सखा राजगड : भाग -२
पहिला भाग
------------------------------------------------
कशा ना कशावर बसून संक्रांत येते,रथसप्तमीपासून सुर्यनारायण आपल्या घोड्यांचा वेग कमी करतात,दिवस लांबडा होत जातो आणि रात्र आकसत जाते. गडावरचं गवत आता पिवळं पडायला लागतं,सगळ्या पायवाटा अगदी लख्ख दिसायला लागतात. उन्हं कळाकळा तापायला लागतातं,मधूनच एखादी वावटळ येते,गवत्,काडी-कचरा आपल्याभोवती भोवर्यासारखी गरागरा फिरवते.दिवसभर अंगाची अगदी काहीली होते,संध्याकाळमात्र थंडगार वार्याच्या झुळका घेउन येते.
यावेळी आपण बालेकिल्ल्यावर असावं,तोरण्यामागं बुडणारा सुर्यनारायण इथंनं बघावा,संधीप्रकाशात घटकाभर तिथंच बसून रहावं आणि मग मुक्कामावर यावं. अगदी पहाटे उठून बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी यावं,समोर सुवेळीच्या मागं उगवणारा सुर्य बघावा आणि अगदी हरखून जावं.
सुर्योदयाच्या वेळी सुवेळामाची
सुर्योदय
वैशाख सरत येतो,परत पावसाची चाहूल लागते,तसा तो अधून मधून आपले चौघडे ताशे वाजवत असतोच.मृगाच्या आसपास संध्याकाळी बालेकिल्ल्यावर यावं, तोरणा आणि राजगडाच्या मधल्या डोंगराच्या धारेवरून ढ्गांची लाट हळुवार फुटत असते. धुपाचा धूर संथपणे पसरावा तसे ढग फुटत असतात्,पसरत असतात. तोरणा ढगांचच मुंडास डोक्याला बांधून असतो. त्यातूनसुद्धा त्याची बुधलामाची अधनंमधनं डोकावत रहाते.एकाएकी तोरण्यावरचे ढग पांगतात आणि सुर्यनारायण बुडताना दर्शन देतो.
ढगांच मुंडासं बांधलेला तोरणा
ढगांच्या फुटणार्या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य
पुन्हा एक ऋतूचक्र सुरू होतं,या सगळ्या ऋतूत राजगड पुन्हा-पुन्हा बघायचा आणि अनुभवायचा. राजगड म्हणजे एका दिवसात उरकणारी गोष्टच नाही. इथं यायचं ते २-३ दिवस मोकळे काढूनच आणि जाताना हृदयात भरून न्यायचा राजगडाचा सहवास !
असा माझा सखा, राजगड !

याद्या
7721
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
सुरेख! जियो!
पहिल्या भागाचा धागा कसा जोडायचा?
कातिल फोटु आहेत!
ख ल्ला स!!!
___/\___!!!
अति सुंदर
दुसऱ्या फोटोमध्ये कोणी तपस्वी
पण एवढेच का?
ही घ्या लिंक
In reply to पण एवढेच का? by जिप्सी
+१
In reply to ही घ्या लिंक by विलासराव
ओ कशाला भाव खाता
जबरदस्त !! पहिला फोटो विशेष
छान आहेत. चौथा फोटो फार
ग्रेट
एक वेगळीच दृष्टी
धन्यवाद .. पण
कधी जायचं बोला????
सगळे फोटो फार छान आहेत! आणि
सगळे फोटो फार छान आहेत! आणि
जिप्सीभौ, फोटु मस्तच !!
सुरेख..
दोन्ही भाग एकत्र चालले असते !!!!
सर्व फोटो आवडले. राजगड
झ का स!!!!
जरा त्या पत्त्याच्या कॅटना
+१
In reply to जरा त्या पत्त्याच्या कॅटना by स्पंदना
अ.प्र.ती.म......जबराट,एकदम कडक फोटो !
सोळ्ळेड फटु१