नारळी भात.....
साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा),
१/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे.
कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे.
नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून
मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा. नंतर त्यात वेलदोडेपूड, बदामाचे काप,काजूचे तुकडे व बेदाणे घालून, वर तूप घालून भाताला चांगली वाफ आणावी. गरम गरम सर्व्ह करावा.
वरुन साजूक तूप घालावे.
वाचने
3699
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
फोटो? आपला, तात्या सराफ.
नारळी भात
In reply to नारळी भात by अजितजी
फोटो ची काय जरुरी ? कारण
In reply to फोटो ची काय जरुरी ? कारण by विसोबा खेचर
पटले तुमचे विचार हे ही मी बघत
निवेदितातै फोटु कुठे आहे
मी शोधतच होते गं ही रेसिपी.
एकदम झकास