना आणि पूजाअर्चनेचे काम करीत आहेत, हेही विशेषच म्हणावे लागेल. इन्द्रा (थोडेसे अवांतर >> याच अनुषंगाने कायदेआझम बॅ.जिना यांनी रावळपिंडी येथे बसविण्यात आलेला 'लोकमान्य टिळक' यांचा पुतळा समाजकंटकापासून वाचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा उल्लेख स्मरणात आला.)

In reply to by सुनील

बातमी एकदम रोचक! हे पहील्यांदाच समजले़इ तेथे मराठी माणसे राहतात! तेथे "पानसे" आहे का? ;) बाकी मराठी माणसे पाकीस्तानात काय करतात?

In reply to by विकास

माझ्या माहितीप्रमाणे ही मंडळी (म्हणजे त्यांचे वाड-वडील) सिंध प्रांत मुंबई इलाख्यात होता तेव्हा तेथे गेली, नोकरी-धंद्यासाठी (नोकरीच असणार! मराठी माणूस धंदा करणार आणि तोही सिंधमध्ये?). फाळणीनंतर काही कुटुंबे तिथेच राहिली (बहुतेकांना असे वाटले असावे की फाळणी एकतर तात्पुरती असावी किंवा फाळणी राहिली तरी भारतात येणे जाणे फारसे दुर्लभ होणार नाही). अवांतर - श्रीनगरमध्येही बरीच मराठी कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात हे ठाऊक आहे?

विर्सजन म्हणजे काय?

In reply to by आजानुकर्ण

गणपती म्हणजे काय? (माझा हा प्रतिसाद तुम्हाला भडकावू तर वाटत नाही ना?)

In reply to by आजानुकर्ण

विर्सजन म्हणजे वीर + सजन. :) हिंदी भाषिक पेंटर हमखास 'आर्शिवाद' लिहीतात. ही चूक आता महाराष्ट्रातही पसरू लागली आहे.

कमीतकमी मराठी लोक तरी अंधश्रध्दांतून बाहेर येतील असे वाटले होते. मत इतर ला दिले आहे. गणपतीच्या मूर्तिकडे केवळ एक उत्तम शिल्पकलेचा आविष्कार या दृष्टीने पहातो त्यामुळे घरी आणून पूजा करणे यावर विश्वास नाही. देव सगळीकडेच असल्यामुळे मूर्तिपूजेवर विश्वास नाहीच. मी माणसात, निसर्गात देव शोधतो. आणि तिथे तो मला दिसतो.

आम्च्या घरी पेपर मॅशेची मुर्ती आहे तीची प्राण प्रतीषठा करुन एक छोटेसे मंदीर उभारले आहे त्यामुळे वेगळी मुर्ती आणत नाही,पण सुपारिची स्थापना करुन त्याची पुजा करतो या उत्सवात आणी घरच्या विहिरित विसर्जन करतो .

नदी पूर्ववत स्वच्छ झाली तर नदीत गणपती विसर्जन करू. सध्या नदीकाठच्या हौदात करतो. धातूच्या गणेशमूर्ती आहेत घरात पण मातीच्या रंगीत मूर्तीची मजा न्यारीच. अगदी जीवंत दिसते. बाप्पा आमच्याकडे प्रेमाने पहात आहेत असे वाटते. त्यामुळे मातीचीच मूर्ती आणतो आणि पूजतो. यथासांग पूजा वगैरे करून विसर्जन करतो.

घरातील धातूच्या मूर्तीचीच पूजा करतो. विसर्जन करण्याच्या प्रथेचे विसर्जन केले आहे, त्यामुळे मत दिलेले नाही.