Skip to main content

नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 05/09/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे? भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे? काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी? अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

वाचने 1807
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

बापरे ...लागेल का?...पोचेल का?...उजळेल का? किति प्रश्ण ...किति सरबत्ति

सर्वांचा आभारी आहे. >>इतके प्रश्न विचारून वैताग दिला तर नक्कीच नाही.. घ्या!! म्हणजे एवढी कविता करुन काहीच उपयोग नाही म्हणायचा.

पण ती नक्कीच तुम्हाला सोडुन गेली असणार. भाग्यवान आहे .