मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नारळी भात.....

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा), १/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे. कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे. नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा. नंतर त्यात वेलदोडेपूड, बदामाचे काप,काजूचे तुकडे व बेदाणे घालून, वर तूप घालून भाताला चांगली वाफ आणावी. गरम गरम सर्व्ह करावा. वरुन साजूक तूप घालावे.

वाचने 3699 वाचनखूण प्रतिक्रिया 7

अजितजी Mon, 09/06/2010 - 23:16
फोटो ची काय जरुरी ? दर वेळेला फोटो चाच आग्रहका? एखाद्याला नाही होत शक्य तो काढणे

In reply to by अजितजी

विसोबा खेचर Tue, 09/07/2010 - 13:25
फोटो ची काय जरुरी ?
कारण त्यामुळे पाकृची शोभा वाढते अशी माझी समजूत..
दर वेळेला फोटो चाच आग्रहका?
वाचक म्हणून ती माझी व्यक्तिगत अपेक्षा..
एखाद्याला नाही होत शक्य तो काढणे
कबूल.. तात्याजी.

In reply to by विसोबा खेचर

अजितजी Tue, 09/07/2010 - 15:06
पटले तुमचे विचार हे ही मी बघत आहे की ज्या पाक्रु फोटो नसतो त्याना प्रतिक्रिया देखिल नसतात /कमी असतात --त्या देवु नयेत असा काही अ लिखित करार/ नियम आहे का ?